Posts

Showing posts from December 26, 2021

भाताची एकरी 12.30 क्विंटल दराने खरेदी करण्याचे जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.31 (जिमाका) :- पणन हंगाम 2021-22 मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविल्यानुसार एकरी 12.30 क्विंटल भाताची खरेदी करण्यात यावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविल्यानुसार भाताची उत्पादकता घेवून खरेदी करावयाची आहे. ही बाब भात खरेदी केंद्राना यापूर्वीच कळविण्यात आली आहे. याबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित केंद्रावर सक्त कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पणन अधिकारी श्री.ताटे यांनी कळविले आहे.               ०००००

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत एकूण रु.94 हजार 150 चा मुद्देमाल जप्त

    अलिबाग,जि.रायगड,दि.31 (जिमाका) :- दि.30 डिसेंबर व दि.31 डिसेंबर 2021 रोजी   राज्य उत्पादन शुल्क चे आयुक्त श्री. कांतीलाल उमाप   व   विभागीय उपायुक्त कोकण विभाग, ठाणे श्री.सुनिल चव्हाण यांच्या   आदेशानुसार रायगड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली   राज्य उत्पादन शुल्क मुरुड विभागाचे निरीक्षक श्री.आनंद पवार, दुय्यम निरीक्षक खालापूर, श्री.रितेश खंडारे, दुय्यम   निरीक्षक   श्री.मानकर, दुय्यम निरीक्षक रोहा श्री.संजय   वाडेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती रजनी नरहरी, जवान निमेश नाईक, जवान गणेश घुगे, महिला जवान श्रीमती अपर्णा पोकळे व   महिला जवान वर्षा दळवी वाहनचालक   नरेश गायकवाड   व पंच   या पथकाने गाव मौजे आंजरूंग,आदिवासी वाडी, ता.खालापूर   येथे दि.30 डिसेंबर 2021   रोजी गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर छापा टाकून एक   दुचाकी वाहन व   दि.   31 डिसेंबर 2021   रोजी   सकाळी   07:45 वाजता एक चारचाकी सेंट्रो   वाहन एमएच-04 बीक्यू 5958, दोनशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत आसताना   रोहा-चणेरा रस्त्यावर कुंभोशी गावाजवळ   पाठलाग करून   पक

ओमायक्रॉनचा वाढता प्रादूर्भाव अन् नव वर्ष साजरे करण्यासाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले सुधारित आदेश जारी

    अलिबाग,जि.रायगड,दि.31(जिमाका):- करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत. आगामी काळात लग्नसराई, इतर सण आणि नवीन वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आहेत. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणखी काही निर्बंध लादणे अत्यावश्यक आहेत.   नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी दि.31 डिसेंबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्यानुषंगाने शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मागील चार दिवसात रायगड जिल्ह्यात दि. 27 डिसेंबर 2021 रोजी एकूण 29 रुग्ण, दि. 28 डिसेंबर 2021 रोजी एकूण 48   रुग्ण तसेच दि. 29 डिसेंबर 2021 रोजी एकूण 88 रुग्णांची व दि.30 डिसेंबर 2021 रोजी 99 रुग्णांची कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात ए

ओमायक्रॉनचा वाढता प्रादूर्भाव अन् नव वर्ष साजरे करण्यासाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सुधारित आदेश केले जारी

  अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. हे यू.एस.ए आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये प्रबळ प्रकार बनले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात आधीच एकूण 88 ओमायक्रॉन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत. गेल्या दोन महिन्यांत प्रथमच राज्यात दररोज 1 हजार हून अधिक पॉझिटिव्ह केसेसची नोंद होत आहे. आगामी काळात नाताळ सण, लग्नसराई, इतर सण आणि नवीन वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणखी काही निर्बंध लादणे अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी साथरोग अधिनियम, 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अन्वये प्राप्त अधिकारातून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दि.25 डिसेंबर 2021 रोजीच्या र

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'स्वाधार योजना' विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत - सहाय्यक आयुक्त श्री. सुनिल जाधव

  अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज डिसेंबर 2021 पर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांनी केले आहे. महानगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटर पर्यंत क्षेत्रातील व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी महाविदयालयातील प्रवेशित विदयार्थ्यांनी सन 2020-2021 व 2021-2022 या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना कोविड-19 च्या प्रादूर्भाव कालावधीमध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेताना खालील बाबींचे उपस्थिती प्रमाणपत्र सादर करावे. या कालावधीमध्ये संस्था / महाविद्यालये प्रत्यक्ष बंद असल्या तरी सन 2020-2021 व 2021-2022 या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे,

शेतीविषयक विविध सबसिडीकरिता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

    अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी त्यांना मागणी करावयाच्या कृषी अवजारे, ठिबक व तुषार सिंचन, हरितगृह शेडनेट, पंपसेट, पाईपलाइन यांच्या सबसिडीकरिता अर्ज करावेत. त्याचप्रमाणे कीटकनाशक, बुरशीनाशक औषधांसाठी ज्या कृषी सेवा केंद्रांवर महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास केंद्र (MAIDC) यांची औषधी विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्या ठिकाणावरून खरेदी केल्यास 50% अनुदान देण्यात येत आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्वला बाणखेले यांनी केले आहे.   00000

आयुक्त (कृषी) धीरज कुमार यांनी घेतली विविध प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांची भेट

  अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- आयुक्त (कृषी) धीरज कुमार यांनी दि.26 डिसेंबर 2021 रोजी अलिबाग तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी डॉ.संदेश पाटील (पालांबे) यांच्या फळबागेत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी/ संस्था यांचे प्रतिनिधी व इतर शेतकरी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे समस्या जाणून घेतल्या व त्यावर मार्गदर्शनही केले. तसेच त्यांनी अलिबाग येथील पांढरा कांदा उत्पादक गटास भेट दिली. त्यावेळी गटाचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील, प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे व इतर शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पांढरा कांदा भौगोलिक नामांकनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढवून तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र पांढरा कांदा उत्पादनाखाली आणावे, शेतकरी ते थेट ग्राहक विक्री करावी, तसेच जास्तीत जास्त कांदा निर्यात होईल, असे पाहावे असेही श्री.धीरज कुमार यांनी सांगितले. याशिवाय श्री.धीरज कुमार यांनी नागाव येथील श्री.अनिल विष्णू पाटील यांच्या शेतावरील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत करण्या

युवकांनी युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्यावतीने युवांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी 15 ते 29 वयोगटातील युवक - युवतींसाठी दि.30 डिसेंबर 2021 रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या सूचनेप्रमाणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येईल. या युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या प्रकारांचा फक्त समावेश राहील. जिल्ह्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणारे, तसेच शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी, कला अध्यापन, नाट्य मंडळातील कलाकार इत्यादी सर्वांसाठी या युवा महोत्सवामध्ये विनामूल्य सहभाग घेण्याची संधी देण्यात येते. या युवा महोत्सवामध्ये विजेता ठरणाऱ्या संघाला विभागीय स्तरावर सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. या युवा महोत्सवाचे आयेाजन पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडा