योजना : गुणवंत खेळाडू पेन्शन योजना



            भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांनी गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे सक्रिय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे यासाठी गुणवंत खेळाडू पेन्शन योजना लागू केली आहे.
            ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि आलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.
निवडीचे निकष- सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्यांचे ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त/गुणवंत खेळाडूस खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच पेन्शन 30 वर्षांपासून (किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या/तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील, परंतु अशी पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झाले असतील.
अ.क्र.
स्पर्धेचे नाव
दरमहा मानधन रक्कम
1
ऑलिम्पिक/पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक
20,000/-
2
सुवर्ण पदक विश्वचषक/विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार)
16,000/-
3
रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार)
14,000/-
4
सुवर्ण  पदक  कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स
14,000/-
5
रौप्य व कास्य पदक  कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स
12,000/-
 टिप :- दर चार वर्षांनी आयोजित होणा-या विश्वचषक/विश्व अजिंक्यपद स्पर्धा करिता सदरची योजना लागू राहिल.
            याबाबत संबधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रासक प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहित नमुन्यातील आर्जवर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव/संचालक क्रीडा व युवक सेवा यांची स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.
            राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनोचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, रायगड, अलिबाग.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक