Posts

Showing posts from April 9, 2023

जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे निवड चाचणी परीक्षा दि.29 एप्रिल रोजी

  अलिबाग,दि.13 (जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर ता.माणगाव येथे इयत्ता सहावी वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी आयोजित करण्यात आलेली जवाहर नवोदय निवड चाचणी परीक्षा शनिवार, दि.29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेत होणार आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र   https://cbseitms.rcil.gov.in/ nvs/ ,  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी लवकरात लवकर आपले प्रवेश पत्र  https://cbseitms.rcil.gov.in/ nvs/  या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावेत, असे आवाहन प्राचार्य, के.वाय.इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री.संतोष आर. चिंचकर, मो.9881351601, श्री.सतीश जमदाडे, मो.9890343452/9284669382,  श्री.केदार र. केंद्रेकर, मो.9423113276/7038215346 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ०००००००

उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

                 अलिबाग,दि.13 (जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :              शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता कॉर्पोरेट पार्क, हेलिपॅड, खारघर, नवी मुंबई येथून हेलिकॉप्टरने शिरगाव हेलिपॅड, ता.मंडणगड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.  रात्रौ 10.15 वाजता राजापूर येथून कोकण कन्या एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण. शनिवार दि. 15 एप्रिल 2023 रोजी पहाटे 4 वाजता कोकण कन्या एक्सप्रेसने पनवेल रेल्वे स्थानक, जि.रायगड येथे आगमन व राखीव. ०००००००

उन्हाळ्यात जनावारांना लू पासून वाचविण्यासाठीची पशुसंवर्धन विभागाकडून उपचार पध्दती जाहीर

    अलिबाग,दि.13 (जिमाका) :-   उन्हाळ्यात जनावरांची काळजी घेताना काय करावे, लू झालेल्या जनावरांना थंड ठिकाणी बांधावे. उन्हापासून आणि लू पासून वाचविण्यासाठी जनावरांना राहण्यासाठी करण्यात आलेल्या शेडसमोर गोणपटाचे पडदे लावावे. उन्हाळ्यात जनावरांमध्ये लू लक्षण आढळत असतात. वातावरण गार नसल्याने जनावरांच्या शेडमध्ये हवा खेळती नसल्याने आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसणे या कारणामुळे तू होत असतो. अधिक उष्णता वाढली तर जनावरे दगावण्याची शक्यता असते संकरित जनावरे उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत. या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावळीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे इ. उपाय योजल्यास संकरित गाई उन्हाळ्यातही माजावर येतील. गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्ह

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भातील आक्षेप अथवा हरकती असल्यास सादर करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन

    अलिबाग,दि.13 (जिमाका) :- शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत  “ शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ”, “ उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार ”   “ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ”   “ शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार ”, “ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) ”,  असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.14 डिसेंबर 2022 शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह संचालनालयाच्या  https://sports.maharashtra. gov.in , या संकेतस्थळावरील पुरस्कार (Award) टॅब मध्ये दि.13 ते दि.15 एप्रिल 2023 या कालावधीपर्यंत प्रकाशित करण्यात आलेला आहे. प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यात नमूद केलेल्या माहिती संदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास त्या दि.13 ते दि.15 एप

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग 18 तास अभ्यासक्रम उपक्रम संपन्न

    अलिबाग,दि.13 (जिमाका) :-   भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अलिबाग-रायगड येथे सलग 18 तास अभ्यासक्रम उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.   डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिलेल्या अधिकारांमुळेच सर्वसामान्य व्यक्ती देखील  लाल दिव्यापर्यंत पोहोचू शकतो. या महामानवाचा आपण सदैव आदर्श ठेवला, पाहिजे व शैक्षणिक जीवनात मुलांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकराप्रमाणेच अभ्यास करायला पाहिजे, असा संदेश अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील  यांनी यावेळी  दिला.    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अंजन गायकवाड, डॉ.सुजाता चहांदे, डॉ.आडके, डॉ.घुगे, डॉ.विशाल उबाळे, डॉ. शिल्पा नारायणकर, डॉ.वागमोडे, डॉ.शिंदे, डॉ.कासले, डॉ.पवार, डॉ.नाझिया, डॉ.श्रुती पांडे, डॉ.पंकज कांबळे, डॉ.सौरभ पाटील, डॉ. कृष्णा बडगिरे, डॉ.राऊत, डॉ.मनीष, डॉ.अंकिता ताठे, डॉ.प्रियांका आंबेकर, डॉ.अदिती थळे, मयूर, सुबोध यांनी परिश्रम घेतले.. 00000000

कर्तव्य दक्ष तहसिलदार विजय तळेकर यांनी आदिवासी कुटुंबाला दिली नव संजीवनी

    अलिबाग,दि.13(जिमाका):-   मौजे हेदूटने ता.पनवेल येथील कानी बाळ्या पोकला या आदिवासी कुटूंबांच्या सर्व्हे नंबर 123/1/ब 32 गुंठे जमीन मिळकतीवर एका परप्रांतीय व्यक्तीने अवैध पद्धतीने कब्जा केला होता. त्या संदर्भात तहसिलदार पनवेल श्री.विजय तळेकर यांच्या कोर्टात दाद मागितली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या चौकशी आणि सुनवण्या घेवून, फक्त तीन महिन्यात ती जमीन आदिवासी कुटुंबाला परत मिळवून दिली आणि तसे आदेश निर्गमित केले. जी जमीन मालकीची असून ही त्यातून 1 रुपयाचे उत्पन्न न मिळणाऱ्या पोकला कुटुंबीयांना दरमहा 45 हजार रुपये भाडे मिळणार आहे. या पैश्यामुळे आदिवासी कुटुंबाची आर्थिक अडचण कायम स्वरुपी मिटणार आहे. तसेच त्या जमिनी संदर्भातील इतर विषय देखील मार्गी लागणार आहेत. हे सर्व प्रकरण आणि झालेल्या अन्याया विषयी अनंता बाळ्या पोकला याने त्यांचे चिरनेर आश्रम शाळेचे शिक्षक श्री.डोईफोडे यांना सांगितले. डोईफोडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले की, तुम्ही उरण सामाजिक संस्थेची मदत घ्या आणि त्याकरिता प्रा.राजेंद्र मढवी यांना भेटा. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.सुधाकर पाटील, सर चिटणीस संतोष प

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

               अलिबाग, दि.11 (जिमाका):- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला तहसिलदार डॉ.सतिश कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.               यावेळी सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांच्यासहित जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

जुने वृत्तपत्र रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्यास मुदतवाढ

  अलिबाग,दि.11 (जिमाका) :- जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील जुन्या वृत्तपत्रांची रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात दि.20 मार्च 2023 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग,जिल्हाधि कारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग येथे सादर करावीत असे दि.15 मार्च 2023 रोजी वृत्त प्रकाशित करुन कळविण्यात आले होते.  परंतु यासाठी जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग कार्यालयाकडून स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात सादर करण्यास दि.17 एप्रिल 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू लोखंडी कपाटे, लोखंडी रॅक विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

    अलिबाग,दि.15 (जिमाका) :-  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील लोखंडी कपाटे-5, व्हिलचेअर-1, मॉनिटर 2 नग, प्रिंटर 3 नग, सीपीयू 3 नग, कीबोर्ड 4 नग, टेबल फॅन 1 नग यांची विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात दि.17 एप्रिल 2023 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा

             अलिबाग,दि.11 (जिमाका):-  राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई हे दि.14 ते दि.16 एप्रिल 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :             शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथून खाजगी वाहनाने खारघर, नवी मुंबईकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता खारघर, नवी मुंबई येथे आगमन व महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम पूर्वतयारीची पाहणी व आढावा. सोईनुसार खारघर, नवी मुंबई  येथून मुंबईकडे प्रयाण.             शनिवार, दि.15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता पावणगड (बी-4), शासकीय निवासस्थान येथून खारघर, नवी मुंबईकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता खारघर, नवी मुंबई येथे आगमन व महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम पूर्वतयारीची पाहणी. राखीव व मुक्काम.             रविवार,दि.16 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता खारघर,नवी मुंबई येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार खारघर,नवी मुंबई येथून मुंबईकडे प्रयाण.

