Posts

Showing posts from September 13, 2020

कर्जत येथील 'रक्षा सामाजिक विकास मंडळाचा' पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान

     अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- जगभरामध्ये जीवघेण्या करोना विषाणूची परिस्थिती असून,जेथे नागरिक घराबाहेर पडायला घाबरत होते अशा महाड येथील तारीख गार्डन या  इमारत दुर्घटनेच्या  वेळी आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना नि:स्वार्थपणे  माणुसकीच्या भावनेतून सहकार्य करण्यास आलेल्या  बचावपथकांना, विविध संस्थांना व व्यक्तींना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार  सुरेश काशिद, तहसिलदार सतिश कदम यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात काल दि.18 सप्टेंबर राेजी एका  छोटेखानी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.         या  सत्कारमूर्तींमध्ये रक्षा सामाजिक विकास मंडळाचे प्रतिनिधी म्हणून श्री.अमित गुरव, सुमित गुरव यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.         जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळपुरा येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या वेळी सामाजिक व भावनिक ज

*अनोंदणीकृत उद्योजकांसाठी महास्वयंम् वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवरची सुविधा*

अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- जिल्ह्यातील ज्या उद्योजकांनी महास्वयंम् वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना तातडीच्या मनुष्यबळाची गरज आहे, अशा उद्योजकांना वेबपोर्टलवर नोंदणी न करता त्यांच्याकडे असलेली रिक्त पदे अधिसूचित करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम् या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर नावाची नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.        अनोंदणीकृत उद्योजकांनी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर  या मेनूवर क्लिक करुन  पेजवर कंपनीची माहिती भरावी. भरलेल्या माहितीच्या आधारे मोबाईलवर आलेल्या ओटीपीचा वापर करावा. ३० मिनिटात उद्योजकाच्या ई-मेल वर उमेदवारांच्या यादीची लिंक प्राप्त होईल. त्या लिंकद्वारे उद्योजकांस उमेदवारांची यादी प्राप्त  होईल. महास्वयंम् वेबपोर्टलवर सर्व सुविधा उद्योजकांसाठी मोफत आहे.  या सुविधेच्या अधिक  माहितीसाठी अथवा काही अडचण असल्यास ०२१४२-२२२०२९ या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे  आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग रायगड चे सहायक आयुक्त शा. गि. पवार  यांनी केले आह

जनतेच्या सहकार्यातून करोनाचे उच्चाटन निश्चित* *--पालकमंत्री आदिती तटकरे*

*श्रीवर्धनमध्ये "माझे कुटुंब- माझी जबाबदारी" संदेश घेऊन पालकमंत्री आदिती तटकरेंनी  नागरिकांचे केले आरोग्य प्रबोधन* अलिबाग,जि.रायगड, दि.19 (जिमाका):- करोना विषाणूचा प्रादूर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने "माझे कुटुंब-माझी जबाबदारी"ही मोहीम दि. 15 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यास सुरुवात केली आहे. जनतेच्या सहकार्यातून करोना विषाणूचा समर्थपणे सामना करीत त्याचे उच्चाटन निश्चित होईल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथे व्यक्त केला.             श्रीवर्धन नगरपरिषदेत प्रसारमाध्यम  प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बाेलत हाेत्या. यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, दर्शन विचारे  आदी उपस्थित होते .          करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे राज्यभर विविध ठिकाणी अनेक व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. ही बाब गांभिर्याने घेऊन आपण प्रत्येक ग्रामनिहाय करोना निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पंचायत समिती, नगर परिषद, आरोग्य विभाग यांच्या माध्यम

माझे कुटुंब-माझी जबाबदारी" मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

                अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :-  गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वचजण करोना विषाणूशी लढाई लढत आहोत. नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासन आणि प्रशासनही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. करोनाचा सर्वत्र वाढत असलेला प्रादूर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 15 सप्टेंबरपासून शासनाने  “ माझे कुटुंब-माझी जबाबदारी ”  या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ केला असून जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या शासनाच्या आरोग्य तपासणी पथकाला उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित "माझे कुटुंब-माझी जबाबदारी" या मोहिमेच्या जनजागृती कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.                 यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्म

महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफ पथक कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील* *--पालकमंत्री कु.आदिती तटकरे

    अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मात्र अनेक दुर्घटना घडत असतात. त्यामुळे तालुक्यातील होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी बचावकार्यासाठी महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफचे एक पथक कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित महाड येथील इमारत दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार समारंभास कार्यक्रमात त्या बोलत होत्या.        यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे,प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार सतिश कदम, तहसिलदार सुरेश काशीद आदि उपस्थित होते.      यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, नैसर्गिक आपत्तीच्या

*“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 33 हजार 249 जणांनी केली करोनावर मात*

          अलिबाग,जि.रायगड दि. 18 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 33 हजार 249 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 615 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 137, पनवेल ग्रामीण-801, उरण-182, खालापूर-268, कर्जत-241, पेण-494, अलिबाग-653, मुरुड-69, माणगाव-381, तळा-44, रोहा-441, सुधागड-58, श्रीवर्धन-55, म्हसळा-43, महाड-165, पोलादपूर-38 अशी एकूण 6 हजार 070 झाली आहे.           कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-13 हजार 552, पनवेल ग्रामीण-4 हजार 280, उरण-1 हजार 436, खालापूर-1 हजार 914, कर्जत- 1 हजार 102, पेण-2 हजार 610, अलिबाग-3 हजार 078, मुरुड-241, माणगाव- 1 हजार 136, तळा-91, रोहा-1 हजार 527, सुधागड-278, श्रीवर्धन-263, म्हसळा-232, महाड- 1 हजार 238, पोलादपूर-271 अशी एकूण 33 हजार 249 आहे.                        आज दिवस

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा

           अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :-   राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.. शनिवार दि.19 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 9.00 वा. सुतारवाडी, ता.रोहा, येथून वाहनाने ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 11.00 वा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत श्रीवर्धन येथे नगरपरिषद क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 12.00 वा. श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत म्हसळा येथे नगरपंचायत क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 1.30 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. म्हसळा येथून शासकीय वाहनाने ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा.   माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत माणगाव येथे नगरपंचायत क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 4.30 वा. माणगाव येथून शासकीय वाहनाने ता.तळाकडे प्रयाण. दुपारी 5.30 वा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाब

पनवेल महानगरपालिकेत कोविड-19च्या उपाययोजनेला प्राधान्य द्यावे* - राज्यमंत्री कु. आदिती तटकरे

  मुंबई, दि. 1७ :राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता वैद्यकीय सेवा आणि कोविड-१९च्या उपाय योजनांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, आशा सूचना उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिल्या. मंत्रालयात आज पनवेल  महानागरपालिकेतील कोविड-19 उपाय योजना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते.  कुमारी तटकरे म्हणाल्या, कोविड-19च्या रुग्णांची वाढीती संख्या पहाता येणाऱ्या काळात पालिकेच्या इतर खर्चांवर नियंत्रण ठेवून वैद्यकीय सुविधांवर अधिक भर देण्यात यावा. सद्यस्थितीत महानगरपालिका हद्दीतील डॉक्टरांची संख्या, हॉस्पिटल्स, उपलब्ध खाटा, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन पुरवठा या बाबींकडे अधिक लक्ष दयावे. `माझे कुटुंब माझी जबाबदारी` या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या सर्वेक्षणात आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींसोबत स्थानिक लोकप्रतिनीधींनी तरुण स्वयंसेवकांना सहभागी करुन घ्यावे,  तसेच या टीम नी  घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय माहिती संकलन करून योग्य मार्गदर्शन करावे आणि नागरिकांनी सुद्धाया टीमला सहकार्य करावे असे आवाहनह

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा

            अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :-   राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.. शुक्रवार दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी 9.00 वा. सुनिती शासकीय निवासस्थान मुंबई येथून शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन व महाड येथील इमारत दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 1.30 वा. जिल्हास्तरीय प्रलंबित विषयांबाब बैठक. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 3.00 वा. “ माझ कुटुंब-माझी जबाबदारी ” कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमाच्या online बैठकीस उपस्थिती. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 3.45 वा. “ माझ कुटुंब-माझी जबाबदारी ” कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत अलिबाग येथे नगरपरिषद क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 4.30 वा. मऔविम वि

इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना

  विशेष लेख क्र.28                                                                                             दिनांक :- 17 सप्टेंबर 2020   राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी या महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. कोणत्या आहेत त्या योजना जाणून घेऊ या लेखाद्वारे …!   छोटे व्यवसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1 लाख ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज नाही)   व 20 टक्के बीज भांडवल योजना.   तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज योजना परतावा योजना ( रु.10 लक्ष पर्यंत) गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत)   या योजनांचा समावेश आहे.   सन 2020-21 या वित्तीय वर्षाकरिताही या विविध कर्ज योजनांचे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या रायगड जिल्हा कार्यालयास उद्दिष्टय प्राप्त झाले आहे.   थेट कर्ज योजना (भौतिक उद्दिष्ट 12

पहिली ते दहावी शिकणाऱ्या धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

    अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :-   धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा.पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन या धार्मिक अल्पसंख्यांक इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते, तरी गरजू व पात्र धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.  नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे.  ही योजना इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व शासकीय, निमशासकी, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी आहे.   अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा.  फक्त इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट लागू राहणार नाही.  पालकांचे वार्षिक उत्पन्न एक ल

ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर

  अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यामधील 15 तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे               नवीन रास्त भाव शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करण्याकरिता जाहीरनामा काढणे व प्रसिद्ध करणे (स्थगनादेश नसल्यास) दि. 14 सप्टेंबर 2020.   संस्थांना अर्ज करण्याकरिता मुदत (30 दिवस) दि. 14 सप्टेंबर ते दि. 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत.   नवीन दुकानाकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे (30 दिवस) दि. 14 ऑक्‍टोबर ते दिनांक 13 नोव्हेंबर 2020 पर्यंत.              नवीन रास्त भाव धान्य दुकान मिळण्यासाठी प्राथम्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था),   नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट,   नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था.        

केंद्र शासनाच्या पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत गरजू पथविक्रेत्यांना कर्ज वाटप अधिकाधिक पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन

अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :-   कोविड- 19 महामारी व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देशातील अनेक लोकांचे लहान-मोठे उद्योग बंद पडले.  त्यात रस्त्यांवर दुकान लावून (पथविक्रेते) त्यावर उपजीविका करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा लोकांकरिता केंद्र शासनाने पीएम-स्वनिधी योजना सुरु केली आहे. जेणेकरून पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करून आपले स्वतःचे घर चालविता येईल. जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी करून घ्यावा, असे आवाहन पथविक्रेत्यांना केले आहे.  तसेच जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री.आनंद लिंबेकर यांनी नगरपालिका क्षेत्रातील इच्छुक गरजूंनी आपले कर्ज प्रस्ताव बँकेकडे त्वरित पाठवण्याची विनंती केली असून ही योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात बँकेमार्फत 35 लोकांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.  त्यात बँक ऑफ इंडियाचा सर्वात मोठा वाटा आहे.  तसेच दि. 15 सप्टेंबर रोजी कर्ज वितरणाचा कार्यक्रम अलिबाग येथील आयडीबीआय बँकेत करण्यात आला. यात जिल्हा अग्रणी प्रबंधक आनंद

निरीक्षक वैधमापन शास्त्र कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित

    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :-   निरीक्षक वैधमापन शास्त्र,अलिबाग विभाग कार्यालय नव्या जागेत स्थलांतरित झाले असून आता या कार्यालयाचा नवीन पत्ता 1889/ अ/ 1 पाटीलवाडी,चेंढरे,अलिबाग बायपास रोड,फिश मार्केट मागे, ता.अलिबाग, जिल्हा रायगड 402 201 आहे, याची नोंद संबंधितांनी घ्यावी ,असे वैधमापन शास्त्र निरीक्षक बी. बी.चव्हाण यांनी कळविले आहे. ०००००

अभियंता दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून समस्त अभियंत्यांचे ऋण व्यक्त

                    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :-   अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात अलिबाग, मुरुड, पेण व पाली असे चार तालुके आहेत.   करोना विषाणू संक्रमण,निसर्ग चक्रीवादळ,अतिवृष्टी यासारख्या संकटकाळात अत्यंत कमी वेळात, असंख्य अडचणीवर मात करून अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लोकोपयोगी अनेक उल्लेखनीय कामे पूर्ण करुन   जिल्हा प्रशासनास हस्तांतरित करण्यात आली. याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांतर्फे जिल्ह्यातील समस्त अभियंत्याचे अभियंता दिनानिमित्त ऋण व्यक्त करण्यात आले.   या अभियंत्यांकडून अलिबाग जिल्हा रुग्णालय येथील वॉर्ड, केळुसकर विद्यालय येथील कोविड केअर सेंटर, नेहुली जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटर,सारंग विश्रामगृह येथे कोविड केअर सेंटर,पेण उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड केअर सेंटर,   मुरुड शासकीय विश्रामगृह येथील कोविड केअर सेंटर,   अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे नव्याने स्थापित करण्यात आलेली करोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा ही कामे अत्यंत विक्रमी वेळेत उभारण्यात आले.   र

कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 30 हजार 818 जणांनी केली करोनावर मात*

          अलिबाग,जि.रायगड दि. 15 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 30 हजार 818 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 659 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 144, पनवेल ग्रामीण-876, उरण-218, खालापूर-335, कर्जत-221, पेण-549, अलिबाग-818, मुरुड-72, माणगाव-364, तळा-43, रोहा-497, सुधागड-64, श्रीवर्धन-63, म्हसळा-37, महाड-222, पोलादपूर-41 अशी एकूण 6 हजार 564 झाली आहे.           कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-12 हजार 839, पनवेल ग्रामीण-3 हजार 930, उरण-1 हजार 369, खालापूर-1 हजार 771, कर्जत- 1 हजार 019, पेण-2 हजार 397, अलिबाग-2 हजार 663, मुरुड-225, माणगाव- 1 हजार 057, तळा-71, रोहा-1 हजार 386, सुधागड-260, श्रीवर्धन-245, म्हसळा-226, महाड- 1 हजार 114, पोलादपूर-246 अशी एकूण 30 हजार 818 आहे.                        आज दिवस

पनवेल उपजिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर वाढविण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे निर्देश

      अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :-     कोविड रूग्णांना दिवसेंदिवस ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश तसेच खासगी रुग्णालयांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा देण्यासोबत आणखी काही रुग्णालयांना कोविड दर्जाची परवानगी देण्याचे निर्देश पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज दिले.              पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. त्यावेळी त्यांनी हे निर्देश   दिले.              यावेळी या ऑनलाईन बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल महापालिका उपायुक्त संजय शिंदे, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, डॉ. गिरीश गुणे आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू सहभागी झाले होते.              पीएम केअर फंडातून आलेल्या वीस व्हेंटिलेटरपैकी दहा व्हेंटिलेटर डी. वाय. पाटील रूग्णालयास देण्यात आले आहेत. उर्वरित

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

              अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :-     जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज, महिला व युवक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कुशल /अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि.21 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00   ते सायंकाळी 06.00   या वेळेत फक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.   जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता   विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्ययावत करावी. तसेच ज्यांनी या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी   https://www.rojgar.mahaswayam.gov.in   या वेब पोर्टलवर   Employment-Job Seek

रायगड जिल्हयातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरीता रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन

         अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :-   कोविड-19 मुळे जिल्ह्यातून कुशल / अकुशल कामगारांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे विविध कंपन्या/आस्थापनांमध्ये कुशल / अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि. 21 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासा़ठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम त्यांना हव्या असलेल्या कुशल / अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर दि. 20 सप्टेंबर 2020 पर्यंत भरावी. ही माहिती भरताना प्रथम वेबपोर्टल सुरु करावे. त्यातील Employment-Employer (List a Job)-Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील  Pandit Dindayal Upadhyay Job Fair  या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details-Job Details-Agree and P

कौशल्य विकास योजनांच्या लाभासाठी सेवायोजन नोंदणी कार्ड आधार लिंक करा

  अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :-   राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (सेवायोजन कार्यालय) या कार्यालयात किंवा वेबपोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने बेवसाइटच्या माध्यमातून देण्यात येतात. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.             कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छ

चला घेऊ समजून.... “माझे कुटुंब-माझी जबाबदारी" "LET's DO IT"

Image
  विशेष लेख क्र.27                                                                                             दिनांक :- 15 सप्टेंबर 2020     गेल्या महिन्यापासून आपण सर्वचजण करोना विषाणूशी लढाई लढत आहोत. नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासन आणि प्रशासनही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. शासनाने कोविड-19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी  “ माझे कुटुंब-माझी जबाबदारी ” कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहीम हाती घेतली आहे. नेमकी काय आहे ही मोहीम...चला घेऊ समजून या लेखाद्वारे..!        “ माझे कटुंब-माझी जबाबदारी ”  मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी, कोमॉर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. ही मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. Ø   या मोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार केली आहेत. Ø   रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 500 आरोग्य पथके तैनात केली आहेत. Ø   एका पथकामध्ये 1 आरोग्य कर्मचारी आणि