Posts

Showing posts from February 5, 2017

मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य तथा विविध उपक्रम

Image
दिनांक:- 10/02/2017                                                                                                          वृत्त क्र. 79 मतदान जनजागृतीसाठी  पथनाट्य तथा विविध उपक्रम अलिबाग दि.10 (जिमाका ) :- रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्वात्रिक निवडणूक-2017 चे मतदान 21 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहे.  मतदानाची टक्केवारी वाढावी  यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन व  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत  आहेत.  या अंतर्गत प्रिझम संस्था अलिबाग यांनी पेण तालुक्यातील खारेपाट भागातील वढाव, मोठे भाल, विठ्ठलवाडी, कान्होबा, नारवेल, बेनवले, शिर्की, बोर्वे, शिर्कीचाळ, मसद बेडी, सागरवाडी आदिगावांमध्ये पथनाट्य कार्यक्रम सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी वाशीचे मंडळ अधिकारी श्री.पाटील, तलाठी बोर्झे श्री.वाभळे, तलाठी शिर्की श्री.हाले हे उपस्थित होते.  सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केले.  जिल्हा प्रशासन व  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग मार्फत मतदान जनजागृतीसाठी जिल्ह्यातील

रायगड जि.प.,पं. समिती निवडणूक मुख्य निवडणूक निरीक्षक शेखर सिंह

दिनांक:- 10/02/2017                                                                                                          वृत्त क्र. 78 रायगड जि.प.,पं. समिती निवडणूक मुख्य निवडणूक निरीक्षक शेखर सिंह                 अलिबाग दि.10 (जिमाका ) :-   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 करिता रायगड जिल्ह्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह  यांची नियुक्ती करण्यात आली असून  त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  संभाव्य दौरा कार्यक्रम             मुख्य निवडणूक निरीक्षक शेखर सिंह यांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक  कालावधीतील संभाव्य दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  रविवार  दि.12 फेब्रुवारी 2017 रोजी माणगाव, तळा, रोहा.   सोमवार 13 फेब्रुवारी महाड, पोलादपूर. मंगळवार 14 फेब्रुवारी-श्रीवर्धन, म्हसळा.  रविवार 19 फेब्रुवारी-अलिबाग, मुरुड.   सोमवार 20 फेब्रुवारी-खालापूर, पेण, सुधागड-पाली.  मंगळवार 21 फेब्रुवारी-अलिबाग, मुरुड (राखीव). बुधवार 22 फेब्रुवारी-उरण, कर्जत, पनवेल. गुरुवार 23 फे

स्वच्छ रायगड जिल्हा जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर

Image
स्वच्छ रायगड जिल्हा जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक                                                              - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर अलिबाग दि.09 (जिमाका) संपूर्ण रायगड जिल्हा आता स्वच्छ होण्याच्या अंतिम टप्प्यात असून त्यासाठी  स्वच्छतेची मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या निमित्त होणाऱ्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज अलिबाग येथील पीएनपी महाविद्यालयात केले.  मुंबई विद्यापीठ, पीएनपी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी यांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय स्वच्छ भारत मिशन या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.बाबासाहेब बिडवे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, बँक ऑफ इंडियाचे वरिष्

पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहिर

Image
पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहिर               अलिबाग दि.08 (जिमाका ) :-    रायगड जिल्हयातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यात करण्यात आली.  आज  दि. 8 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड-अलिबाग येथे जिल्हाधिकारी श्रीमती तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  सभेत आरक्षण सोडतीद्वारे जाहिर करण्यात आले.               यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तहसिलदार (सामान्य) अजित नैराळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरक्षण         पंचायसमितीचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.   सर्वसाधारण- तळा, माणगाव, कर्जत, महाड.  सर्वसाधारण महिला - मुरुड, म्हसळा, खालापूर, श्रीवर्धन.  नागरिकांचा मागास प्रवर्ग- उरण, सुधागड-पाली.  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- पनवेल, रोहा. अनुसूचित जाती महिला -पोलादपूर.  अनुसूचित जमाती - अलिबाग.  अनुसूचित जमाती महिला - पेण. पंचायत सम