अत्याधुनिक आरोग्य सोयीसुविधांचा माणगावकरांना निश्चितच लाभ होईल पालकमंत्री आदिती तटकरे

 



अलिबाग,जि.रायगड, दि.1, (जिमाका):-  माणगाव तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे व आमदार भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते पोर्टेबल एक्स-रे मशीन, कोविड पूर्व तपासणी केंद्र व फिरता दवाखाना असलेली अत्याधुनिक व  सर्व प्रकारच्या आरोग्य सोयी-सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, अत्यंत प्रगत अत्याधुनिक ईसीजी मशिन चे उद्घाटन आज करण्यात आले. या अत्याधुनिक आरोग्य सोयी-सुविधांचा माणगावकरांना निश्चितच लाभ होईल, कोविड संशयित रुग्ण शोध मोहिमेस मोठा हातभार लागेल व इतर क्षयरोग, न्यूमोनियासदृश्य रुग्ण शोधण्यास देखील मदत होईल, असे प्रतिपादन याप्रसंगी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.

   यावेळी माणगाव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसिलदार ललिता बाबर व अन्य अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक