कंपन्यांनी कार्यरत कामगार,कुटुंबीय, आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे,कारखान्याचा परिसर व गावामध्ये जंतूनाशक फवारणी करावी सुरु असलेल्या कंपन्यांना जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन



अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत. 
या अनुषंगाने करोना विषाणूचा प्रतिबंध करताना सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्ह्यात सुरु असणाऱ्या विविध कंपन्यांनी आपल्याकडील सीएसआर फंडामधून आपल्या कारखान्यांमध्ये कार्यरत कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच कारखान्याच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे व त्यांना करोना विषाणूपासून प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयीचे प्रशिक्षण द्यावे.   तसेच कारखान्याचा परिसर व आजूबाजूच्या गावांमध्ये जंतूनाशक फवारणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.  
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक