Posts

Showing posts from August 13, 2023

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न

Image
                                            रायगड(जिमाका)दि.19:-   “ शासन आपल्या दारी ”  उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व ग्रामीण प्रगती फाउंडेशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी मेमोरियल हॉल, निजामपूर रोड, मुंबई-गोवा हायवे जवळ, ता.माणगाव येथे जिल्ह्यातील बेरोजगार महिलांसाठी ‍विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.    यावेळी माणगाव उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार, ग्रामीण प्रगती फाउंडेशन सी.ई.ओ. मंगेश डफळे, संचालिका ज्योती डफळे, उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के उपस्थित होते.    यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयाकडून दरवर्षी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन प्रथमच होत असून याचा आनंद होत आहे.  या रोजगार मेळाव्याला जवळप

महिलांसाठी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.18:-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व ग्रामीण प्रगती फाउंडेशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 02.00 वाजेपर्यंत गांधी मेमोरियल हॉल ” , निजामपूर रोड, मुंबई-गोवा हायवे जवळ, ता.माणगाव या ठिकाणी जिल्ह्यातील बेरोजगार महिलांसाठी ‍विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.              जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे.  सदर रोजगार मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. सदरच्या पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या बेरोजगार महिलांसाठी जिल्हयातील विविध महामंडळे यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना विषयीची माहिती व मार्गदर्शन उमेदवारांना दिले जाणार

आदिवासी समाजातील युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना

    रायगड(जिमाका)दि.18:-  शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक मर्या. यांच्यामार्फत आदिवासी समाजातील युवक-युवतींना स्वयंरोजगार करण्याच्या मूळ उद्देशाने अल्प व्याजदराने एन.एस.टी.,एफ.डी.सी,नवी दिल्ली योजनेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कर्ज योजनांसाठी पात्रता अटी पुढीलप्रमाणे :-  लाभार्थी अर्जदार आदिवासी समाजाचा असावा. लाभार्थीची वर्यामर्यादा सर्व योजनांसाठी 18 वर्ष ते 45 वर्ष या दरम्यान असावी. वार्षिक कौटुंबिक ग्रामीण व शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा रु.3 लाख इतकी आहे. महिला सशक्तीकरण योजनेसाठी लाभार्थ्यांकडून कोणताही वैयक्तिक सहभाग मार्जीन मनी अपेक्षित नाही. तसेच जात प्रमाणपत्राबाबत महिलेच्या पतीचे अथवा मुला मुलींचे जात प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरावे. महिला सशक्तीकरण कर्जावर द.सा.द.शे.4 टक्के एवढया अल्पदराने सरळ व्याज आकारले जाते. तहसिल   किंवा उपविभागीय कार्यालय यांचा जातीचा दाखला (फक्त आदिवासी)  शाळा सोडल्याचा दाखला(वय वर्ष 18ते45), तहसिल कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला (ग्रामीण व शहरी भागासाइी रु.3 लाख इतके असावे), व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्वयंघोष

1 हजार 734 गावांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापनाचे काम

  रायगड (जिमाका)दि.18:-  राज्यात स्वामित्व योजनेंतर्गत गांवठाण भूमापन हा महत्वपूर्ण प्रकल्प सुरु आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 15 तालुक्यांमध्ये एकूण 2 हजार 136 महसूल गांवे असून त्यापैकी 1 हजार 867 गावठाण असलेली गावे आहेत. यापैकी 133 गावांमध्ये नगर भूमापन झाले असून उर्वरित 1 हजार 734 गावांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत गांवठाण भूमापनाचे काम करण्यात येणार आहे.    यापैकी    1 हजार 664 गावांमध्ये सर्व्हे ऑफ इंडियाकडून ड्रोन फ्लाईंग करण्यात आले असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सचिन इंगळी यांनी कळविले आहे.   रायगड जिल्ह्यातील 1 हजार 734 गावांमधील 1 हजार 664 गावांपैकी 671 गावांचे ग्राऊंड ट्रूथींग व चौकशीचे (GT+ Enqiory)काम पूर्ण करण्यात आलेले आहे.त्यापैकी 207 गावांचा डाटा ईपिसीआयएस (e-PCIS) आज्ञावली मध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. तर 150 गावांच्या सनदा तयार करण्यात आलेल्या असून 85 गावांच्या सनद वाटप करण्यात आलेल्या आहेत. सनद वाटपासाठी 15 ऑगस्ट रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आज अखेर पर्यंत 170 गावांचे मिळकत पत्रिका (Property Card) तयार करण्यात आली असून सदर गावांचे परिरक्षण सुरु झाल

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन सद्भावना दिनाची उपस्थितांना प्रतिज्ञा

Image
               रायगड(जिमाका)दि.18:-  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात  माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंती निमित्त  तहसिलदार (सगयो) ज्ञानदेव यादव  यांनी  राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   या निमित्ताने त्यांनी   उपस्थितांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली.             यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 000000