1 हजार 734 गावांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापनाचे काम

 

रायगड (जिमाका)दि.18:- राज्यात स्वामित्व योजनेंतर्गत गांवठाण भूमापन हा महत्वपूर्ण प्रकल्प सुरु आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 15 तालुक्यांमध्ये एकूण 2 हजार 136 महसूल गांवे असून त्यापैकी 1 हजार 867 गावठाण असलेली गावे आहेत. यापैकी 133 गावांमध्ये नगर भूमापन झाले असून उर्वरित 1 हजार 734 गावांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत गांवठाण भूमापनाचे काम करण्यात येणार आहे.  यापैकी  1 हजार 664 गावांमध्ये सर्व्हे ऑफ इंडियाकडून ड्रोन फ्लाईंग करण्यात आले असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सचिन इंगळी यांनी कळविले आहे.

 रायगड जिल्ह्यातील 1 हजार 734 गावांमधील 1 हजार 664 गावांपैकी 671 गावांचे ग्राऊंड ट्रूथींग व चौकशीचे (GT+ Enqiory)काम पूर्ण करण्यात आलेले आहे.त्यापैकी 207 गावांचा डाटा ईपिसीआयएस (e-PCIS) आज्ञावली मध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. तर 150 गावांच्या सनदा तयार करण्यात आलेल्या असून 85 गावांच्या सनद वाटप करण्यात आलेल्या आहेत. सनद वाटपासाठी 15 ऑगस्ट रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आज अखेर पर्यंत 170 गावांचे मिळकत पत्रिका (Property Card) तयार करण्यात आली असून सदर गावांचे परिरक्षण सुरु झाले आहे. 

 या मिळकत पत्रिका नागरिकांकरिता http://digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या मिळकत पत्रिकांमुळे गावठाणातील सर्व मालमत्तांचे, घरांचा नकाशा,सिमा व क्षेत्र याची माहिती उपलब्ध आहे. मालमत्तेचा अधिकार पुरावा म्हणून मिळकत पत्रिका व सनद मिळाल्यामुळे मिळकतीवर कर्ज उपलब्ध् होत असल्याने नागरिकांचा  फायद्या होत आहे. यामुळे जागेची मालकी हक्क,तंटे/वाद तसेच जमिन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक टळणार आहे. याबरोबरच शासन मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होणार आहे.

यामुळे ग्रामपंचायतींकडून गावातील रस्ते, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा,नाळे यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखण्यास मदत होईल. तसेच मिळकतींना बाजारपेठेत तरळता येऊन गावांची अर्थिक प्रत उंचावेल व ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी बांधकाम परवानगी अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होत आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक