आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांतर्गत पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

रायगड,दि.20(जिमाका) :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023-24 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यातील गावा-गावात जनजागृती करण्यात येत असून उत्पादकता वाढीच्या दृष्टीने तसेच पौष्टिक तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषण मूल्याचे आहारातील महत्त्व पटवून देण्याकरिता अलिबाग बस स्थानकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन रायगड व प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांतर्गत प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून जनजागृतीपर जनप्रबोधन केले.

 यावेळी अलिबाग आगार प्रमुख वनारसे,  उपप्रकल्प संचालक शिवाजी भांडविलकर, उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे, कृषी सहाय्यक अलिबाग मोहन सूर्यवंशी, जिल्हास्तर सल्लागार जयवंत कांबळी, तंत्र सहाय्यक रायगड किमया म्हात्रे, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी, आधार फाउंडेशनचे धनंजय कवठेकर, पत्रकार बंधू तसेच बहुसंख्येने प्रवासी उपस्थित होते.

यावेळी  कार्यक्रमाच्या ठिकाणी तृणधान्याची अत्यंत सुबक रांगोळी रेखाटण्यात आली होती. सर्व उपस्थितांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले  यांनी मार्गदर्शन केले तसेच पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगितले व आंतरराष्ट्रीय  तृणधान्य वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 50 ठिकाणी  पथनाट्यातून जनप्रबोधन  करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक