युवकांनी युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्यावतीने युवांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी 15 ते 29 वयोगटातील युवक - युवतींसाठी दि.30 डिसेंबर 2021 रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या सूचनेप्रमाणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येईल. या युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या प्रकारांचा फक्त समावेश राहील. जिल्ह्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणारे, तसेच शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी, कला अध्यापन, नाट्य मंडळातील कलाकार इत्यादी सर्वांसाठी या युवा महोत्सवामध्ये विनामूल्य सहभाग घेण्याची संधी देण्यात येते. या युवा महोत्सवामध्ये विजेता ठरणाऱ्या संघाला विभागीय स्तरावर सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.

या युवा महोत्सवाचे आयेाजन पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम यांच्याशी मो.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा. प्रवेश अर्जासह नोंदणी केलेल्या संघांना ऑनलाईनबाबत लिंक व इतर माहिती देण्यात येईल. या युवा महोत्सवामध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग तसेच विजेत्यांना प्रावीण्य प्रमाणपत्र देण्यात येईल.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या युवा महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांनी केले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक