Posts

Showing posts from December 3, 2023

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी दि. 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

रायगड, दि.8 (जिमाका):-  क्षेत्रीय स्तरावर सध्या व्यापक प्रमाणावर सुरु असलेले वंध्यत्व निवारण शिबीरे इ. लक्षात घेता या योजनांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अर्ज भरता यावे, यासाठी सन 2023-24 या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी दि.15 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांनी दिली आहे. सन 2023-24 या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार सन 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे व जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन पडताळणी करून निवड पूर्ण करणे याची मुदत दि. 8 डिसेंबर 2023 रोजी संपुष्टात आली आहे. यासाठीचे  नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :-  दि.9 नोव्हेंबर ते दि.15 डिसेंबर 2023 पर्यंत सन 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज स्विकारणे, जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन निवड

सैनिकांसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे देशकार्य-- निवासी उपजिल्हाधिकारी शिर्के

Image
रायगड, दि.7 (जिमाका) :- आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी  निवृत्त कर्नल किशोर कुमार मोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गु.श. हरळय्या, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, जिल्हा माहिती अधिकारी  मनिषा पिंगळे, सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.साळुंखे तसेच युद्ध विधवा, वीरमाता, वीरपिता, आजी-माजी सैनिक, पत्रकार आणि ध्वजदिन निधी संकलनाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेल्या विविध कार्यालयांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.    यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी निधी संकलनात सहकार्य करणार्‍या शाळा, संस्था व शासकीय कार्यालयांच्या प्रतिनिधींचा भेटवस्तू देऊन गौरव करण्य

ओबीसी प्रवर्गाकरिता मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  रायगड,दि.07 (जिमाका) :-  इतर मागास प्रवर्गातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कच्चे घर असल्यास ग्रामीण भागासाठी रु.1 लाख 20 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटूंबास मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत 269 चौरस फूट घरकुल मंजूर करण्यात येते. या घरकुलासाठी ग्रामीण क्षेत्राकरिता रु.1 लाख 20 हजार अनुदान देय आहे. या योजनेकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जागेची आवश्यक कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेचा लाभ ज्या इच्छुक लाभार्थ्यांना घ्यावयाचा आहे, त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती येथे संपर्क साधावा. तसेच योजनेच्या अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छीभवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंटमेरी स्कूल समोरील, श्रीबाग रोड, अलिबाग यांचे कार्यालय येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी कळविले आहे. ०००००००

दि.22 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

                    रायगड दि.5(जिमाका)   :-   रायगड डाक विभागातील टपाल सेवे संदर्भात तक्रार/समस्या निवारण करण्यासाठी अधीक्षक डाकघर रायगड विभाग ,  अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे शुक्रवार, दि. 22 डिसेंबर 2023   रोजी सकाळी    11.00   वाजता अधीक्षक डाकघर ,  अलिबाग    यांच्या कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अधीक्षक डाकघर रायगड विभाग श्री.सुनील थळकर यांनी दिली आहे.            या डाक अदालतीत    रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही ,  अशा टपाल ,  स्पीडपोस्ट ,  काऊटर सेवा ,  बचत बँक ,  मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.        तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक ,  ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत   अधीक्षक डाकघर रायगड विभाग, सुनील थळकर यांच्या कडे दि. 21 डिसेंबर 2023   पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी. ००००००

महाड येथे दिव्यांग मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम संपन्न

                    रायगड दि.5(जिमाका)   :-   जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांचे मार्गदर्शनाखाली 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संपन्न होणाऱ्या सप्ताहाचे औचित्य साधून महाडचे आमदार भरत गोगावले व दिव्यांग संघटना राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था, महाडच्या वतीने    दिव्यांग मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम संपन्न झाला.   या मेळाव्यास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष मिश्रा तसेच ग्रामीण रुग्णालय महाडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर जगताप व सिकलसेल समुपदेशक प्रतिम सुतार, जिल्हा रुग्णालयासमवेत दिव्यांग कल्याणाच्या विविध शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने अनेक शासकीय विभागातील अधिकारी    उपस्थित होते. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी सांगितले की, शासकीय योजनांवर प्रकाशझोत टाकत योजनांचा लाभ घेताना दिव्यांग बांधवाना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना सहकार्य करावे, अशा सूचना शासकीय विभागांना करत त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग बांधवांना केले.   तसेच दिव्यांग संघटना राज्य अध्यक्ष साईनाथ

