Posts

Showing posts from November 12, 2023

परसातील कुक्कुट पालन योजनेसाठी श्रीवर्धन, सुधागड-पाली, कर्जत व अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे

  रायगड (जिमाका) दि.17  :-   रायगड जिल्हयामध्ये परसातील कुक्कुट पालनास प्रोत्साहन देत ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना 2017-18 पासून राबवण्यात येत असून श्रीवर्धन ,  सुधागड-पाली ,  कर्जत व  अलिबाग या तालुक्यातून पुरेसा प्रतिसाद अद्याप पर्यंत न मिळाल्याने या योजनेसाठी नव्याने अर्ज मागवण्यात येत आहेत, अशी माहिती  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांनी दिली आहे. चार तालुक्यातून प्राप्त अर्जातून प्रत्येकी एका लाभार्थ्याची जिल्हा निवड समिती मार्फत निवड करण्यात येईल. या योजने अंतर्गत  तपशील- जमीन-2500 चौ . फूट (1000 चौ. फुटाचे 2 शेड) खाद्य ,  अंडी साठवणूक व अंडी उबवणूक यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र खोल्या.  शासन/लाभार्थी सहभाग-  जमीन व खोल्या लाभार्थीच्या स्वत : च्या मालकीच्या असतील,  एकूण अंदाजित किंमत-  निरंक. तपशील-  प्रति 1000 चौ. फुटाचे 2 पक्षी गृहाचे बांधकाम ,  स्टोअर रूम ,  पाण्याची टाकी ,  विद्युतीकरण,  शासन/लाभार्थी सहभाग-  शासन + लाभार्थी,  एकूण अंदाजित किं

जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशु सप्ताहाचे उद्घाटन

    रायगड (जिमाका) दि.17  :-   जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथील प्रसुती कक्ष व नवजात बालक    कक्ष यांच्या माध्यमातून "राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह " कार्यक्रम दि.15 ते दि.21 नोव्हेंबर 2023 या कालावधी करिता साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात (गुरुवार, दि. 16 नोव्हेंबर 2023) रोजी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्याहस्ते  कार्यक्रमाचे उदघाटन करुन करण्यात आली. या कार्यक्रमाचे घोषवाक्य "आरोग्य संस्था व समुदायाद्वारे नवजात शिशूंचे पालनपोषण"    (Nurturing    Newborn lives Through Community - Facility Engagement") हे आहे. या कायर्क्रमाचा   मुख्य उद्देश हा नवजात मृत्यु    दरमहा एक संख्येवर आणणे,    नवजात शिशु यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा (आरोग्य संस्थास्तरीय व सामाजिकस्तरीय ) यावर विशेष भर देणे,    नवजात शिशु यांना    देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेविषयी समाजामध्ये जनजागृती करणे असा आहे.    या कार्यक्रमाकरिता    अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शितल घुगे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.आशिष मिश्रा, डॉ.आशिष पाटील, एसएनसी