Posts

Showing posts from November 13, 2022

खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा बैठक संपन्न

Image
लोकाभिमुख योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दिल्या सूचना अलिबाग, दि.18 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांविषयी संबंधित विभागांच्या विभाग स्तर / जिल्हास्तरावरील अधिकारी तर काही राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांविषयीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लोकाभिमुख, लोकोपयोगी विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, कृषी

मांडुळ जातीच्या सापाची विक्री करणाऱ्यांविरोधात वनविभागाची कारवाई

Image
अलिबाग, दि.18 (जिमाका):-  महाड तालुक्यातील मोहोत येथील सचिन सहदेव पवार यांच्याकडे सात महिन्यांपासून मांडुळ जातीचा साप ठेवला होता. त्या सापाची विक्री करणार असल्याची माहिती सिस्केप संस्था व आऊल्स संस्थेचे प्रतिनिधी यांनी महाड वनक्षेत्रपाल श्री.आर.बी.साहू यांना दिली. प्राप्त माहितीच्या आधारे महाड वनक्षेत्रपाल श्री.साहू यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भिवघर-निगडे रस्त्यालगत दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी सापळा लावून गस्त करीत असता सचिन सहदेव पवार (रा.मोहोत, ता.महाड, जि.रायगड) व महेश रमेश मालुसरे (रा.काळीज, ता.महाड, जि.रायगड) यांना मांडुळ जातीच्या सापाची विक्री करीत असताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत त्यांच्याकडील 2 मोबाईल, 1 मोटार सायकल व 1 जिवंत मांडुळ जातीचा साप ताब्यात घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर बिरवाडी वनपाल यांनी आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम चे कलम 9, 39, 44 (अ), (4), 48 (अ), 49, 51, 52 नुसार परिमंडळ बिरवाडी रौ.गु.नं, बन्यजीव 1/2022.23 दि.16.11.2022 अन्वये वनगुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी दिली आहे. ही कारवाई रोहा उपवन

विशेष लेख: सोशल मीडियावर मेसेजेस् फॉरवर्ड करताना राहा दक्ष..! आपल्यावर सायबर शाखेचे आहे बारीक लक्ष..!

Image
कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सारासार विचार न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे मेसेजेस् पोस्ट करणे, हा एक सामाजिक अपराध आहे. त्यात प्रामुख्याने व्हाट्सॲपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस्, फोटोज्, व्हीडिओज्, पोस्टस् सारासार विचार न करता फॉरवर्ड केले जातात. या चुकीच्या कृत्यांना आळा बसण्यासाठी महाराष्ट्र सायबर व्हॉट्सॲप या मेसेजिंग प्लॅटफॉर्म वरील सर्व ग्रुप सदस्य, ग्रुप ॲडमिन्स, ग्रुप निर्माते (Creators/Owners) यांच्याकरिता महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या सायबर शाखेकडून मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली. या मार्गदर्शिकेतून काय मार्गदर्शन केले आहे, हे जाणून घेऊ या लेखातून… तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य असला तर हे करावे: ·           चुकीच्या/ खोट्या बातम्या द्वेष निर्माण करु शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करु नये. ·           आपल्या ग्रपुमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण अजून पुढे कोणालाही पाठवू नये. ·           आपण ग्रुपवर कोणतीही पोस्ट टाकल्यास व त्यावर ग्रुप ॲडमिन किंवा अन्य ग्रुप सदस्यांनी आक्षेप घेतल्यास तात्काळ ती संबंधित

पनवेल तालुक्यात “सुवर्णा” भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण

Image
अलिबाग, दि.17 (जिमाका):-  महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी सन 1944 सालापासून खरीप व रब्बी हंगामात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत असून, याबाबत महाराष्ट्र शासनाने पीक कापणी प्रयोग व्यवस्थित रितीने होण्यासाठी वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांच्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात वाटप करुन व समन्वय साधून पिक कापणी प्रयोगाची आखणी व अंमलबजावणी गेली अनेक वर्षे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील दि.13 ऑक्टोबर 2022 रोजीच्या सुधारीत यादीनुसार गावनिहाय एकूण 18 (एका गावासाठी प्रत्येकी 2 असे एकूण 36) पीक कापणी प्रयोग निश्चित केले आहेत. त्यानुसार आंबे तर्फे वाजे येथे शेतकरी बाळाराम पालांडे आणि वसंत पाटील यांच्या शेतात सुवर्णा या भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार राहूल सुर्यवंशी, मंडळ अधिकारी अजित पवार, तलाठी श्रीनिवास मेतरी, कोतवाल पद्माकर चौधरी व सिताराम वारगडा हे उपस्थित होते. शासनाकडील निर्देशानुसार दि.15 न

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण योजना कार्यशाळा संपन्न

Image
सहकारी संस्थांचे संगणकीकरण  शासनाचा एक अभिनव उपक्रम -जिल्हा उपनिबंधक   डॉ.सोपान शिंदे अलिबाग, दि.17 (जिमाका):-  आजवर देशात सहकारी बँकिंगमध्ये जे काही नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक सुरू करण्यासंदर्भात योजना आल्या त्यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सदैव रोल मॉडेल म्हणून काम केलेले आहे, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे संगणकीकरण हे भविष्यात आवश्यक असणार आहे हे अगोदरच ओळखून आमदार जयंत पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ही योजना सुरू केली आणि आज बँकेशी सलंग्न असणाऱ्या सहकारी संस्था या संगणकीकरणामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हेच काम आपल्याला येत्या काही दिवसात अधिक वेगाने आणि आधुनिकीकरण सत्यात उतरवून जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करणे अत्यावश्यक असणार आहे आणि त्याकरिता प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण हा शासनाचा अभिनव उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण योजना कार्यशाळेमध्ये केले. तसेच सहकारी संस्था सक्षमीकरणासाठी जिल्हा उपनिबंधक या नात्याने आम्ही सर्व

अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज क्रीडा मार्गदर्शक सुमा सिद्धार्थ शिरूर यांचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या वतीने सत्कार संपन्न

Image
अलिबाग, दि.17 (जिमाका):-  जिल्ह्यातील अर्जून पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध नेमबाज क्रीडा मार्गदर्शक सुमा सिद्धार्थ शिरूर यांना केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार  “ द्रोणाचार्य पुरस्कार ”  जाहीर झाल्यामुळे त्यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी रायगड तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पनवेल येथील लक्ष शूटिंग क्लब येथे पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी माणगाव तालुका क्रीडा अधिकारी श्री.राजेंद्र अतनूर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती मनिषा मानकर, पनवेल महानगरपालिका क्रीडा समन्वयक श्री.समीर रेवाळे आदी उपस्थित होते. 00000

कातकरी उत्थान अभियानाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध

Image
घेरावाडी येथे पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडकेंच्या  अध्यक्षतेखाली बैठक संपन्न   अलिबाग, दि.17 (जिमाका):-  पनवेल तालुक्यातील घेरावाडी येथील आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करण्यासाठी बुधवार, दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळ अधिकारी प्रभाकर नाईक, मनोज मोरे, तलाठी कविता बळी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री.सोलसकर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, रत्नाकर घरत आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी श्री.मुंडके यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कातकरी-आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कातकरी उत्थान अभियानांतर्गत सुरु केलेल्या  “ सप्तसूत्री ”  कार्यक्रमाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी त्यांनी पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी आदिवासी बांधवांना समजावून सांगितल्या. ही प्रक्रिया किचकट असून त्याला थोडा वेळही द्यावा लागेल हे देखील समजावून सांगितले. तसेच पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण कर

फ्रीडम रायडर बाईकर रॅलीचे खोपोलीत जंगी स्वागत

Image
अलिबाग, दि.17 (जिमाका):-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 75 बाईकर्स पुर्ण भारतभर, भारताचा सांस्कृतिक वारसा, शारिरीक स्वास्थ्य आणि बंधुभाव वृध्दींगत करण्यासाठी भ्रमंती करणार आहेत. याच आयोजनातून पुण्याहून मुंबईकडे प्रस्थान करत असताना रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खोपोली शहरात रॅलीच्या स्वागताचा आणि कौतुकाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. याप्रसंगी शुभेच्छा आणि स्वागत करण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र हातनूर, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे, जेष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार,  “ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ”  सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर, अमोल कदम, हनिफ करजीकर, दिलीप देशमुख, विजय चव्हाण, भरत शिंदे, दिवेश पालांडे आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी कर्मचारी

गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  अलिबाग, दि.17 (जिमाका):-  गोवर विषाणूपासून होणारा आजार असून गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे. ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असे आरोग्य विभागाने कळविले आहे. गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील  “ अ ”  जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते.  “ अ ”  जीवनसत्व कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर अ

कृषी विभाग माणगाव यांच्यामार्फत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे आयोजन

    अलिबाग,दि.16(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभाग माणगाव यांच्यामार्फत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे पाच दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास तळेगाव दाभाडे येथील फुलशेती, कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी संशोधन केंद्र बाभळेश्वर, कृषीथॉन शेतकरी प्रदर्शन, नाशिक कृषी प्रक्रिया उद्योग व   प्रगतशील शेतकरी इत्यादी ठिकाणास भेट देणार आहेत.   तरी माणगाव, तळा, रोहा व पाली या तालुक्यातील प्राधान्याने इच्छुक महिला शेतकऱ्यांनी आपली नोंदणी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि.19 नोव्हेंबर 2022 पूर्वी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी   आनंद कांबळे यांनी केले आहे. ०००००००

धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.30 नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ

  अलिबाग, दि.15 (जिमाका) :- खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करिता दि.10 नोव्हेंबर 2022 अखेर पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोंदणी पुरेशी झाली नाही.   त्यामुळे पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.30 नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणावर शेतकरी नोंदणी व्हावी, याकरिता यापूर्वी सूचित केल्यानुसार आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता नोंदणी सुरू झाली आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अवर सचिव संतोष कराड यांनी कळविले आहे 0000000

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 75 बाईकर्स पूर्ण भारतभर भ्रमण फ्रिडम रायडर बाईक रॅली कार्यक्रम

                  अलिबाग, दि.15 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 75 बाईकर्स पूर्ण भारतभर, भारताचा सांस्कृतिक वारसा, शारिरीक स्वास्थ्य, ई. बाबतचा प्रचार करण्यासाठी भ्रमंती करणार आहेत. ही बाईकर्स दि . 15 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातून प्रवास करणार आहेत. ए कू ण 75 दिवसांचा हा प्रवास असून देशातील 34 राज्यातून  21 हजार किलो मी टर प्रवास हे 75 बाईकर्स करणार आहेत. या कालावधीत रायगड जिल्ह्यातून त्यांचा प्रवास दि . 16 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे ते मुंबई असा जुना पुणे मुंबई हायवे मार्गाने होणार असून या फ्रिडम रायडर बाईकर्स रॅलीचे  स्वागत जिल्हाधिकारी, डॉ . महेंद्र कल्याणकर, यां च्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे होणार आहे. हे स्वागत करताना खेलो इंडिया कुस्ती कें द्रा चे कुस्तीगीर आणि खेळाडू उप स्थि त राहणार आहेत. खोपोली पासून पुढ़े ते ठाणे जिल्ह्याकडे प्रवास करणार आहेत. खोपोली ते खारघर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड त्यां च्या सोबत असतील.  या बाईकर्स क रि ता आपल्या क्षेत्रातून पुढे प्रवासाच्या वेळी  पो ली स संरक्षण (पोलि

सामजिक न्याय विभाग व इतर बहुजन विभागाशी संबंधित कार्यालयाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, व्यवस्थापक, कर्मचारी नाव व मोबाईल क्रमांकांची माहिती जाहीर

    अलिबाग, दि.15 (जिमाका) :- सामजिक न्याय विभाग व इतर बहुजन विभागाशी संबंधित महामंडळाच्या योजनांची माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेता यावा,याकरिता महामंडळाच्या कार्यालयाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, व्यवस्थापक, कर्मचारी नाव व मोबाईल क्रमांकांची माहिती पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ :- श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या.सदनिका क्र.101, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक 02141-224488, ई-मेल आयडी-dmobealibagraigad@gmail.com , व्यवस्थापक व महामंडळ कर्मचाऱ्याचे नाव श्री.नि.व.नार्वेकर, मो.9082320544,श्री.प्रतिक पाटील, मो.8625839783. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) :- श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या.सदनिका क्र.1, तळमजला, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक 02141-221307, ई-मेल आयडी-vnvjntdcraigad3@gmail.com , व्यवस्थापक व महामंडळ कर्मचाऱ्याचे नाव श्री.नि.व.नार्वेकर, मो.9082320544, श्री.राजू गिते,लिपिक, मो.9503703840. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

लोकनायक, स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

      अलिबाग, दि.15 (जिमाका):- आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे लोकनायक, स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसिलदार विशाल दौंडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.      यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 00000

विशेष लेख: ई-श्रम कार्ड - असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना

Image
असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविणे, यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा महामहोत्सव सुरु झाला आहे. जिल्ह्यात नागरी सुविधा केंद्रामार्फत ऑक्टोबर 2021 पासून नोंदणीचे कामकाज सुरु करण्यात आले. जिल्ह्यातील ज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा असंघटित कामगारांनी  www.eshram.gov.in  या लिंकद्वारे ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि रायगड कामगार उपायुक्त श्री.प्र.ना.पवार यांनी केले आहे. योजनेचे लाभ:- ●  असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. ●  शासन असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल. ●  शासनाला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या ध