Posts

Showing posts from March 22, 2020

सुरु असलेल्या कंपन्यांनी काम नसलेल्या कामगारांना माणुसकीच्या भावनेतून तात्पुरत्या स्वरूपात काम द्यावे--जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला आहे.   करोन विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.     करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.   जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या इतर भागातून व अन्य राज्यांमधून कामानिमित्त आलेले कामगार आहेत त्यातील काही कामगार संचारबंदी लागू होण्यापूर्वी आपल्या मूळ गावी परत गेले आहेत.     परंतु काही कामगार हे जिल्ह्यात अडकून पडलेले आहेत.     जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यामुळ

कंपन्यांनी कार्यरत कामगार,कुटुंबीय, आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे,कारखान्याचा परिसर व गावामध्ये जंतूनाशक फवारणी करावी सुरु असलेल्या कंपन्यांना जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.   या अनुषंगाने करोना विषाणूचा प्रतिबंध करताना सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्ह्यात सुरु असणाऱ्या विविध कंपन्यांनी आपल्याकडील सीएसआर फंडामधून आपल्या कारखान्यांमध्ये कार्यरत कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच कारखान्याच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे व त्यांना करोना विषाणूपासून प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयीचे प्रशिक्षण द्यावे.     तसेच कारखान्याचा परिसर व आजूबाजूच्या गावांमध्ये जंतूनाशक फवारणी करून घ्यावी,

मत्स्य व मत्स्यखाद्य यांची अत्यावश्यक वस्तू म्हणून वाहतूक सुरू करण्यास परवानगी --- जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.   करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील आंतरराज्य व जिल्ह्यांतर्गत प्रवेश बंद करण्यात आल्याने मत्स्यशेती शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.     त्यामुळे अधिसूचनेतील निर्देश व तरतूदी विचारात घेऊन प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मत्स्य व मत्स्यखाद्य यांची अत्यावश्यक वस्तू म्हणून गणना करून त्यांची वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 00000

स्वत:चे नातेवाईक परदेशातून आले असल्यास डॉक्टरांनी स्वत:सह त्यांनाही होम क्वॉरनटाईन करावे -- जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.         या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी   नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी खाजगी दवाखाने सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी,असे आदेश पारित केले आहेत.    करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवणे आवश्यक आहे.     त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामधील ज्या डॉक्टरांच्या कुटुंबातील व्यक्ती, मुलगा-मुलगी किंवा इतर नातेवाईक प्रदेशातून प्रवास करून आलेले अस

150 आदिवासी कुटुंबांना घरपोच धान्य वाटप उपविभागीय पोलीस अधिकारी व कर्जतच्या व्यापारी मित्रांचा स्तुत्य उपक्रम

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): करोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे रोज मजूरीवर गुजराण करणाऱ्या कर्जत तालुक्यातील आदिम जमात असणाऱ्या कातकरी कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळण्यासाठी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर व कर्जतचे व्यापारी अमित पारस ओसवाल,मनोज पारस ओसवाल,जयंतीलाल शेषमाल परमार यांच्यावतीने आज आदिवासींना त्यांच्या घरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले.    तालुक्यातील जांभूळवाडी,वडाचीवाडी व वंजारवाडी येथील 150 कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, दोन किलो साखर, चहा, मीठ, मसाला पावडर, दोन किलो तेल, हळद आदि समावेश असलेले किट देण्यात आले .   ही मदत वाटप करताना शासनाने घालून दिलेले सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. दोन व्यक्तींमध्ये किमान मीटरभर अंतर पाळत, तोंडावर मास्क किंवा रूमाल लावून एका घरातील एकच व्यक्तीला बाहेर बोलावून, शिस्तबध्दपणे, गोंधळ-गडबड न करता या मदतीचे वाटप करण्यात आले. 000000

श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड (र.नं.A17-कोलाबा) यांच्यातर्फे भगवान श्री महावीर स्वामी जन्म कल्याण निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये “ करोना संकटाच्या आरोग्य सुविधांसाठी ” रु. दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी या ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी- श्री.प्रकाश जैन, माजी मॅनेजिंग ट्रस्टी- श्री.प्रकाश मुलचंद जैन, ट्रस्टी- विक्रम सोहनराज जैन,ट्रस्टी-अजित भिकमचंद जैन हे उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्तीच्या या परिस्थितीत श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या दानशूरपणाचे जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी विशेष कौतुक केले आणि समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी, सस्थांनी अशा प्रकारे मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.   तसेच आतापर्यंत ज्या कंपन्यांनी, समाजसेवी संस्थांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून या

बाहेरील राज्यातील लोकांनी,कामगारांनी आहे तेथेच राहावे प्रशासन त्यांची काळजी घेण्यास सक्षम --विभागीय आयुक्त शिवाजी दौंड

                                                  अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका) : बाहेरील राज्यातील लोकांनी,कामगारांनी मुंबई शहर, उपनगर अथवा गाव-शहर सोडून बाहेर जाऊ नये. कोणतीही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा,जेणेकरुन त्यांना मदत केंद्रामार्फत जेवण, आरोग्य, निवास आदि सुविधा दिल्या जातील, असे आवाहन विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केले आहे.   कोणतीही अडचण असल्यास संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक---- जिल्हाधिकारी कार्यालय- मुंबई शहर-022-22662440, मुंबई उपनगर बांद्रा-022-26514742, ठाणे-022-25344041, पालघर-02525-253111, रायगड-02141-222001, रत्नागिरी-02352-222301, सिंधुदूर्ग-02362-228844. निवासी उपजिल्हाधिकारी - मुंबई शहर-022-22670656, मुंबई उपनगर बांद्रा-022-26556806, ठाणे-022-25345130, पालघर-02525-252520, रायगड-02141-222081, रत्नागिरी-02352-223573, सिंधुदूर्ग-02362-228845. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष - मुंबई शहर-022-22664232, मुंबई उपनगर बांद्रा-022-26556799, ठाणे-022-25301740, पालघर-02525-297474, रायगड-02141-222118/222322, रत्नागिरी-02352-226248, सि

“रक्तदान हे श्रेष्ठ दान” नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे जवळच्या रक्तपेढीशी संपर्क करावा स्वच्छता व सोशल डिस्टंन्सिंग पाळावे --- जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका) : करोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग चिंताग्रस्त झाले आहे. त्याचा प्रभाव भारतावरही आहे. त्यानुषंगाने   इतर रोगांनी पिडीत व्यक्तींना रक्तदानाची आवश्यकता असल्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.    नजीकच्या काळात रक्त व रक्तघटकांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करणे   आवश्यक आहे.     परदेश प्रवास न   केलेले नागरीक व ज्याचे आरोग्य स्वस्थ आहे, अशा नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी न करता त्यांना ठरवून दिलेल्या वेळेमध्ये मोठया प्रमाणावर रक्तदान करावे, “ रक्तदान हे श्रेष्ठ दान ” असल्याने नागरिकांनी स्वच्छता बाळगून तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळून जवळच्या रक्तपेढीमध्ये जावून रक्तदान करावे,   असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे. 000000

“करोना विषाणू..कोविड-19” काळजी करू नका.. काळजी घ्या ! समजून घेऊ.. काय आहे शिवभोजन योजना..

करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.                   कोविड-19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे.   या कालावधीत राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील. दरम्यान शासन निर्णय क्रमांक शाभोथा-2019/ प्र. क्र. 51/ नापु-17 दि. 1 जानेवारी 2020 नुसार गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शि

“करोना विषाणू..कोविड-19” काळजी करू नका.. काळजी घ्या ! समजून घेऊ.. काय आहे लॉकडाऊन?

करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.                    रायगड जिल्हयाच्या संलग्न ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व सातारा या जिल्ह्याच्या सीमा जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.               कोविड-19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे.   या कालावधीत राज्य शासनाचे विभा

कोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

रायगड - जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर आजपासुन रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत घरोघरी जावून तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.वैयक्तिक स्वच्छता राखावी. कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती ही त्यांनी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांची संख्या १०६५ असून एकूण २६ रुग्णांना मुंबई येथील कस्तूरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी १८ रुग्णांचे स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. तर इतर सर्वांना घरीच अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच एका बाधित रूग्णाची उपचारानंतर केलेली चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यास घरी पाठविले आहे. तर एका पाॅजिटीव्ह असलेल्या रूग्णावर उप

शासन आणि प्रशासन सर्व तऱ्हेने जनतेच्या मदतीकरिता प्रयत्नशील मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे---पालकमंत्री आदिती तटकरे

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.27 (जिमाका) : करोना विषाणूंचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन सर्व पातळ्यांवर रात्रंदिवस प्रयत्नशील आहे.     संपूर्ण देश करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी काळजी घेत आहे.     मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.   करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन राबवीत असलेल्या   उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी रोहा प्रांताधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याशी संवाद साधला.     त्यावेळी त्या बोलत होत्या.   यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सर्व प्रशासनाला सूचना देताना सांगितले की, जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडून ज्या सूचना दिल्या गेल्या आहेत, जे आदेश पारित केले जात आहेत, त्यांचे तं

तळोजा MIDC मधील मास्क बनविणाऱ्या venus कंपनी मधील कर्मचा-यांमध्ये करोना विषाणू संसर्ग टाळण्याबाबत जनजागृती करताना तसेच उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन देताना रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी....

Image

“कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका.. काळजी घ्या ! 1 ते 25 मार्च दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

अलिबाग,दि.26(जिमाका)-    जे नागरीक    दि.1 ते 25 मार्च दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे- एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले नागरीक-1117, परदेशी प्रवास करुन परतल्यानंतर 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले वा पुन्हा परदेशी परतलेले नागरीक-334, घरामध्ये अलगीकरणात (Home Qurantine) असलेले नागरीक-678, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Qurantine) असलेले नागरीक-104. उपचारानंतर बरे झाल्यामुळे मुंबई येथील भाभा हॉस्पिटल   मधून घरी पाठविण्यात आलेले नागरिक-01 या नागरिकाच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे तर कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-1 असून या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. परदेशी प्रवास करुन परतलेल्या नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-   जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-29, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या न

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू राहतील नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी ----जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी

अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) :   करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि.14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू झाले असून उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, नागरिकांसाठी विविध नियम व उपाययोजना करण्यात येत आहेत.               त्यानुसार जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी गटविकास अधिकारी यांना गावनिहाय व मुख्याधिकाऱ्यांनी   वॉर्डनिहाय, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, जे वयोवृद्ध नागरिक आहेत, ज्यांना कोणाचाही आधार नाही व दिव्यांग अशा लोकांसाठी त्यांना लागणारे जीवनाश्यक साहित्य पुरवावे.   याशिवाय भाजी विक्रेत्यांना मंडईच्या जागा नेमून द्याव्यात, जीवनावश्यक वस्तूंची जी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे, त्यांनी आपली दुकाने 24 तास चालू ठेवावीत. जिल्ह्यात शासकीय व खाजगी बायोमेट्रिक अटेंडन्स बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.   

औद्योगिक क्षेत्रातील अडचणींचे निराकरणासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना सद्यस्थितीतील लॉकडाऊनमुळे त्यांच्या कच्च्या मालाचा पुरवठा, उत्पादन प्रक्रिया व पक्क्या मालाची निर्यात यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.   त्याकरिता औद्योगिक क्षेत्रातील अडचणींचे निराकरण करण्याकरिता पोलीस विभागामार्फत कर्जत व खालापूर तालुक्यांसाठी श्री.रणजित पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर दू.क्र.02192-270595 भ्रमणध्वनी 9168465742 ई-मेलआयडी sdpo.khalapur.rd@mahapolice.gov.in /rgdsdpokhalapur 1 @gmail.com , पेण,अलिबाग,रोहा व सुधागड तालुक्यांसाठी श्री.विजयकुमार सुर्यवंशी,उपविभागीय पोलीस अधिकारी,रोहा दू. क्र.02194-264720 भ्रमणध्वनी 9975631374- मेल आयडी sdpo.roha.rd@mahapolice.gov.in/rgdsdporoha@gmail.com,महाड व माणगाव तालुक्यांसाठी श्री.अरविंद पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी,महाड दू. क्र.02145-222170 भ्रमणध्वनी 9702744555-मेल आयडी sdpo.mahad.rd@mahapolice.gov.in/rgdsdpomahad@gmail.com,महाड या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   तरी जिल्ह्यातील उद्योगांची