महिलादिनाचे औचित्य साधून जिल्हयातील महिला उपेक्षित घटकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

 

 

अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका):- जिल्ह्यातील उपेक्षित घटक जसे किन्नर, सेक्स वर्कर महिला व एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह, बालसुधारगृहातील महिला या घटकांसाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम  जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेतून विशेष प्रकल्प म्हणून समाजातील दुर्लक्षित, अनपेक्षित घटकांसाठी राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी विशेष बाब म्हणून प्रस्तावास मान्यता दिली.

            हा प्रशिक्षण कार्यक्रम सरस्वती स्किल डेव्हलपमेंन्ट सेंटर, खारघर, ता. पनवेल या ठिकाणी दि.8 मार्च 2021 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि.09 मार्च 2021 रोजी एका प्रशिक्षण वर्गात 30 उमेदवार याप्रमाणे 350 इतक्या उमेदवारांसाठी सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, निराधार महिलांसाठी ब्युटीफूल टुमारो, खारघर या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

या योजनेत जिल्हयातील अलिबाग व तळोजा या कारागृहातील शिक्षाधीन/न्यायाधीन बंद्यांसाठीसुध्दा प्रशिक्षण सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे.

            अपंग उमेदवार,अल्पसंख्यांक उमेदवार, आदिवासी समाजातील उमेदवारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत विशेष कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुरूवात करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन  केंद्राचे, सहायक आयुक्त शा.गि.पवार यांनी दिली आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक