Posts

Showing posts from February 5, 2023

निर्लेखित साहित्याच्या निविदा प्रक्रियेसाठी दि.20 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

      अलिबाग,दि.9(जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड या संस्थेतील वापरून निर्लेखित झालेल्या साहित्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निर्लेखित झालेले हत्यारे, उपकरणे व लाकडी फर्निचर इत्यादी साहित्याचा समावेश आहे.  या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांकडून दि.06 फेब्रुवारी 2023 पर्यंत सीलबंद निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु निर्लेखित साहित्याच्या निविदा प्रक्रियेसाठी अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे या निविदा प्रक्रियेस दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधित विभागामध्ये सुटीचे दिवस वगळून सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाहावयास मिळतील. याच कालावधीदरम्यान सादर करावयाच्या विहित नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/- (अक्षरी रुपये तीनशे मात्र ) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल, नमुन्यातील ही पूर्ण माहिती अचूकपणे भरलेली निविदा अर्जासोबत रु.5 हजार अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल.  या रक्क

किमान आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीसाठी अंतिम मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत

    अलिबाग,दि.09(जिमाका):  खरीप हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी 15 फेब्रुवारी 2023 ही अंतिम तारीख आहे. या तारखेनंतर कोणत्याही शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धान व भरडधान्य दि.15 फेब्रुवारी 2023 पूर्वी खरेदी केंद्रावर घेऊन यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.  किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरड धान्य खरेदीसाठी दि.31 जानेवारी 2023 ही अंतिम तारीख होती. मात्र राज्य शासनाने ही मुदत वाढवून दि.15 फेब्रुवारी 2023 ही अंतिम तारीख घोषित केली.   विभागातील शेतकऱ्यांनी जवळील खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा. योजनेचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात येणार नसल्याचेही पत्रकात नमूद केले आहे. 0000

जिल्ह्यात दि.11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

  अलिबाग,दि.8(जिमाका):-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री.अमोल अ. शिंदे यांनी कळविले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी 9 हजार 797 इतकी प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी, पाणी पट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे तसेच इतर वादपूर्व प्रकरणे अशी 37 हजार 149 वादपूर्व प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती

एम.पी.एस.सी च्या प्रशिक्षणासाठी प्रतीक्षायादीत 48 विद्यार्थ्यांची निवड महाज्योतीने घेतली विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल

                   अलिबाग,दि.8 (जिमाका):-  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील एकूण 1 हजार 500 विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. यापैकी 48 जागा या रिक्त होत्या. या रिक्त जागा भरण्याकरिता विद्याथ्यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांच्याकडे मागणी केली होती. महाज्योतीने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घेऊन रिक्त जागा भरण्याकरिता गुणानुक्रमानुसार 48 पात्र उमेदवारांची निवड यादी संकेत स्थळावरती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आनंदाची भावना असून, महाज्योतीने न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे, असे प्रकल्प व्यवस्थापक, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती), महाराष्ट्र राज्य  नागपूर यांनी कळविले आहे. ००००००

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले जाहीर

                  अलिबाग,दि.8(जिमाका):-  ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली.  14 मे 1946 रोजी जन्म झालेले  पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि  आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माध

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

                अलिबाग,दि.7 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे बुधवार, दि.8 फेब्रुवारी 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:                बुधवार, दि.8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथून स्पीड बोटीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन व मोटारीने रेवदंडा ता.अलिबागकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. श्री.सचिन दत्तात्रय धर्माधिकारी यांचे द्वितीय सुपुत्र चि.श्रीयन यांचा व्रतबंध सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : मारुती आळी, रेवदंडा, ता.अलिबाग. सकाळी 10.15 वाजता रेवदंडा, ता.अलिबाग येथून मोटारीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन व स्पीट बोटीने गेट वे ऑफ इंडिया मुंबईकडे प्रयाण. ००००००

जिल्ह्यातील ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक, मालकांनी विहित मुदतीत भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करुन घ्यावे --उप प्रादेशिक परिहवन अधिकारी,महेश देवकाते

    अलिबाग,दि.7 (जिमाका):- मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. 26 सप्टेंबर 2022 रोजीच्या निर्णयान्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दि. 01 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्याचे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने निर्देश दिले. या भाडेवाढीच्या अनुषंगाने भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता दि.30 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा परिचलन पद्धतीने दि.15 जानेवारी 2023 पर्यंत भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली होती.  टॅक्सी/ऑटोरिक्षा भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन होऊ न शकलेल्या वाहनांचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता दि.31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब प्राधिकरणाच्या मान्यतेस्तव परिचलन पद्धतीने सविनय सादर करण्यात आली. त्यानुषंगाने बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला. सचिव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील टॅक्सी/ऑटोरिक्षा भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन होऊ न शकलेल्या व

शैक्षणिक विशेष माफीद्वारे बंद्यांचे सुधारणा व पुनर्वसन उपक्रम

  अलिबाग,दि.7 (जिमाका):-   अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकारात दि.03 ऑक्टोबर 2019 ते दि.31 जानेवारी 2023 या कालावधीत 89  शिक्षा बंद्यांना 90 दिवसांची विशेष माफी मंजूर करण्यात आली आहे. तसेच विभागीय कारागृह उपमानिरीक्षक यांचे अधिकारातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 6 बंद्यांना 60 दिवसांची विशेष माफी देण्यात आलेली आहे. राज्यातील कारागृहातील बंद्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे तसेच बंद्यांमध्ये सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्व यांची जाणीव विकसित व्हावी, त्याकरिता बंद्यांना शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच जास्तीत जास्त बंद्यांनी  शैक्षणिक सुविधेचा लाभ घ्यावा व सहभाग नोंदवावा याकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांच्या संयुक्त उपक्रमानुसार कारागृहात अभ्यासकेंद्र व परीक्षाकेंद्र सन 2014 पासून सुरु करण्यात आले आहेत. कारागृहातील परीक्षा केंद्रातून दहावी/बारावी समकक्ष पदविका/पदवी/पदव्युत्तर/ प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बंद्यांनी 10  वी, 12 वी समकक

जिल्ह्यातील तिन्ही दलांमधून निवृत्त माजी सैनिकांसाठी रोजगार सेमिनार पात्र माजी सैनिकांनी संधीचा लाभ घ्यावा

  अलिबाग,दि.7 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यातील तिन्ही दलांमधून निवृत्त माजी सैनिकांसाठी रोजगार सेमिनार बुधवार, दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वा. सेलर्स इन्स्टीटयूट (सागर) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये 1 हजार ते 1 हजार 200 माजी सैनिक तसेच 30 ते 40 कार्पोरेट कंपनीचे  व पब्लिक सेक्टर कंपनीचे प्रतिनिधी यांच्या साठीची व्यवस्था करण्यात येणार आहे. माजी सैनिकांना सैन्य निवृत्ती पश्चात पुन:श्च रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सेमिनारचे उध्दीष्ट आहे.  सेमिनारमध्ये माजी सैनिकांना त्यांच्या योग्यतेनुसार विविध कंपनीच्या प्रतिनिधींसोबत रोजगाराकरिता परस्पर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.  सेमिनारकरिता ऑनलाईन रजिस्ट़ेशन डिजीआर वेबसाईट  http://www.dgrindia.com  वर उपलब्ध आहे. माजी सैनिकांनी आपले माजी सैनिक ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, वैयक्तिक तपशिल (CV)  यांच्या पाच प्रतिसोबत हजर रहावे.             जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, श्री.गोविंदराव मारुती साळूंखे यांनी केले आहे.    0000000

रायगड जिल्हा कृषी महोत्सव-2023 कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी भेट द्यावी--जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उदघाटन

अलिबाग,दि.7 (जिमाका):- दि.09 फेब्रुवारी ते दि.13 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये सेक्टर 27, सिडको मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ, कामोठे, पनवेल येथे रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते होणार असून या संपूर्ण कृषी महोत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.        जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023, शासनाच्या विविध कृषी योजना/उपक्रमांची माहिती, कृषी तंत्रज्ञान, नाविण्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी बाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रात्याक्षिके, कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी/उद्योजकांची व्याखाने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य, कडधान्ये व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव इत्यादीचे आयोजन करण्यात येणार आहे.       या रायगड जिल्हा कृषी महोत्स

कर्करोग जनजागृतीकरिता जिल्हा नियोजन भवन येथे माहितीपर व्याख्यान संपन्न

  अलिबाग,दि.6(जिमाका): - जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे कर्करोगासंदर्भात माहितीपर व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 निमित्ताने,जागतिक आरोग्य संस्थेने जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी जागतिक मोहीम जाहीर केली आहे. या मोहिमेचा उद्देश तंबाखूच्या पर्यावरणीय परिणामाबद्दल जागरुकता वाढविणे,हा असून त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये कॅन्सर आजाराविषयी जागृकता वाढविण्यासाठी डॉ.शर्मिला पिंपळे, M.D. Professor and Physician Department of Preventive Oncology Center for Cancer Epidemiology (CCE) टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, मुंबई यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तर कर्करोग प्रतिबंध केंद्र- खोपोलीच्या प्रमुख डॉ.प्रतिभा पाटील यांनी “ स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग ” याविषयी तसेच डॉ.प्रहतीस यांनी “ तोंडाचा कर्करोग ” या विषयाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई आणि खोपोली नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कर

“रायगड जिल्ह्याचे सन 2022 चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते संपन्न

    अलिबाग,दि.6(जिमाका) : - “ रायगड जिल्ह्याचे सन 2022 चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन ” या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जयसिंग मेहेत्रे, सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती वृषाली माकर, सांख्यिकी अधिकारी प्रितम ईश्वरे, सहाय्यक संशोधन अधिकारी नसिरा पठाण, सांख्यिकी सहाय्यक श्रीमती दिप्ती पांडे, श्रीमती पल्लवी फालक व श्री अंकुर जाधव हे उपस्थित होते. ००००००

“राष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा” निमित्त रॅली, जिंगल्स व रोल प्ले स्पर्धा संपन्न

            अलिबाग,दि.6(जिमाका) : - महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग व जेएसएम कॉलेज,अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने   जेएसएम कॉलेज,अलिबाग   येथे   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली “ राष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा ” निमित्त रॅली , जिंगल्स व रोल प्ले स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.   यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने, जिल्हा सहाय्यक लेखा श्री. रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर, आयसीटीसी समुपदेशक श्री सचिन जाधव,   मोबाईल आयसीटीसी व्हॅनचे क्लिनर श्री.रुपेश पाटील, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रविण गायकवाड, डॉ.सुनील आनंद व स्वयंसेवक उपस्थित होते.   जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी जिंगल्स व रोल प्ले स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी जेएसएम कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.निळकंठ शेरे यांनी उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देवून त्यांचे स

कर्करोग माहिती सत्र कार्यशाळा, आभा कार्ड नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,दि.6(जिमाका) : - “ जागतिक कर्करोग दिन ” या दिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप अंतर्गत कोपरी या गावामध्ये दि.04 फेब्रुवारी 2023 रोजी हेल्प एज इंडिया फाऊंडेशन आणि सिप्ला कंपनी यांच्या   सहकार्यातून कर्करोग माहिती सत्र कार्यशाळा व आभा कार्ड नोंदणी आणि कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यशाळेचे उद्घाटन खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे व सिप्ला कंपनी सीएसआर अधिकारी श्रीमती उल्का धुरी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा पाईकराव यांनी “ कर्करोग निदान तसेच नियमित आरोग्य तपासणी, आभा कार्ड, असंसर्गजन्य आजार ” या शासनाच्या आरोग्य कार्यक्रमामधील “ कर्करोगाचे निदान, उपचार व कार्यप्रणाली ” बाबतची माहिती लाभार्थ्यांना दिली. डॉ. प्रसाद रोकडे यांनी “ आरोग्य कसे जपले पाहिजे ” , याविषयी मार्गदर्शन केले.   तर श्रीमती उल्का धुरी यांनी   “ कर्करोग पॅलिटिव्ह केअर ” साठी सिप्ला कंपनीच्या सहकार्याने हेल्प एज इंडिया फाऊंडेशन कशा प्रकारे काम करीत आहे, याबाबत माहिती दिली. पाताळगंगा सीएसआर प्रमुख सुनिल मकरे यांनी “ पॅलिटिव्ह केअर आणि स