Posts

Showing posts from November 28, 2021

माथेरान येथील शासकीय भूखंडांबाबत जिल्हा प्रशासनाकडून न्यून मुद्रांक शुल्क वसुलीची कार्यवाही सुरू

  अलिबाग,जि.रायगड,दि.01, (जिमाका) :- मुद्रांक जिल्हाधिकारी रायगड यांनी मौजे माथेरान येथील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पारित हस्तांरतण व नूतनीकरणांच्या आदेशांच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीनुसार, साधारणतः सन 2010 पासून तपासणी केलेल्या प्रकरणांमध्ये करारनामा दस्त निष्पादित न होता, नोंदणी शुल्क/ मुद्रांक शुल्क शासन जमा करण्यात आल्याचे दिसून येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पडताळणी समिती गठित करुन, तपासणी करणे व मुद्रांक शुल्क वसूल करण्याबाबत कार्यवाही करण्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अपर जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली दि.18 नोव्हेंबर 2021 रोजी या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पडताळणी केल्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पारित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने संबंधित भाडेपट्टाधारक यांनी अद्यापही करारनामा/ दस्त निष्पादित न केल्याने, या कार्यालयामार्फत पा

उजळोली पाझर तलावाच्या 2 कोटी किंमतीच्या दुरुस्ती प्रस्तावास शासनाची मान्यता मिळविण्यात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यशस्वी

    अलिबाग,जि.रायगड,दि.01, (जिमाका) :- खालापूर तालुक्यातील उजळोली पाझर तलावाच्या तब्बल रु.2 कोटी 61 लक्ष 8 हजार 780 इतक्या किंमतीच्या दुरुस्ती प्रस्तावास सातत्याने वैयक्तिक पाठपुरावा करून शासनाची मान्यता मिळविण्यात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यशस्वी झाल्या आहेत. खालापूर तालुक्यातील उजळोली येथील पाझर तलाव हे काम उजळोली गावाच्या स्थानिक नाल्यावर सन 1988 मध्ये रायगड जिल्हा परिषद यांच्यामार्फत पूर्ण झाले होते. ही योजना ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत दुरुस्ती कार्यक्रम आराखड्यात प्राधान्य क्रमांक एक मध्ये आहे. या पाझर तलावाचा संकल्पित पाणीसाठा 531.49 सघमी व मूळ सिंचन क्षमता 30.4 हेक्टर असून याच्याव दुरुस्तीनंतर 30.4 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. जुलै-ऑगस्ट 2019 च्या अतिवृष्टीमुळे या तलावाच्या दगडी बांधकामातील विहिरीजवळ गूरळ पडल्यामुळे मुख्य विमोचक, पोहोच कंड्यूट आरसीसी पाईप व त्या बाजूच्या भरावातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने माती धरणास धोका होऊन फुटू नाही यासाठी धरणाच्या मजबुतीकरणासह नवीन प्रचलित पद्धतीने माती धरणाचे नूतनीकरण होणे आवश्यक होते. ही बाब जिल