Posts

Showing posts from March 10, 2019

रायगड जिल्ह्यातील मतदार याद्या अचूक व परिपूर्ण आवश्यक सर्व दुरुस्त्या पूर्ण-- उप जिल्हा निवडणूक अधिकारी

रायगड दि १५: जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या   मतदार यादीसंदर्भात आवश्यक त्या दुरुस्त्या व इतर बदल केले असून बिनचूक व परिपूर्ण यादी तयार केली आहे अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली. मतदारांनी कोणत्याही प्रकारे संभ्रम ठेवू नये तसेच मार्गदर्शनासाठी हेल्प लाईन, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्कात राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मतदार फोटो ओळखपत्रांचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून २२ हजार ५३९ दुबार नोंदणी मतदार वगळले   आहेत. एवढेच नव्हे तर ६५ हजार १०७ जणांच्या दुरुस्त्या झाल्या असून २३ हजार १३६ मृत मतदारांची नावे वगळली   आहेत. जिल्ह्यात २६९३ मतदान केंद्रे असून सर्व ठिकाणी सुविधा पुरविण्यात येत असून त्यात दिव्यांग मतदारांचाही प्राधान्याने विचार केला आहे. जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ च्या अंतिम यादीनुसार एकंदर २२ लाख २५९ मतदार असून   ११ लाख १९ हजार ७४३ पुरुष व १० लाख ८० हजार ५१३ महिला , आणि ३ तृतीय पंथी मतदार आहेत. 00000

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गावठी दारुचे अड्डे उध्वस्त करण्यास सुरुवात -------------------- लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

रायगड दि १५; आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनूषंगाने रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विजय डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे भरारी पथकांनी गावठी दारू तयार करण्याच्या ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केल्याची माहिती विभागाच्या रायगड जिल्हा अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली.जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यात २८४ गुन्हे दाखल करण्यात आले. तर गावठी दारू निर्मितीतील १२५ जणांना अटक करण्यात अली आहेत. ८ वाहनेही जप्त करण्यात आली असून सर्व मुद्देमाल ४३ लाख ८७ हजार   रुपयांचा आहे. त्याप्रमाणे परमिट रूमशी संबंध नसलेल्या ढाब्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच आहे,   रात्रभर चालणारे ढाबे, तिथे विकली जाणारी बेकायदेशीरपणे दारू, ऑर्केस्ट्रा बार, लेडीज बार यांच्यावरही कारवाईचा बडगा उपसला आहे नुकत्याच झालेल्या कारवाईत श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवे आगार वडवली येथून १८०० लिटर रसायन, ताडी १४५ लिटर, २०० लिटर गावठी दारू असा ५४ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व ५४ गुन्हे दाखल केले. कर्जत तालुक्यातील आसल   ,पळ

निवडणूक काळात दारू, पैसे वाटपावर करडी नजर ठेवणार आगामी सण -उत्सवाचा उपयोग राजकीय कारणांसाठी करू दिला जाणार नाही -- जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी

Image
रायगड दि १४: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु   झाली असून जिल्ह्यात प्रवेशाच्या सर्व ठिकाणी चेक पोस्ट्सवर विशेषतः दारूची वाहतूक, मोठ्या प्रमाणावर पैसे नेण्यात येत आहेत का यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क   व पोलीस यंत्रणेला देखील अवैध दारूचे अड्डे पूर्णपणे उध्वस्त करण्यास सांगण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकारांना दिली.            आज त्यांनी राजस्व सभागृहात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची बैठक घेऊन पोलीस व इतर यंत्रणांना निर्देश दिले. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक अनिल   पारस्कर,   अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे,   निवासी उप जिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होत्या. आगामी महत्वाच्या धार्मिक व सामाजिक सणांचा वापर करून कोणीही राजकीय स्वरूपाची भाषणे करू नये असे आवाहनही त्यांनी केले असून यासंदर्भातही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. विशेषतः: शिमगोत्सव, छत्रपत

लोकसभा निवडणूक- 2019 आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर-जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग , जि . रायगड ( जिमाका ) दि .11 :-   लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता दि . 10 मार्च पासून लागू झाली आहे. ही निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडतांनाच आदर्श आचारसंहिते च्या काटेकोर अंमलबजावणीवर   भर राहिल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले . लोकसभा निवडणूक 2019 च्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे , निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पद्मश्री   बैनाडे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने , जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला आदी उपस्थित होते . यावेळी माहिती देण्यात आली की, रायगड लोकसभा मतदार संघात ति सऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि .28 मार्च , 2019 रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द होणार असून नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि .4 एप्रिल , 2019 असा आहे . नामनिर्देशन पत्राची छाननी शुक्रवार दि . 5 एप्रिल , 2019 रोजी होणार आहे . उमेदवारी अर्ज मागे घे

14 मार्च रोजी निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा

अलिबाग , जि . रायगड ( जिमाका ) दि .11 :-   सर्व निवृत्तीवेतन धारकांसाठी अवर सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील सुचनानुसार गुरुवार दि.14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पोलीस परेड मैदान अलिबाग येथे निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित केला आहे. रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास हजर रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग फिरोज मुल्ला यांनी केले आहे. 00000