14 मार्च रोजी निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 :- सर्व निवृत्तीवेतन धारकांसाठी अवर सचिव, वित्त
विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील सुचनानुसार गुरुवार दि.14 मार्च रोजी सकाळी 11
वाजता पोलीस परेड मैदान अलिबाग येथे निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित केला
आहे. रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास
हजर रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग फिरोज मुल्ला यांनी केले
आहे.
00000
Comments
Post a Comment