ओबीसी प्रवर्गाकरिता मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


 

रायगड,दि.07 (जिमाका) :- इतर मागास प्रवर्गातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कच्चे घर असल्यास ग्रामीण भागासाठी रु.1 लाख 20 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटूंबास मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत 269 चौरस फूट घरकुल मंजूर करण्यात येते. या घरकुलासाठी ग्रामीण क्षेत्राकरिता रु.1 लाख 20 हजार अनुदान देय आहे.

या योजनेकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जागेची आवश्यक कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेचा लाभ ज्या इच्छुक लाभार्थ्यांना घ्यावयाचा आहे, त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती येथे संपर्क साधावा. तसेच योजनेच्या अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छीभवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंटमेरी स्कूल समोरील, श्रीबाग रोड, अलिबाग यांचे कार्यालय येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक