Posts

Showing posts from July 7, 2019

सखी केंद्र ठरले पिडीत महिलांसाठी आधारवड

       अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथी महिला व बालविकास विभागाचे सखी केंद्र हे पिडीत, संकटग्रस्त महिलांसाठी खरेखुरे आधारवड ठरले आहे. महिला व बाल विकास विभागातर्फे सखी केंद्र सुरु करण्यात आले आहेत.   (One Stop Centre) म्हणून   पिडीत, अत्याचारग्रस्त, संकटग्रस्त   महिलांना सर्व प्रकारची सेवा एकाच छताखाली मिळावी   यासाठी   ही सखी केंद्र सुरु करण्यात आले. रायगड जिल्ह्यातही हे केंद्र सुरु आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे कार्यालयाअंतर्गत हे केंद्र आहे. याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,   या केंद्रामार्फत   मोफत निवास , वैद्यकीय सेवा, कायदेशीर सेवा, समुपदेशन,   संकटकाळात प्रतिसाद व संकटमुक्ती सेवा,   गुन्हा दाखल करण्यासाठी   किंवा कौटूंबिक अत्याचाराचा अहवाल तयार करण्यासाठी पोलीस सहाय्य,   अन्य शासकीय विभागांची मदत,   व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा इ. सर्व सेवा मोफत पुरविल्या जातात. जुन 2017 मध्ये हे केंद्र कार्यान्वित झाले.   तेव्हा पासून आतापर्यंत 986 प्रकरणे केंद्राकडे नोंद झाले. त्यातील कौ

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे स्थलांतर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12 -    शासनाच्या मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र रायगड- अलिबागचे स्थलांतर झाले आहे,असे मत्स्य व्यवसाय   प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर राजम यांनी कळविले आहे. हे कार्यालय जुन्या मच्छि मार्केट समोर, अलिबाग कोळीवाडा , अलिबाग येथून दि.1 जुलै पासून   102/103, बी विंग, पहिला मजला, समृद्धी सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्या. घरत आळी, मु.पो. ता. अलिबाग जि. रायगड पिन-402201 येथे स्थलांतरीत झाले आहे. तरी या कार्यालयाशी होणारा पत्रव्यवहार या पत्त्यावर करावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर राजम यांनी केले आहे. 00000

रिजर्व बॅंकेचा उपक्रमःआर्थिक साक्षरता मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12 -    भारतीय रिजर्व बॅंकेच्या आर्थिक सहभागीता आणि विकास उपक्रमांतर्गत आज अलिबाग येथे क्षेत्रिय आर्थिक साक्षरता मेळावा घेण्यात आला. यामेळाव्यास रिजर्व बॅंकेचे जनरल मॅनेजर आर. के. महाना यांची विशेष उपस्थिती होती. या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील महिला बचत गट संचालिका, शेतकरी गटांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.             अलिबाग शहरातील आदर्श भवन येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिजर्व बॅंकेचे जनरल मॅनेजर आर. के. महाना, रिजर्व बॅंकेचे बी.एम कोरी, नाबार्डचे सुधाकर रघतवान,   लीड बॅंकेचे व्यवस्थापक आनंद निंबकर, ग्रामिण रोजगार प्रशिक्षण संस्थेचे( आरसेटी) विजय कुलकर्णी तसेच जिल्ह्यातील विविध बॅंकांचे शाखा व्यवस्थापक, तसेच सेवा केंद्र संचालक आदी उपस्थित होते. यावेळी महाना यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बोलतांना महाना यांनी उपस्थितांना   आर्थिक साक्षरता आणि   बॅंकांशी निगडीत आर्थिक व्यवहारांची आवश्यकता सांगितली. बॅंकांद्वारे केले जाणारे आर्थिक व्यवहार हे आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 112 मि.मि.पावसाची नोंद़

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 112.04 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1397.08 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 65.00 मि.मि., पेण-210.00 मि.मि., मुरुड-62.00 मि.मि., पनवेल-99.40 मि.मि., उरण-74.00 मि.मि., कर्जत-176.20 मि.मि., खालापूर-127.00 मि.मि., माणगांव-143.00 मि.मि., रोहा-88.00 मि.मि., सुधागड-82.00 मि.मि., तळा-88.00 मि.मि., महाड-66.00मि.मि., पोलादपूर-80.00, म्हसळा-120.00 मि.मि., श्रीवर्धन-80.00 मि.मि., माथेरान-232.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1792.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 112.04 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   44.46 टक्के इतकी आहे. 0000

नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणःराजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाति/नवबौध्द विद्यार्थ्यांकडून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष याप्रमाणे- ·          महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती/नवबौध्द प्रवर्गातील असावा. ·          महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा ·          कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 6.00 लाखापेक्षा कमी असावे. ·          पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची कमाल वयोमर्यादा 25 वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष इतकी असेल. ·          अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असला पाहिजे. तथापी त्यापुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करु शकतील परंतु त्यांचा विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपलब्ध्‍ न झाल्यास करण्यात येईल. ·          विद्यार्थी इ. 10 व 12 वी ची परिक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ

योजना : गुणवंत खेळाडू पेन्शन योजना

            भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांनी गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे सक्रिय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे यासाठी गुणवंत खेळाडू पेन्शन योजना लागू केली आहे.             ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि आलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. निवडीचे निकष- सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्यांचे ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त/गुणवंत खेळाडूस खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच पेन्शन 30 वर्षांपासून (किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या/तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील, परंतु अशी पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीड

वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पोर्टलवर अर्ज पाठवावे

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे अर्ज करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात आलेली माहिती अशी की, कमर्शियल पायलट लायसन्स कार्सकरिता शिष्यवृत्ती हि योजना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत राबविण्यात येत होती. तथापि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनान्वये अनु. जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता 1 एप्रिल, 2018   पासून   भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतर्गंत कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स हा अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. सदरील (CPL) कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स ही योजना केंद्र शासनाच्या Top Class Education Scheme (SC) या योजनेमध्ये समाविष्ट केली आहे. त्यामुळे या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज विद्यार्थ्यांनी   थेट केंद्रशासनाकडे   नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलव्दारे सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे. 00000

कौशल्य दिनः सोमवारी पनवेल येथे रोजगार उद्योजकता मार्गदर्शन

अलिबाग, जि. रायगड, दि.11(जिमाका)- कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यांचे मार्फत सन 2015 पासुन सुरू करण्यात आलेल्या जागतिक युवा कौशल्य दिन (दि.15 जुलै) निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयामार्फत सोमवार दि.15 रोजी पनवेल येथे रोजगार – उद्योजकता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. औद्यागिक प्रशिक्षण (ITI) मुंबई-पुणे हायवे,एस टी स्टॅंड जवळ, पनवेल येथे सोमवारी सकाळी 11 वा. युवक व युवतींनी उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक शा.गि.पवार यांनी केले आहे. 00000

आयुष्यमान भारत योजना : लाभार्थ्यांचे ई- कार्ड ई- सेवाकेंद्र व संलग्नित रुग्णालयात उपलब्ध

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही योजना आता केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. त्यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांना द्यावयाची ई गोल्ड कार्ड ही नजिकच्या ई- सेवा केंद्र वा संलग्नित रुग्णालयात उपलब्ध असून ती लाभार्थ्यांनी प्राप्त करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी केले आहे. राज्यातील योजनेचे स्वरुप- राज्यात ही योजना महात्मा फुले जनआरोग्य योजना या नावाने राबविण्यात येत आहे. नॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या सहभागाने ही योजना राबविण्यात येत आहे.   या योजनेत   दारिद्र्य रेषेखालील पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटूंबे व दारिद्र्यरेषेवरील   केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंब तसेच शेतकरी आत्महत्या ग्रस्त 14 जिल्ह्यातील   शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटूंबांना विमासंरक्षणाद्वारे वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात. या योजनेअंतर्गत प्रति कुटूंब दीड लाख रुपये इतक्या विमा संरक्षण रकमेच्या मर्यादेपर्यंत मोफत उपचार केले जातात.   तर मुत्रपिंड प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे शनिवार दि.13 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शनिवार दि.13 रोजी सकाळी दहा वा. महाड येथे आगमन व महाड येथील विकास कामांबाबत आढावा बैठक, स्थळ-शासकीय विश्रामगृह महाड, जि.रायगड. सकाळी 11 वा.   महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे युनिट हेड यांचे समवेत बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह महाड,जि.रायगड.दुपारी 12 वा. भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय, महाड चे उद्घाटन. स्थळ-श्रीराम मंदिरासमोर, चवदार तळे महाड, जि.रायगड. दुपारी साडेबारा वा. 194 महाड विधानसभा मेळावा. स्थळ- श्री विरेश्वर मंदिर, महाड. दुपारी दोन ते तीन राखीव. दुपारी तीन वाजता महाड येथून माणगांवकडे प्रयाण. दुपारी चार वा. माणगांव येथे आगमन व माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन विस्तारीत इमारतीचा उद्घाटन सोहळा. स्थळ-अशोकदादा साबळे विद्यालय, माणगांव, जि.रायगड. दुपारी साडेचार वाजता माणगांव येथून पलावा ड

महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 - राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री(सा.उ.वगळून)   हे रविवार दि.14 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी दोन वाजता नरेंद्र भिमराव पाटील,4अे/2,भक्ती सागर को.ऑप हौ.सोसायटी धाटाव ता. रोहा, जि. रायगड यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी पावणे चार वाजता रोहा येथून वाहनाने वडखळ बायपास पुलाकडे रवाना. दुपारी सव्वा चार वा. वडखळ बायपास पूल येथे आगमन व पुलाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा. सायं.पाच वा. वडखळ   येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह खंडाळा, ता.मावळकडे रवाना. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 37 मि.मि.पावसाची नोंद़

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 37.43 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1285.04 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 3.00 मि.मि., पेण-70.200 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-37.80 मि.मि., उरण-16.00 मि.मि., कर्जत-34.80 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-30.00 मि.मि., रोहा-44.00 मि.मि., सुधागड-38.00 मि.मि., तळा-67.00 मि.मि., महाड-29.00मि.मि., पोलादपूर-34.00, म्हसळा-46.00 मि.मि., श्रीवर्धन-40.00 मि.मि., माथेरान-53.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 598.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 37.43 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   40.89 टक्के इतकी आहे. 0000

जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीची स्थापना

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -    जिल्ह्यातील प्राणी कल्याण व मानवहितकारक कार्य कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील पांजरपोळ/गेाशाळा संस्थाचे अध्यक्ष व शासकीय स्तरावरुन नामनिर्देशित केलेल्या   निवड करुन जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समीतीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असून   व शासनाने नियुक्त केलेले अशासकीय अध्यक्ष भगवान बाबु ढेबे, अशासकीय सदस्य, सदाशिव वामनराव ठोंबरे, डॉ. संगिता सुर्यकांत चिजगोठे, रमेश हरिभाऊ वारदे, चंद्रकांत लक्ष्मण पवार हे आहेत तर या समितीचे सदस्य सचिव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के हे आहेत. या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.8) पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चोपडे, डॉ. शहा, चौलकर,   आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित समिती सदस्यांना शासनाचे अधिनियम, शासननिर्णय, अशासकीय सदस्यांच्या जवाबदाऱ्या, कर्तव्य आदीं बाबत उपजिल्हाधिकारी मठपती यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी व कायद्याचे पालन करावे असे निर्देश त्यांनी उपस्थितांना

जिल्ह्यातील पाणी प्रकल्प सुरक्षित असल्याचे यंत्रणांचे अहवाल

       अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8 -    रायगड जिल्ह्यातील विविध   प्रकल्पांची पाहणी करुन त्याचे अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. यासंदर्भात संबंधित प्रकल्पांची पाहणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग,   कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद रायगड,   जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण विभाग या यंत्रणांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले असून जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार,जिल्ह्यात काळ प्रकल्प व हेटवणे प्रकल्प हे दोन मध्यम प्रकल्प असून   त्यांच्यावर आधारीत 49 लघु पाटबंधारे योजना व 36 पाझर तलाव आहेत. कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या उमटे पाणी साठवण तलावाचा बंधारा सुस्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.   सध्या या तलावात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.   धरणाची मुख्य माती भिंत व पाणी सांडवा, ट्रेंच गॅलरी सुस्थितीत आहे. या धरणाच्या सांडवा भिंतीचे व खालील बाजूस असलेल्या व

पेण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे 16 रोजी वाहनांचा लिलाव

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8 -   उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण जि. रायगड वाहन कर, पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव गळवार दि.16 जुलै रोजी दुपारी तीन ते चार या वेळेत    उप प्रादेशिक   परिवहन कार्यालय याचे तपासणी पथ (Test Track) जिते ता.पेण   जि. रायगड या ठिकाणी करण्यात येणार आहे,असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि.रायगड यांनी कळविले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये   नोंदणी प्राधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारात जारी नोटीशीद्वारे वाहन मालकांना, ताबेदारांना वित्त्‌दात्यांना जाहीररित्या कर व दंड भरुन वाहन सोडवून नेण्यासाठी अवगत केले आहे.   वायुवेग पथकांनी वेळोवेळी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. वाहनांच्या मालकांनी,ताबेदारांना ,वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर व दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दि.12 जुलै पर्यंत लेख हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांच्या लिलाव मंगळवार दि.16 जुलै रोजी

अनु.जाती, नव बौद्ध स्वयंसहाय्यता बचतगटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर, रोटा व्हेटर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8 -    अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 1.5 अन नॉप ट्रीपींग ट्रेलर,0.8 मी रोटा व्हेंटर   यांचा पुरवठा करण्यात येतो. सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता रायगड जिल्ह्याकरीता इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयात उपलब्ध आहेत,असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सदर प्रस्ताव सादर करणारे बचत   गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत, स्वयंसहायता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनु.जाती व नवबौद्ध   घटकांतील असावेत,बचत गट अधिकृत मंडळाकडून रजिस्टर असावे,बचत गटाच्या नावे बँकेत पासबुक असावे, बचत गटातील सदस्यांचे जातीचा दाखला,रहिवासी दाखला,शाळेचा दाखला, रेशनकार्ड व मतदान ओळखपत्र इत्यादी   आवश्यक कागदपत्र असावीत,बचत गटाची निवड झाल्यास 10 टक्के रक्कम स्वहिस्सा (35000/-) भरावी लागेल.तद्नंतरच शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. या सर्व अटींचा पुर्तता करुन परिपूर्ण विहित नमून्यातील अर

सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8 -    राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत यावर्षी 33 कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षत अलिबाग विभागातर्फे स.म. वडके विद्यालय चोंढी किहीम मध्ये येथे शनिवारी (दि. 6 रोजी) हरितसेनेचे माध्यमातून वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न   झाला. यावेळी शाळेमध्ये मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व मुलांना वृक्ष लागवडीचे महत्व् समजावून सांगितले. तसेच चोंढी शाळा ते चोंढी नाका अशी वृक्ष दिंडी काढण्यात आली.यावेळी वृक्षारोपण व वृक्ष दिंडी कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाचे सहा. वनसंरक्षक आर.एम.म्हात्रे, वनक्षेत्रपाल सामाजिक वनिकरण परिक्षेत्र अधिकारी श्रीमती गायत्री देवराज, शाळेच्या संचालक मंडळाच्यावतीने श्री. गणेश आमले. शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती कामिनी राऊत, वनपाल अलिबाग डी.एस.सोनावणे व कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 00000

सहकारी संस्थांना लेखापरिक्षण बंधनकारक

     अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8 -   सर्व सहकारी संस्थांना   महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 75(1)मधील तरतूदीनुसार वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून (31 मार्च पासून ) चार महिन्यांच्या मुदतीत (म्हणजे 31 जुलै पर्यंत) संस्थेचे लेखापरिक्षण पूर्ण करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे सूद्धा बंधनकारक आहे,असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश शेरे व जिल्हा विशेष लेखापरीक्षक   उमेश तुपे यांनी कळविले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,   कलम 79(1अ) मधील तरतूदीनुसार दिनांक 30 सप्टेंबर पूर्वी कलम 79(1अ) च्या (क) ते (च) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वार्षिक अहवाल आर्थिकपत्रके इत्यादी विवरणपत्रे निबंधकास ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.   कलम 79 (1ब) नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेत सन-2019-20 या वर्षासाठी संस्थेचे लेखापरिक्षक करुन घेण्यासाठी लेखापरिक्षकाच्या नामतालीकेतून लेखापरिक्षकाची नेमणूक   करणेबाबत ठराव घेवून नियुक्ती करणे बंधनकारक आहे.   वैधानिकदृष्टया बंधनकारक असलेली कार्यवाही न करणाऱ्या सहकारी संस्थेच्या सं

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 45 मि.मि.पावसाची नोंद़

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 45.90 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1165.77 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 6.00 मि.मि., पेण-86.20 मि.मि., मुरुड-88.00 मि.मि., पनवेल-15.00 मि.मि., उरण-13.00 मि.मि., कर्जत-39.20 मि.मि., खालापूर-66.00 मि.मि., माणगांव-50.00 मि.मि., रोहा-39.00 मि.मि., सुधागड-44.00 मि.मि., तळा-79.00 मि.मि., महाड-42.00मि.मि., पोलादपूर-35.00, म्हसळा-21.00मि.मि., श्रीवर्धन-40.00 मि.मि., माथेरान-71.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 734.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 45.90 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   37.10 टक्के इतकी आहे. 0000