महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान सोहळा पूर्वतयारी इतिहासात नोंद घेतली जाईल, ‘न भूतो - न भविष्यती’ असा हा कार्यक्रम करु - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            अलिबाग, दि. 10 (जिमाका) :- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवार, दि.16 एप्रिल 2023 रोजी कॉर्पोरेट पार्कखारघरनवी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान केला जाणार आहेयामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढणार आहे. म्हणूनच आपण सर्वांनी झोकून देऊन काम करुया. इतिहासात नोंद घेतली जाईल‘न भूतो - न भविष्यती असा हा कार्यक्रम करुअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खारघर येथे केले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान पूर्वतयारी आढावा बैठक नवी मुंबईखारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार  भरत गोगावलेआमदार प्रशांत ठाकूरआमदार महेश बालदीसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजयकोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकरकोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार,  नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकरठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगरसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जीसहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदेरायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसेठाणेचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेरायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटीलनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेउपायुक्त तिरुपती काकडेपंकज भुसानेसांस्कृतिक कार्य संचालनालय सहसंचालक श्रीराम पांडे आदी उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 हा आदरणीय अप्पासाहेबांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे. शासनाची आणि प्रशासनाची ही सर्वस्वी जबाबदारी आहे. ते म्हणाले कीकोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीसाठी समन्वय राखण्यासाठी नेमावा. सर्वच घटकांनी जबाबदारीचे भान ठेवून दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी.

            लाखों नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने काळजीपूर्वक काम करावेअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतापिण्याचे पाणीशौचालय या व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावेअसे सूचित केले.

            पोलिसांना सूचना देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावीपोलिसांबरोबर ट्राफिक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे35 ते 40 हजार वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याबाबतही योग्य ती खबरदारी घेण्यात यावीलोकांची कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगितले.

            नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांची विशेष जबाबदारी आहे. आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व तयारी चोख ठेवावी. वैद्यकीय अधिकारीवैद्यकीय पथके यांनी पूर्ण तयारी ठेवावी, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी इतक्या तातडीने आपण बैठक घेत आहोत याबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करावा आणि त्याप्रमाणे काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वीशिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सज्ज होऊयाया दिमाखदार कार्यक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअसे आश्वासित उद्गार शेवटी काढले.

            आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम ज्या मैदानात होणार आहे त्या मैदानाची व तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी मैदानातील व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली.

0000


 

वृत्त क्र. 1230


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड