Posts

Showing posts from October 1, 2023

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना येत्या वर्षभरात स्वतःची इमारत देणार --महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्यस्तरीय पोषण माह सांगता सोहळा मंत्री श्रीमती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न पोषण आहार प्रदर्शन, पारितोषिकांचे वितरण, विविध कार्यक्रमांनी उपक्रमाची सांगता

  रायगड,दि.06 (जिमाका) :-   जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना येत्या वर्षभरात स्वतःची इमारत देण्याचा प्रयत्न असून यासाठी जिल्ह्यात होणारे काम राज्यासाठी मॉडेल ठरणार आहे. सध्या भाड्याच्या जागेत असणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःच्या इमारतीत जाता यावे यासाठी बांधकामासाठी सध्या असलेल्या तरतुदीमध्ये मोठी वाढ करण्यात येईल ज्यामुळे तेथे असणारा हॉल तसेच पोषण आहारासाठी चे किचन व स्वच्छतागृह यासह अंगणवाडी केंद्र सुसज्ज असेल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.   राज्यस्तरीय पोषण माह सांगता समारंभ तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत अलिबाग येथे करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड, महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्त विजय क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त अनंत खंडागळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास)  श्रीम.निर्मला कुचिक, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विनीत म्हात्रे, नागरी ब

प्रधानमंत्री फसल विमा योजना फळपीक विमा योजना आंबिया बहर करिता प्रस्ताव सादर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

    रायगड,दि.06(जिमाका):-  शासनाने आंबा व काजू पिकांसाठी पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार 2023-24 सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. रायगड जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई ही कंपनी नेमलेली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमासंरक्षण मिळते. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना ऐच्छिक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून ई पिक पाहणी करून फळ बागेची नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड, फळ पिकाची बाग उत्पादनक्षम असल्याबाबत स्वयंघोषणापत्र फळ बागेचा Geo Tagging केलेला फोटो व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत, वि.का.स. सेवा सोसायटीत अथवा सीएससी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी.       या योजनेंतर्गत पुढील जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. काजू पिकासाठी अवेळी पाऊस 1 डिसेंबर ते 2

जिल्हयातील 210 सार्वत्रिक ग्रामपंचायती, 69 ग्रामपंचायती, 99 सदस्य तसेच 10 सरपंच रिक्त पदांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान; निवडणूक ठिकाणी आचारसंहिता

    रायगड,दि.06(जिमाका):- जिल्हयातील 210 सार्वत्रिक ग्रामपंचायती  69 ग्रामपंचायतीमधील 99 रिक्त सदस्य पदासाठी तसेच 10 सरपंच रिक्त पदासाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने काल निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचार संहिता लागू राहील, अशी माहिती  उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे. तसेच निवडणूक होणाऱ्या जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतची यादी प्रसिद्ध केली आहे.             राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे  : तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक–शुक्रवार,दि.6 ऑक्टोबर, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ–सोमवार, दि.16 ऑक्टोबर ते  शुकवार, दि.20 ऑक्टोबर, वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) सोमवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पासून छाननी संपेपर्यंत,  नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका उपलब्ध

           रायगड,दि.05(जिमाका):-    जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग येथे करिअर विषयक साहित्य, ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका योजना उपलब्ध आहे. ही योजना राज्य शासनाची असून बदलत्या आर्थिक व्यवस्थेमुळे पारंपारीक नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बहुतेक बेरोजगार तरुणाला रोजगाराच्या नवनवीन संधीबाबतची माहिती नसल्याने तथा त्यास अनुरूप पात्रता ते धारण करीत नसल्याने मोठया संख्येने राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवार हे रोजगारापासून वंचित राहतात. यासाठी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयात बेरोजगारांना विविध व्यवसाय मार्गदर्शन साहित्य, स्पर्धा परिक्षांची माहिती देणारी मासिके, पुस्तके इ.उपलब्ध करुन देणे,अभ्यासिकेची व्यवस्था करणे, नवीन नवीन संधींची व रोजगाराची माहिती उपलब्ध करुन देणे या उद्देशाने ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे. या ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेत विविध विषय

राज्यस्तरीय पोषण माह सांगता समारोह व आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन

    रायगड,दि.05(जिमाका):-   केंद्र पुरस्कृत पोषण अभियानांतर्गत दरवर्षी राष्ट्रीय पोषण महिना हा उपक्रम राबविण्यात येतो. त्याप्रमाणे महिला व बाल विकास विभागामार्फत सन 2023 या वर्षात दि. 01 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यात पोषण माह कार्यक्रम राबविण्यात आला. या पोषण माह चा सांगता समारंभ तसेच अंगणवाडी सेविका ,  मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार ,  दि.06 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता होरायझन हॉल ,  रेवस रोड ,  अलिबाग या ठिकाणी करण्यात आले,  असल्याची माहिती  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास)  रायगड जिल्हा परिषद ,  अलिबाग श्रीम.निर्मला कुचिक  यांनी दिली आहे. आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार :-   हर्षदा हिरामण दोरे (कासू ,  ता.पेण),उल्का उमेश कुलकर्णी (रामराज , ता. अलिबाग),पुजा संजय चांगोले (गव्हाण ,  ता. पनवेल). आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार  :- कल्पना नथू वरे (कोंढावे ,  कर्जत1) ,   राधिका रामचंद्र ऐनकर (खांडस ,  कर्जत 2) ,  रंजना संजय संसारे (विन्हेरे ,  महाड) ,  वृषाली लिडकर (बागमांडला ,  श्रीवर्धन) ,  भारती नामदेव गावंड

सक्रीय क्षयरुग्ण शोधमोहिम रायगड जिल्ह्यात यशस्वीपणे राबविली जाणार--मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत वास्टेवाड

    रायगड,दि.05(जिमाका):-  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत सक्रीय क्षयरुग्ण शोधमोहिम अभियान दि.3 ते दि.23 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये अतिजोखमीच्या भागात राबविण्यात येत आहे. तरी या मोहिमेमध्ये नागरीकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या घरी येणाऱ्या पथकास घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यास सहकार्य करावे तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिम रायगड जिल्हयात 100 टक्के यशस्वीपणे राबवून जास्तीत जास्त नवीन क्षयरुग्ण शोधून उपचाराखाली आणले जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत वास्टेवाड यांनी दिली आहे. या मोहिमेसाठी रायगड जिल्ह्यातील एकूण 16 क्षयरोग पथकांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर आशा स्वयंसेविका पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रिय कर्मचारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे पथक घरो घरी जाऊन भेटी दरम्यान क्षयरोगाविषयी माहिती तसेच मार्गदर्शन करणार आहेत. निदान झालेल्या क्षयरुग्णांना केंद्र शासनामार्फत त्यांचे उपचार सुरू

"एक तारीख एक तास” स्वच्छता मोहिमेला रायगड जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद जिल्हाधिकारी डॉक्टर म्हसे यांच्या उपस्थितीत काशीद समुद्रकिनारी मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.घार्गे यांच्या उपस्थितीत वर्सोली बीचवर स्वच्छता मोहिम

अलिबाग (जि.मा.का.), दि.१ :-जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण  ठिकाणी   “एक तारीख एक तास” ही स्वच्छता मोहीम लोकसहभागातून मोठ्या उत्साहात संपन्न झाली. लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, नागरिक, विद्यार्थी , स्वयंसेवक,  शासकीय अधिकारी कर्मचारी आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या मोहिमेत  सहभाग घेतला. उद्या (२ ऑक्टो) रोजी महात्मा गांधी यांची जयंती असून त्यानिमित्त स्वच्छतेची मोहीम ही लोक चळवळ झाली दिसून आले. नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.        जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते . काशिद समुद्र किनारी येथे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या हस्तेे शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी , मुरुड तहसीलदार राहुल शिंदे,  यासह  काशीद विद्यालय, अंजुमन इस्लाम महाविद्यालयाचे विद्यार्थी, युवक ,ग्रामस्थ , स्थानिक लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.      जिल्हाधिकारी डॉ म्हसे यांच्या उपस्थितीत काशीद समुद्रकिनारी नागरिकांचा मोठा सहभाग लाभला.  स्वच्छत

जिल्ह्यात गावागावात स्वच्छता अभियान संपन्न

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. श्रमदान मोहिमेअंतर्गत गावागावात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले होते. लाखो हातांनी मिळून जिल्हा स्वच्छ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वांनी श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचे दृश्य परिणाम आज पहावयास मिळाले. प्रत्येक गावागावात उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियान अंतर्गत सार्वजनिक परिसर, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्रार्थनास्थळे, बाजार, बस स्थानक, समुद्रकिनारे, नदी किनारी, तलाव परिसर यासह इतर ठिकाणी

जिल्ह्यातील विविध स्थानकांवर रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खाद्य पदार्थ व सुविधा जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाची तातडीने कार्यवाही

  अलिबाग (जिमाका) दि. १:--पनवेल कळंबोली येथे रेल्वे मालगाडी घसरल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासी गाड्यांचा वाहतुकीवर परिणाम झाला . रायगड जिल्ह्यातील विविध स्थानकांवर रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खाद्य पदार्थ व आवश्यक सोयी पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित तालुक्यातील महसूल,  पोलिस व शासकीय विभागांकडून तातडीने कार्यवाही करण्यात आलीे.     यावेळी जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवाशांना मदत करीत  खाद्यपदार्थांची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. प्रवाशांना जेवण पाकिटे देण्यात आले.  प्रवासी रेल्वे गाड्या आणि प्रवाशांना सुरक्षितता व सुविधा पोहोचवत मदत केली गेली.        पेण रेल्वे स्टेशन येथे अंदाजे बाराशे प्रवासी होते या सर्वांकरिता पाणी, चहा , बिस्कीट, केळी, समोसे आणि वडापाव याची सोय करण्यात आली होती. तसेच खिचडी उपलब्ध करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेकरिता पोलीस अधिकारी  उपस्थित होते.       कोलाड  रेल्वे स्थानकातील गाडी क्रमांक -09017 मडगाव -उदाना एक्सप्रेस,  रोहा-स्थानकातील गाडी क्रमांक 22653 ट

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

     अलिबाग, दि. 2 (जिमाका):- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि  भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री  यांना  जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार मनोज गोतारने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.        यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते.

कुष्ठरोग दुरीकरणासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास जिल्ह्यात महात्मा गांधी जयंती पासून सुरुवात

अलिबाग (जिमाका)दि.२:-आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून, जिल्ह्यात आज महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हा कृती नियोजन आराखडानुसार या नावीन्यपूर्ण रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवात झाली आहे.  जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोग दुरीकरणाकरिता जिल्हा कृती नियोजन आराखडा (District Strategic Plan For Leprosy Elimination by 2027) तयार करण्यात आला आहे. कृती नियोजनानुसार कुष्ठरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट सन २०२७ पर्यंत गाठायचे आहे. रायगड जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये एकूण ८४५ नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचार देण्यात आले. चालू वर्षात २८९ रुग्ण उपचार घेत आहेत.   नावीन्यपूर्ण रायगड निकुष्ठ मित्र उपक्रम  विसाव्या शतकाच्या मध्यापासून कुष्ठरोग उपचाराने पूर्ण पणे बरा होणारा आजार झाला आहे. आता तर तो नियमित उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोग फारसा संसर्गजन्य नसतानाही आणि रोगजनकता कमी असूनही, आजही या रोगाशी संबंधित मानला जाणारा कलंक आणि भेदभाव मोठ्या

पेण येथे जेष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

    रायगड,दि.3(जिमाका):-  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या वतीने नगरपालिका सभागृह, पेण 3 रा मजला येथे (शनिवार, दि.30 सप्टेंबर) रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव, पेण बार वकील संघटना अध्यक्ष अॅड.बी.व्ही.म्हात्रे, जेष्ठ वकिल अॅड. काटकर, अॅड.तेजस्विनी नेने, पेण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  रामदास पाटील,  कार्यालय अधिक्षक श्रीमती माधुरी पाटील,  गृहपाल संदिप कदम, कनिष्ठ लिपिक श्रीमती राजेश्री म्हात्रे तसेच पेण मधील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण सुनिल जाधव यांनी सामाजिक न्याय विभाग व शासनामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, आरोग्य शिबीर, कायदे, जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन या विषयी मार्गदर्शन केले. तसेच ॲड.बी.व्ही.म्हात्रे, अॅड. काटकर यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांसाठी कायद्यातील तरतूदी याविषयी माहिती दिली. पेण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी जेष्ठ नागरिकांच्या समस