Posts

Showing posts from September 23, 2018

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2015-16 2016-2017 तसेच 2017-18 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांकडून शनिवार दिनांक 20 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पुरस्काराचे स्वरुप व अर्हता पुढील प्रमाणे- राज्यस्तरीय पुरस्कार:- रु.एक लाख एक  रोख, स्मृतीचिन्ह्, शाल व श्रीफळ तसेच  महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर पुरस्कार,दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे ते पुढील 5 वर्ष पुरस्कारासाठी पात्र राहाणार नाहीत. विभागीय पुरस्कार:- रु. पंचवीस हजार एक रोख स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ तसेच  महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्ष कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलीत मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकाराणापासून अलिप्त असावे. जिल्हास्तरीय पुरस

मिझल्स-रुबेला लसीकरण मोहिम: तालुकानिहाय आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि.रायगड दि.28,(जिमाका) – मिझल्स रुबेला लसीकरण मोहिम ही सुदृढ व आरोग्य संपन्न भावी पिढीसाठी राबविली जात आहे. तरी हि मोहिम राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ग्रामीण, तालुका, शहर स्तरावर नियोजन करावे व या लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राज्यात नोव्हेंबर महिन्यापासून मिझल्स रुबेला लसीकरण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यात वय 9 महिने ते 15 वर्षे या वयोगटातील बालके, मुले यांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व स्तरावर तयारी सुरु आहे. या तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी आयोजित बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) सांबरे व शिक्षण विस्तार अधिकारी आदि उपस्थित होते. या अभियाना संदर्भात आतापर्यंत जिल्ह्यात दि. 2 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्

औषध विक्रेत्यांच्या प्रस्तावित बंद कालावधीत शासकीय व अन्य रुग्णालयांतून औषधांची उपलब्धता

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.26- अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना व महाराष्ट्र औषध विक्रेता संघटनेने   शुक्रवार दि.28 रोजी   एक दिवसासाठी देशव्यापी बंद पुकारला आहे. या प्रस्तावित बंद संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गि.दि. हुकरे यांनी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना आवाहन केले आहे की, आपला व्यवसाय हा रुग्णांच्या जीवनाशी निगडीत असून त्यांनी आपली औषध विक्रीची सेवा अखंड सुरु ठेवावी. तसेच या एक दिवसाच्या कालावधीत तातडीच्या प्रसंगी औषधे उपलब्धतेची व्यवस्था शासकीय रुग्णालयांतून व अन्य खाजगी रुग्णालयांतून करण्यात आली असल्याचेही श्री. हुकरे यांनी कळविले आहे.   तसेच या कालावधीत जिल्ह्यातील अनेक औषध विक्री केंद्र सुरु राहणार असून याशिवाय जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांत औषधे विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. गरजू रुग्णांना सरकारी, निमसरकारी, सेवाभावी दवाखाने, तसेच नोंदणीकृत रुग्णालये व खाजगी रुग्णालये येथे औषधे उपलब्ध असून या संस्थांनी रुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यंत तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी औषध निरीक्षक -9867727713, कि.मु.राजन

विभागीय आयुक्तांनी घेतला मतदार नोंदणीचा आढावा

Image
अलिबाग, जि.रायगड दि.26,(जिमाका) – जिल्ह्यातील मतदार नोंदणीसंदर्भात विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. जगदीश पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीधर बोधे,   प्रांताधिकारी शारदा पोवार, प्रतिमा पुदलवाड, विठ्ठल इनामदार, रविंद्र बोंबले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने तसेच सर्व तालुकास्तरीय मतदार नोंदणी अधिकारी   आदी उपस्थित होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी जिल्ह्यातील मतदार नोंदणीविषयक माहितीचे सादरीकरण केले.   यावेळी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती सादर करण्यात आली. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील माहिती सादर केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. पाटील म्हणाले की, दिव्यांग मतदार, स्थलांतरीत मतदार, वगळण्यात आलेली

आयुक्तांचा युवा मतदारांशी संवाद : मतदान लोकशाही व्यवस्थेतील सर्वाधिक प्रभावी अस्त्र- आयुक्त डॉ.जगदिश पाटील

Image
अलिबाग, जि.रायगड दि.26,(जिमाका) – लोकशाही व्यवस्थेत ‘आपल सरकार’ निवडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मतदानाच्या हक्काद्वारे देण्यात आला आहे. मतदानाचा हक्क हे लोकशाही व्यवस्थेतील सर्वात प्रभावी अस्त्र असून, आपला देश घडविण्यासाठी आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन कोकण विभागाचे आयुकत डॉ.जगदिश पाटील यांनी आज येथे केले. येथील जे.एस.एम. महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळेत डॉ.पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी नवमतदारांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, उपायुक्त सिध्दराम सालीभट, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी शारदा पोवार, प्राचार्य निळंकठ शेरे, तहसिलदार सचिन शेजाळ आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना मतदान ओळखपत्र प्रदान करण्यात आले. त्यात नेहा कुन्नुमल, श्वेता बापट, अनुजा झाडेकर, सुयोग करंबत, तसेच दिव्यांग मतदार चिन्मय सुनिल फडके या मतदारांचा समावेश होता. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मतदानाच महत्व आणि मतदार नोंदणीच

जि.प. तपासणी अहवाल वाचन : गुणवत्तापुर्ण प्रशासनावर भर द्या- आयुक्त डॉ.जगदिश पाटील

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 - जिल्हा परिषद ही ग्रामिण जनतेला सेवा देणारी संस्था आहे. ग्रामीण जनतेचा विकास करण्यासाठी जि.प.प्रशासकीय यंत्रणेने गुणवत्तापुर्ण प्रशासनावर भर द्यावा असे निर्देश कोकण विभागाचे आयुक्त डॉ.जगदिश पाटील यांनी आज येथे दिले. येथील जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात आज रायगड जिल्हा परिषदेच्या वार्षिक तपासणी अहवालाचे वाचन डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उप आयुक्त् (आस्थापना)    गणेश चौधरी, उपआयुक्त (विकास)    भारत शेंडगे, उप आयुक्त (तपासणी)    नारायणसिंग परदेशी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)   निखिल   ओसवाल , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा स्वच्छता)    साळुंखे, जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती दराडे, जिल्हा आरोग्य् अधिकारी डॉ.सचिन देसाई तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. श्री. यावलकर यांनी जिल्हा परिषदेने राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर ऑगस्ट 2018 अखेर तपासणी    अहवालाचे वाचन करुन आढावा घेण्यात आला. या प्रामुख

जि.प. तपासणी अहवाल वाचन: गुणवत्तापुर्ण प्रशासनावर भर द्या- डॉ.जगदिश पाटील

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- जिल्हा परिषद ही ग्रामिण जनतेला सेवा देणारी संस्था आहे. ग्रामीण जनतेचा विकास करण्यासाठी जि.प.प्रशासकीय यंत्रणेने गुणवत्तापुर्ण प्रशासनावर भर द्यावा,असे निर्देश कोकण विभागाचे आयुक्त डॉ.जगदिश पाटील यांनी आज येथे दिले. येथील जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात आज रायगड जिल्हा परिषदेच्या वार्षिक तपासणी अहवालाचे वाचन डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उप आयुक्त (आस्थापना)  गणेश चौधरी, उपआयुक्त (विकास)  भारत शेंडगे, उपआयुक्त (तपासणी)  नारायणसिंग परदेशी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण,उप मुख्य् कार्यकारी अधिकारी (साप्रवि) निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा स्वच्छता)  साळुंखे, जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री. यावलकर यांनी जिल्हा परिषदेने राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर ऑगस्ट 2018 अखेर तपासणी   अहवालाचे वाचन करुन आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने सेवाविषयक

जिल्हा स्तरीय बँक समन्वय समिती बैठक : प्राधान्य क्षेत्राचा पतपुरवठा वाढवा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.25 - जिल्ह्यातील सर्व बँकानी प्राधान्यक्षेत्राचा पतपुरवठा वाढवून जिल्ह्यात रोजगार स्वयंरोजगार तसेच कृषी या क्षेत्राला बळकटी द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित बैठकीस रिजर्व बँकेचे बी.एम.कोरी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुधाकर रघतवान, बँक ऑफ इंडियाचे जिल्हा क्षेत्रिय व्यवस्थापक सी.के.वराते, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक आनंद निंबेकर, ग्रामीण प्रधिक्षक केंद्राचे व्ही.डी.कुलकर्णी, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे रामदास बघे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती देवराज, उपजिल्हाधिकारी रोहयो श्री.मठपती तसेच विविध बँकांचे प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.   यावेळी प्राधान्य क्षेत्रातील   व शासन अर्थसहाय्यीत उपक्रमांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.   त्यात प्रामुख्याने पिक कर्ज, बचत गटांना द्यावयाचा पतपुरवठा, रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्वयंरोजगार योजना आदि योजनांचा व क्

अनधिकृत गैरहजर शिक्षकास जि.प्र.प्रशासनाची नोटीस

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.25 - रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा निजामपूर ता.महाड या प्राथमिक शाळेवरील मु.पो.जुनी ता.बिलोली जि.नांदेड येथील मूळ रहिवाशी असलेले प्राथमिक शिक्षक श्री.दयानंद मल्लप्पा हे 18 ऑगस्ट 2002 पासून अनधिकृत गैरहजर आहेत. त्यांनी त्यांच्या गैरहजेरीचा खुलासा येत्या दहा दिवसाच्या आत करावा, अन्यथा त्यांची सेवा संपुष्टात येईल, अशी नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी बजावली आहे.   या अनधिकृत गैरहजेरीबाबत त्यांना दि.9 एप्रिल 2010, दि.17 एप्रिल 2010, 12 जानेवारी 2015, 18 एप्रिल 2018 या तारखांना त्यांच्या मुळ गावी म्हणजेच मु.पो. जुनी , ता. बिलोली जि. नांदेड येथे नोटीसा देण्यात आलेल्या आहेत.   श्री.मल्लपा यांनी वृत्त प्रकाशीत झालेल्या तारखेपासून गैरहजेरीचा खुलासा दहा दिवसाचे आत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांच्या कार्यालयात स्वत: हजर राहून सादर करावा.   अन्यथा आपणास सेवेची आवश्यकता नाही असे गृहीत धरुन आपली सेवा संपुष्टात आणण्यात येईल. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982 च्या नियम 47 (1) च्या तरतुदीनुसा

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्यासाठी उद्यापासून विशेष मोहिम

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.25- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारतर्फे मॅट्रिकोत्तर   शिष्यवृत्ती / फ्रिशिप देण्यात येते. अशा विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी गुरुवार दि.27 पासून 6 ऑक्टोबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात   येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी दिली असून या कालावधीत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढावेत असे आवाहनही केले आहे. सन 2011-12 पासून राज्यामध्ये महाविद्यालय स्तरावर एकूण 1,42,228 अर्ज प्रलंबित आहेत ते निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.   त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशीपचे अर्ज ऑनलाईन भरलेले आहेत. (सन 2011-12 ते 2016-17) अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत.   प्रलंबित असलेल्या अर्जांवर योग्य ती कार्यवाही करुन अर्ज निकाली काढून गुरुवार दि.27 ते शनिवार दि. 6 ऑक्टोंबर 2018 पर्यंत संबंधित

सैन्य भरती मेळाव्याचे योग्य नियोजन करावे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.24- सैन्य भरती कार्यालय, मुंबई यांचेमार्फत कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल (रायगड) येथे दि.4 ते 13 आक्टोंबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   या भरतीसाठी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील तरुण मोठ्या संख्येने येणार आहेत. या मेळाव्यात ५ ते ६ हजार युवक सहभागी होण्याची शक्यता आहे. सर्व भरती प्रकिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्व संबंधीत विभागांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी    डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, पनवेलच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तात्रय नवले, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, कर्नल मनु, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर प्रांजळ प्र.जाधव, गटविकास अधिकारी डी.एन.तेटगुरे, पोलीस इन्स्पेक्टर अशोक म. नाईक, एसआरपी ग्रुप 11 चे भास्कर महाडीक, सिडकोचे विरेंद्र पाटील आदि उपस्थित होते.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गरिबांसाठी ही योजना वरदानच- ना.रविंद्र चव्हाण

Image
  अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.23: जनता सदृढ रहावी, त्यांचे आरोग्य चांगल रहाव हा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यामागे शासनाचा उद्देश आहे. गरीबांसाठी ही योजना वरदान असून याचा लाभ अधिकाअधिक जनतेपर्यंत पोहचवावा, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज कर्जत येथे केले.   कर्जत येथे डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ अंतर्गत कर्जत कृषी संशोधन केंद्र हॉल येथे आज आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ करण्यात आला व लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप करण्यात आले.   त्यावेळी ना. चव्हाण बोलत होते.             यावेळी सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा श्रीमती रजनीताई गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.             यावेळी