सागरी इतिहासाच्या पुनरुत्थानाला प्रोत्साहन देणे हा “सॅम नो वरुण” रॅलीचा उद्देश ---रघुजीराजे आंग्रे

                 अलिबाग,दि.11 (जिमाका):-  दीपगृहे, ऐतिहासिक गावे, समुद्रकिनारे इत्यादींवर लक्ष केंद्रित करून, भारतीय नौदलाचे उद्दिष्ट भारताच्या समृद्ध सागरी वारसाबद्दल जागरुकता वाढविणे आणि सागरी इतिहासाच्या पुनरुत्थानाला प्रोत्साहन देणे हे   “ सॅम नो वरुण: ”  रॅलीचा उद्देश असल्याचे प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी भारतीय नौदलाच्या  “ सॅम नो वरुण: ”  रॅलीच्या सदस्यांच्या स्वागत प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले.   यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार (नि.) गोविंद राव साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.  रघुजीराजे आंग्रे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याबाबत सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले, भारतीय नौदलावर भारत देशाच्या सागरी भागांचे संरक्षण आणि रक्षण करण्याची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पेलत असताना देशाच्या सागरी हितसंबंधांना उत्तेजन देण्यास

इयत्ता 12 वी च्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वदेस फाऊंडेशन तर्फे उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची संधी

  अलिबाग,दि.11 (जिमाका) :-  इयत्ता 12 वी च्या पुढे शिक्षण घेणाऱ्या रायगड  जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, सुधागड (पाली) या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्वदेश  फाऊंडेशन तर्फे उच्च शिक्षणाची शिष्यवृत्ती संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी पात्रता पुढीलप्रमाणे :  12 वी मध्ये किमान 60 टक्के मार्क, उत्पन्न 8 लाख 50 हजारच्या आत असले पाहिजे.  यासाठी मिळणारा लाभ-  वार्षिक उत्पन्न, कॉलेज फी व वसतिगृह यांच्यानुसार 25, 40, 50, 60 आणि 75 टक्के इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेत, दोन हप्त्यात जमा होईल. जिल्ह्यातील 12 वी च्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी  दि.15 एप्रिल 2023 पर्यंत https://swadesmis.surveycto. com/collect/stage1excellence_ scholarship_application_fy_ 2324?caseid =  या लिंकचा वापर करून फॉर्म भरावा. अधिक माहितीसाठी स्वदेस फाऊंडेशनच्या बाळासाहेब माने 9922495033 किंवा विनोद पाटील 8379966767 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वदेश फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी केले आहे. 00000000

महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान सोहळा पूर्वतयारी इतिहासात नोंद घेतली जाईल, ‘न भूतो - न भविष्यती’ असा हा कार्यक्रम करु - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

              अलिबाग ,  दि. 10 (जिमाका) :- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवार ,  दि.16 एप्रिल 2023 रोजी कॉर्पोरेट पार्क ,  खारघर ,  नवी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे ,  यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढणार आहे. म्हणूनच आपण सर्वांनी झोकून देऊन काम करुया. इतिहासात नोंद घेतली जाईल ,  ‘न भूतो - न भविष्यती असा हा कार्यक्रम करु ,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खारघर येथे केले.             मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान पूर्वतयारी आढावा बैठक नवी मुंबई ,  खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.             या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ,  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई ,  आमदार  भरत गोगावले ,  आमदार प्रशांत ठाकूर ,  आमदार महेश बालदी ,  सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय ,  कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर ,  कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस म