Posts

Showing posts from December 17, 2023

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास दि.4 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

  रायगड,दि.22(जिमाका):-  नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज सादर करण्यास दि.4 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी दिली आहे. देशातील AIIMS. IIM, IIIT, NIT, IISc & IISER, Institution of National Importance & Other Colleges या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातीलल विद्यार्थ्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली असून सन 2023-24 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या/नवबौद्ध घट्कांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समानसंधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेस

दिव्यांग व्यक्तींनी पर्यावरणस्नेही वाहनावरील दुकानांसाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

                  रायगड,दि.22(जिमाका) :- व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ एस.आर.म्हैसकर यांनी केले आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे ही या योजनेची मुख्य उद्देश आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  https://evehicleform.mshfdc. co.in  ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम मुदत 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आहे. 00000000

विद्यार्थी व शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान

                रायगड, दि.20 (जिमाका) :-   राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे तसेच शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक पुनिता गुरव यांनी दिली आहे.  विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिकतंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे, राज्यातून कच-याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे,  विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणा

मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी ते जून 2024 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

       रायगड, दि.20 (जिमाका) :-  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून 2024 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. माहे जानेवारी-2024 :  बुधवार, दि.10 जानेवारी 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.09 जानेवारी 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.12 जानेवारी व सोमवार, दि.29 जानेवारी 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.8जानेवारी व सोमवार दि.22 जानेवारी 2024 ता.महाड, मंगळवार, दि.23 जानेवारी 2024 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 जानेवारी 2024, ता.माणगाव. माहे फेब्रुवारी-2024:  बुधवार, दि.07 फेब्रुवारी 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.06 फेब्रुवारी 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.02 फेब्रुवारी व शुक्रवार, दि.16 फेब्रुवारी 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.05 फेब्रुवारी व मंगळवार दि.20 फेब्रुवारी 2024 ता.महाड, बुधवार, दि.21 फेब्रुवारी 2024 ता.श्रीवर्धन, गुरुवार, दि.22 फेब्रुवारी 2024, ता.माणगाव. माहे मार्च-2024 :  बुधवार, दि.06 मार्च 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.05 मार्च 2024, ता.मुरुड, सोमवार, दि.10 मार्च व मंगळवार, दि.26 मार्च 2024 ता.अलि

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांतर्गत पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रम संपन्न

  रायगड,दि.20(जिमाका)  :-    राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023-24 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यातील गावा-गावात जनजागृती करण्यात येत असून उत्पादकता वाढीच्या दृष्टीने तसेच पौष्टिक तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषण मूल्याचे आहारातील महत्त्व पटवून देण्याकरिता अलिबाग बस स्थानकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन रायगड व प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांच्या प्रमुख उपस्थितीत  आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांतर्गत प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून जनजागृतीपर  जनप्रबोधन केले.  यावेळी अलिबाग आगार प्रमुख वनारसे,    उपप्रकल्प संचालक शिवाजी भांडविलकर, उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे, कृषी सहाय्यक अलिबाग मोहन सूर्यवंशी, जिल्हास्तर सल्लागार जयवंत कांबळी, तंत्र सहाय्यक रायगड किमया म्हात्रे, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी, आधार फाउंडेशनच

मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेक लाडकी योजना लाभदायी--मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड

रायगड,दि.19(जिमाका) :-   मुलींचा जन्मदर वाढविणे तसेच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारी लेक लाडकी  योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लाभदायी असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. माझी कन्या भाग्यश्री ही योजना 2017 पासून राबविण्यात येत होती. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर 50 हजार रुपये तसेच दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25 हजार रुपये ठेवण्यात येत होते. रायगड जिल्ह्यात या योजनेंतर्गत 487 मुलींना लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-  लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा जास्त नसावे), रेशनकार्ड (पिवळे किंवा केशरी), लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील), पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. लेक लाडकी या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक

राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत रायगड जिल्ह्याला मिळाला द्वितीय क्रमांक

  रायगड,दि.19(जिमाका) :-    रायगड जिल्हयातून महाराष्ट्र राज्य   ऑनलाईन   प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी टीम रायगडमधून कु.अविष्कार रविंद्र कदम, इयत्ता    9 वी, चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे, अलिबाग    व    कु.स्नेहल सचिन जाधव, इयत्ता    9 वी, के.ई.एस.ऍड नंदा देशमुख इंग्रजी माध्यमिक शाळा,अलिबाग   या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्याला    द्वितीय     क्रमांक मिळवून दिल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई अंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा   स्पर्धेचे   आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये   महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन   विद्यार्थ्यांची एक टीम करून   महाराष्ट्रातून   एकूण 32 टीम   ऑनलाईन   प्रश्न मंजुषा   स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या.     महाराष्ट्र राज्य   ऑनलाईन   प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम    क्रमांक, रायगड   जिल्ह्याने     द्वितीय     क् रमांक तर गडचिरोली   जिल्ह्याने     तृतीय     क्र मांक मिळवला आहे.   जिल्हा एड्स प्रतिबंध व नि

स्वयंसिध्दा वस्तू विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

    रायगड,दि.19(जिमाका) :-    भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद, उदया प्रकल्प कार्यालय अलिबाग व टाटा कम्युनिकेशन्स लि.मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.23 डिसेंबर ते दि.25 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये सकाळी 10.00  ते रात्रौ 10.00 पर्यंत या वेळेत अलिबाग समुद्र किनारा मैदान येथे स्वयंसिद्धा वस्तू विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी, भारतीय उद्योजकता विकास संस्था यांनी दिली आहे. भारतीय उद्योजकता विकास संस्था द्वारा रायगड व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टाटा कम्युनिकेशन्सच्या प्रायोजकतेने महिलां करीता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गेली चार वर्षे सुरु आहे. या प्रशिक्षणामधून ज्या प्रशिक्षणार्थी महिला उद्योजिकेने आपले स्वतः चे व्यवसाय सुरु केले अशा उद्योजक महिलांना बाजारपेठ मिळावी व त्यामधून त्यांच्या वस्तुला मागणी निर्माण व्हावी या हेतूने टाटा कम्युनिकेशन्सच्या सामाजिक दायीत्व विभागांतर्गत व भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या आयोजनातून स्वयंसिद्धा वस्तू व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त संख

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा गतिमानता पंधरवडा पात्र लाभर्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा --महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या

    रायगड,दि.18(जिमाका):-  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा गतिमानता पंधरवडा दि.17 डिसेंबर ते दि.30 डिसेंबर 2023 पर्यंत रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी केले आहे. राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-2019 अंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना व कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतले आहेत. सूक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर केली आहे. या कार्यक्रमाची गतिमानता वाढविण्यासाठी उद्योग विभागाचे विकास आयुक्त यांनी गतिमानता पंधरवडा घोषित केला आहे. या पंधरवड्यात रायगड जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादी ठिकाणी जनजागृती मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.तसेच पात्र लाभार्थ्यांचे जागेवर अर्ज भरुन घेण

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी दि.5 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

  रायगड,दि.18(जिमाका):-  क्षेत्रीय स्तरावर सध्या व्यापक प्रमाणावर सुरु असलेले वंध्यत्व निवारण शिबीरे इ. लक्षात घेता या योजनांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अर्ज भरता यावे, यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-24 या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी दि.05 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांनी दिली आहे. सन 2023-24 या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार सन 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे व जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन पडताळणी करून निवड पूर्ण करणे याची मुदत दि.15 डिसेंबर 2023 रोजी संपुष्टात आली आहे. यासाठीचे नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :-  दि.9 नोव्हेंबर ते दि.18 डिसेंबर 2023 पर्यंत सन 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज स्विकारणे, जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर का