Posts

Showing posts from March 7, 2021

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 1 ली व 2 री इयत्तेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 31 मार्च पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक

    अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका) :-   सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते इयत्ता 2 री मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.             या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे-   या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, यासाठी मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.1 लाख इतकी असावी, इयत्ता 1 ली त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्षे पूर्ण असावे, वय 30 सप्टेंबर 2021 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे, त्याचा जन्म 1 ऑक्टोबर 2014 ते 30 सप्टेंबर 2015 दरम्यान झालेला असावा, इयत्ता 2 री च्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा इयत्ता 1 ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत सादर करावे,   अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा जन्माचा दाखला तसेच अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतला असल्यास अंगणवाडी

महिलादिनाचे औचित्य साधून जिल्हयातील महिला उपेक्षित घटकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

    अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका):- जिल्ह्यातील उपेक्षित घटक जसे किन्नर, सेक्स वर्कर महिला व एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह, बालसुधारगृहातील महिला या घटकांसाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम  जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेतून विशेष प्रकल्प म्हणून समाजातील दुर्लक्षित, अनपेक्षित घटकांसाठी राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी विशेष बाब म्हणून प्रस्तावास मान्यता दिली.             हा प्रशिक्षण कार्यक्रम सरस्वती स्किल डेव्हलपमेंन्ट सेंटर, खारघर, ता. पनवेल या ठिकाणी दि.8 मार्च 2021 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि.09 मार्च 2021 रोजी एका प्रशिक्षण वर्गात 30 उमेदवार याप्रमाणे 350 इतक्या उमेदवारांसाठी सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, निराधार महिलांसाठी ब्युटीफूल टुमारो, खारघर या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. या योजनेत जिल्हयातील अलिबाग व तळोजा या कारागृहातील शिक्षाधीन/न्यायाधीन बंद्यांसाठीसुध्दा प्रशिक्षण सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी

महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रार अर्ज, निवेदन सादर करण्यास इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका):- महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्याबाबत शासनाने सूचित केलेले आहे.               महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये पिडीत, तक्रारदार महिलांचे केवळ वैयक्तिक स्वरुपाचे अर्जच स्विकारले जातात. तक्रार,निवेदन दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबतचे अर्ज, सेवा विषयक अर्ज, आस्थापनाविषयक अर्ज स्विकारले जात नाहीत.               तरी महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रार अर्ज, निवेदन सादर करण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,अलिबाग, घर नं. 738, निलपुष्प, नागडोंगरी-चेंढरे, MIDC कार्यालयासमोर,(दूरध्वनी क्र.02141-225321) येथे तक्रार अर्ज,निवेदन दोन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती,संस्थांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका):- शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थाना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारने गौरविण्यात येते. सन 2018-19 व 2019-20 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थाकडून दि. 31 मार्च 2021 पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.               पुरस्काराचे स्वरुप व अहर्ता पुढीलप्रमाणे :- राज्यस्तरीय पुरस्कार :- रु 1,00,001/- रोख स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिला तो पुरस्कार मिळाल्यानंतर 5 वर्ष पुरस्कारासाठी पात्र रहाणार नाहीत. विभागीय पुरस्कार :-  रु. 25,001 /- रोख स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्ष कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून

जिल्हा न्यायाधीश कार्यालयातील जुने वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्यांनी मोहोरबंद किंमतीच्या निविदा सादर कराव्यात

    अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका):- प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा न्यायाधीश-1 यांना मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील पुरविण्यात आलेले शासकीय वाहन मारुती बलेनो व्हीएक्सआय क्र. एम. एच.01/ पीए / 5050 हे दि.16 मे 2019 रोजी निर्लेखित करण्यात आले आहे. हे वाहन जास्त किंमत देवून खरेदी करु इच्छिणाऱ्या लोकांकडून मोहोरबंद किंमतीच्या निविदा मागविण्यात येत आहेत. हे वाहन जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्या न्यायालयाच्या आवारात पाहण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात आले आहे. ते कार्यालयीन वेळेत इच्छुक लोकांना पाहता येईल.               ज्या कोणा इच्छुक व्यक्तीस हे वाहन खरेदी करावयाचे असेल त्यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या नावाने मोहोरबंद किमतीच्या निविदा दि.16 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड अलिबाग यांच्या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने सादर कराव्यात.दि 16 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्राप्त न झालेल्या निविदा किंवा अपूर्ण असलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत. अनामत रक्कम म्हणून रु.5

जिल्ह्यात जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विभाग व आत्मामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न

  अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):-   संचालक, आत्मा, पुणे कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार काल (दि. 8 मार्च रोजी) जागतिक महिला दिनानिमित्ताने जिल्ह्यात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.             खालापूर, पनवेल, कर्जत, उरण, मुरूड, तळा, रोहा, पाली, पोलादपूर या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने महिला शेतकऱ्यांचे नागली पिक मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये दापोली येथे नागली मूल्यवर्धन प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या महिला शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.             अलिबाग तालुक्यात हिराकोट तलावाजवळ भरविण्यात आलेल्या संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजाराचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रयत बाजारामध्ये 25 महिला शेतकऱ्यांनी त्यांचा उत्पादित शेतमाल विक्री केला.             रोहा तालुक्यात नागली मूल्यवर्धन प्रशिक्षणासह “ विकेल ते पिकेल ” अभियानांतर्गत महिला शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आवश्यक विक्री

पेण जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र कार्यालयाकडील नादुरुस्त 339 द्रवनत्र पात्रे विक्रीस उपलब्ध इच्छुक खरेदीदारांनी दरपत्रके सादर करावीत

अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):-   जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पेण यांच्याकडील नादुरुस्त निर्लेखित केलेली विविध प्रकारची 339 द्रवनत्र पात्रे यांची निविदा पध्दतीने  (जसे आहे तेथून व जशी आहे त्याप्रमाणे) विक्री करावयाची आहेत. निर्लेखित द्रवनत्र पात्रे पशूधन विकास अधिकारी, जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पेण यांच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध असून निविदा अटी व शर्ती इत्यादीबाबत सविस्तर माहिती शासनाच्या रायगड-अलिबाग या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. तरी इच्छुक खरेदीदारांनी  दि.10 मार्च ते दि.16 मार्च 2021  या कालावधीत ऑफलाईन लिफाफा पध्दतीने विहित पध्दतीचा अवलंब करुन आपली दरपत्रके दि.16 मार्च 2021  रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयास सादर करावेत. प्राप्त निविदा दि.17 मार्च 2021  रोजी सकाळी 11.00 वा. उघडण्यात येतील. प्राप्त निविदांपैकी एखादी अगर सर्व निविदा कोणतेही कारण न देताना रद्द करण्याचे अधिकार निविदा समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.सुभाष म्हस्के यांनी कळविले आहे.

महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून महिला शेतकरी ते ग्राहक थेट विक्री बाजाराचे आयोजन संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):-   जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त काल (दि.8 मार्च रोजी ) हिराकोट तलाव,   अलिबाग येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत   ( आत्मा) महिला शेतकरी ते ग्राहक थेट विक्री बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात 25 महिला शेतकऱ्यांनी सहभागी नोंदविला व शेतमाल विक्री केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीम.निधी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. उज्वला बाणखेले ,जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी   श्री. तूपसमुद्रे,   उपनगराध्यक्ष श्रीम. मानसी म्हात्रे,   तालुका कृषी अधिकारी श्रीम. हर्षाली सावंत, मंडळ कृषी अधिकारी सुरेश पाटील तसेच कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा आदिंची उपस्थिती होती. ००००००

उत्तम कुटूंब व्यवस्थेतून होते चांगल्या समाजाची जडण-घडण--प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे

  अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):-   उत्तम कुटुंबातूनच चांगला समाज घडतो. ती जबाबदारी आई-वडिलांची आहे, म्हणजेच त्याचे मूळ कुटुंब व्यवस्थेमध्ये आहे, त्यातूनच समाजाची चांगल्या प्रकारे जडण-घडण होऊ शकेल, असे मत येथील जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे यांनी काल (दि.8 मार्च) येथे व्यक्त केले.              जिल्हा प्रशासनातर्फे काल (दि.8 मार्च) जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा नियोजन भवन सभागृहात महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख चारुशीला चव्हाण, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, अलिबागच्या प्रांत अधिकारी शारदा पोवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कुटुंबव्यवस्थेचे महत्व अधोरेखित करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे पुढे म्हणाल्या की, आजच्या बदलत्या परिस्थितीत वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षाही चिंतेची बाब आहे. शिक्षण,पैसा यापेक्षाही मानवी मूल्ये म