थळ येथे आयुष्मान भव: शिबीर संपन्न शिबिरात नागरिकांना 218 आयुष्मान कार्ड व 112 आभाकार्डचे वाटप

रायगड दि.5(जिमाका)   :-     जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग व ग्रुप  ग्रामपंचायत थळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शंकरा आय केअर यांच्या सहकार्याने थळ बाजार येथे (दि.5 डिसेंबर) रोजी आयुष्मान भव: अंतर्गत तपासणी शिबीर संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, पंचायत समिती अलिबागचे माजी सदस्य गजानन बुंदके, थळ ग्रामपंचायत सरपंच सुनिल पत्रे, सदस्य विशाल बुंदके, नरेश कोळी, ग्रामसेवक नितेश तेलगे, मच्छीमार सोसायटीचे चेअरमन दिलेश चटके, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.           या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयाचे पथक थळ जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या तपासणी करिता उपस्थित होते. या शिबिरांतर्गत 18 वर्षावरील पुरुषांची जनरल तपासणी तसेच रक्ताची चाचणी, त्याचप्रमाणे उपस्थितांचे सिकलसेल, थायरॉईड, सीबीसी आदी चाचणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शंकरा आय केअर यांच्यामार्फत मोतीबिंदू तसेच डोळ्यांच्या अन्य तपासणी करण्यात आल्या.  मोतीबिंदू आढळलेल्या    7 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्याकरिता पनवेल येथ

सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ सोहळ्याचे दि.07 डिसेंबर रोजी आयोजन

             रायगड दि.4 (जिमाका) :  रायगड   जिल्ह्याचा   सशस्त्र   सेना   ध्वजदिन  2023  निधी   संकलन   शुभारंभ   कार्यक्रम   सोहळ्याचे   गुरुवार   दि. 07  डिसेंबर  2023  रोजी   सकाळी  11.00  वा. जिल्हाधिकारी   कार्यालयाच्या ,  राजस्व   सभागृहात    जिल्हाधिकारी डॉ .  योगेश   म्हसे  यांच्या   अध्यक्षतेखाली   आयोजन करण्यात आला असल्याची माहिती    जिल्हा   सैनिक   कल्याण   अधिकारी ,  रायगड - अलिबाग ले .  कर्नल   राहुल   वैजनाथ   माने  ( निवृत ) यांनी दिली आहे.              या   कार्यक्रमास   जिल्ह्यातील   सर्व   कार्यालये / संस्थांचे   कार्यालय   प्रमुख ,  कर्मचारी   व   नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही    जिल्हा   सैनिक   कल्याण   अधिकारी ,  रायगड - अलिबाग ले .  कर्नल   राहुल   वैजनाथ   माने  ( निवृत )  यांनी   केले    आहे . ०००००००

जिल्हास्तरीय युवा महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

    रायगड दि.4 (जिमाका) :   महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या वतीने पी.एन.पी कॉलेज गोंधळपाडा-वेश्वी येथे नुकताच जिल्हा युवा महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. यावेळी पी.एन.पी. कॉलेजचे प्राचार्य पोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर, तहसिल कार्यालयातील अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी सचिन निकम, परीक्षक म्हणून लाभलेले सोनावणे, डॉ.ऍड.निहा राऊत, प्राजक्ता कोकणे, वंदना आंब्रे, ॲड. कला ताई पाटील, समीर मालोदे, डॉ. मेघा घाटे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार आदी मान्यवर व जिल्ह्यातील युवक-युवा वर्ग उपस्थित होते. या महोत्सवात लोकगीत, लोकनृत्य, एकांकीका, पथनाट्य, कथा लेखन, वक्तृत्व,    पाककला, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, फोटोग्राफी यांसारख्या अनेक स्पर्धा पार पडल्या. तसेच दोन दिवस चाललेल्

वंध्यत्व निवारण शिबिराचा जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा

  रायगड दि.4 (जिमाका) :  महाराष्ट्र शासन व रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 122 पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत दि.20 नोव्हेंबर ते दि.19 डिसेंबर या पूर्ण महिन्यात प्रत्येक गावात एक वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जनावरांमधील वंध्यत्व निवारणासाठी वंध्यत्व निवारण शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून घोषित केला जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या जनावरांचे वंध्यत्व निवारण करून दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचे सर्व नियोजन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड जिल्हा परिषद डॉ.श्यामराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. 0000000