Posts

Showing posts from March 15, 2020

रविवार 22 मार्चचा जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करा. घराबाहेर पडू नका, प्रशासनास सहकार्य करा - पालकमंत्री आदिती तटकरे

Image
अलिबाग दि.21, कोरोना च्या पार्श्वभूमीवर कुणीही घाबरू नये सर्वांनी धीर धरावा. कुठल्याही प्रकारचं संकट ज्यावेळेस राज्यावर आणि देशावर येतं, त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीनं त्या संकटाचा सामना केला पाहिजे, ही आपली सगळ्यांची   सामुदायिक जबाबदारी आहे. या स्थितीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा.   कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या बाबतीत आपण दुसऱ्या टप्प्यात असून त्यापुढील टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत. रविवार दि 22 मार्च 2020 चा सकाळी 7 ते रात्री 9 पर्यत सर्वांनी घरीच थांबून जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करा. घराबाहेर पडू नका. 31 मार्च पर्यंत घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळा. आपल्या परिवाराची काळजी घ्या, तोंडाला मास्क वापरा, खोकताना व   शिंकतांना तोंडाला रुमाल लावा, हात वारंवार स्वच्छ धुवा. कोरोना विरुद्धातील लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन आपल्या सर्व शक्तीनिशी सज्ज आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टो

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वांनी सहकार्य करावे नागरीकांनी घाबरुन जावू नये-पालकमंत्री ना.आदिती तटकरे

Image
अलिबाग दि.21, राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन तेथील विलगीकरण कक्षाची पहाणी केली त्याचबरोबर तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील सोयीसुविधा, समस्या जाणून घेतल्या.   यानंतर श्रीवर्धन नगरपरिषद येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगर परिषद सदस्य, शासकीय अधिकारी व काही व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून विषाणू संसर्ग टाळण्यासाठी व उद्भवलेल्या परिस्थितीशी कसा सामना करायचा याविषयी चर्चा केली. त्याचबरोबर जनतेने घराबाहेर पडू नये, परदेशातून किंवा पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर या भागातून काही नागरिक आले असल्यास त्यांची माहिती तात्काळ प्रशासनाला कळविण्याचेही आवाहन केले. 00000

“कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका.. सावध राहा !

                 करोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहीत आहेत. 2003 मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा 2012 मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुद्धा करोना विषाणूंमुळे होणारे आजार आहेत. परंतु डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकामध्ये जो करोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या करोना विषाणू पेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन करोना विषाणू असे संबोधण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास कोविड-19 असे नाव दिले आहे.   करोनाचे मूळ स्थान:- करोना हा प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळामध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणी जगतातील सूक्ष्म जीव मानवामध्ये प्रवेश करतात.   करोना विषाणू आजाराची लक्षणे:-   ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडित असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्युमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.   करोना विषाणूमुळे होणारा आजार

पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांचा दौरा

अलिबाग दि.20, राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. शनिवार दिनांक 21 मार्च, 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता सुतारवाडी, ता.रोहा येथून शासकीय वाहनाने श्रीवर्धन, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता श्रीवर्धन येथे आगमन व कोरोना विषाणू प्रतिबंधक उपायांविषयी बैठक. दुपारी 12.30 वाजता श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने दिवेआगर ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता दिवेआगर व पर्यटकांसाठी कोरोना विषाणू प्रतिबंधक उपयांकरीता हॉटेल व्यावसायिकांसमवेत बैठक. दुपारी 1.30 ते 2.00 राखीव. दुपारी 2.00 वाजता दिवेआगर येथून शासकीय वाहनाने आंबेत, ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता आंबेत, ता.म्हसळा येथे आगमन व आंबेत पुलाच्या कामाबाबत आढावा. सायं. 4.00 वाजता आंबेत येथून शासकीय वाहनाने माणगांवकडे प्रयाण. सायं. 4.45 वाजता माणगांव येथे आगमन व श्री.आनंदशेठ यादव यांच्या उतेखोल येथील निवासस्थानी भेट. सोईनुसार माणगांव येथून शासकीय वाहनाने धाट

मतदार याद्यांचा विशेष पुररीक्षण कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 01/01/2020 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 11 नोव्हेंबर 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीत राबविला जात आहे.   सदर कार्यक्रम सुधारीत केला असून या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती निकाली काढणे,मतदार नोंदणी विशेष मोहिम राबविणे व अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कालावधी पुढीलप्रमाणे.   एकत्रितकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे शुक्रवार दिनांक 13 मार्च 2020.   दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी शुक्रवार दि.13 मार्च 2020 ते बुधवार दि.15 एप्रिल 2020.   विशेष मोहिमांचा कालावधी शनिवार दि.28 मार्च   आणि रविवार दि.29 मार्च 2020 तसेच शनिवार दि.11 एप्रिल व रविवार दि.12 एप्रिल 2020.   दावे व हरकती निकालात काढणे गुरुवार दि.30 एप्रिल 2020 पूर्वी.   प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे बुधवार दि.06 मे 2020 पूर्वी.   डेटाबेसचे अद्यावतीकरणे आणि पुरवणी याद्याची छपाई सोमवार दि.11 मे 2020 पूर्वी.   मत

खाजगी कोचींग क्लासेसकरिता बंदी आदेश जारी

अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक   उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे.   त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी कोचिंग क्लासेस चालू असल्याचे निदर्शनास आलेले आहे.   सदर खाजगी कोचींग क्लासेसमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा होऊन त्याद्वारे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.    यास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग   प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 मधील 10 नुसार प्राप्त अधिकारान्वये रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात येत आहे.   उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती व संबंधित पोलीस निरीक्षक यांनी आपआपल्या कार्यक्षेत्राकरिता कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.   आदेशानुसार कार्यवाही न करणाऱ्या व्यक्ती,नागरिक वा उपरोक्त आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती,नागरिक यांचे विरु

माथेरान पर्यटन स्थळावर जाण्यास सर्व पर्यटकांना बंदी आदेश जारी

अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : शासनाने करोना विषाणूचा (COVID-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897,दि.13 मार्च 2020 लागू करण्यात आलेला आहे.   रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात.   यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन त्याद्वारे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.   त्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी टाळून विषाणू संसर्गाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील माथेरान हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश देणे आवश्यक आहे. त्यानुसार करोना विषाणूचा (COVID-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक   उपाय म्हणून साथरोग अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 नुसार रायगड जिल्ह्यातील माथेरान या पर्यटन स्थळावर जाणेसाठी सर्व पर्यटकांना दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंदी घालण्याचे आदेश देत आहे असे मा.जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 00000

प्रतिबंधित मागूर माशांच्या मत्स्यसाठ्यावर कारवाई

Image
      अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका) : राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांनी दि. 22 जानेवारी 2019 च्या आदेशान्वये विदेशी मागूर ( Clarius gariepinus ) याचे देशातील अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग या कार्यालयाने जिल्ह्यातील मागूर मत्स्यसाठ्यांवर कारवाई करण्यास सूरूवात केली आहे. दि. 6/3/2020 रोजी पनवेल तालूक्यातील पनवेल, कामोठे, खारघर आणि तळोजे येथील मासळी विक्री केंद्रास भेट देण्यात आली. यावेळी कामोठे येथील एक व तळोजा येथील आठ मत्स्यविक्रेते मागूर माशांची विक्री करताना आढळले. या विक्रेत्यांना नोटीस देण्यात आली असून या माशांची या पुढे विक्री करू नये अशी समज देण्यात आली. दि. 7/3/2020 रोजी खालापूर तालूक्यातील या विभागाच्या पथकाने पाहणी केली असता महड गावातील एका मत्स्यसंवर्धकाच्या तलावामध्ये प्रतिबंधित मागूर मत्स्यसाठा आढळला. या मत्स्यसंवर्धनास यापूर्वी नोटीस देऊन देखील मत्स्यसाठा नष्ट केला नव्हता. त्याअनुषंगाने या कार्यालयाच्या पथकाने मत्स्यसंवर्धन तळ्यांच्या बाजूला खड्डा खणून अंदाजे 30

पर्यटक जलवाहतूक बंदी आदेश जारी

अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका) : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील समुद्र,खाडी किनारी जलक्रीडा प्रकल्प व नौकाविहार प्रकल्प चालविण्यात येतात अशा ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रात चालू असलेले जलक्रिडा  प्रकल्प व नौकाविहार प्रकल्प तसेच गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, मार्वे मनोरी व एक्सेलवर्ड, बोरीवली ते एक्सेलवर्ड, थळ ते खांदेरी किल्ला, किहिम ते खांदेरी किल्ला, दिघी ते जंजिरा किल्ला, मुरुड ते जंजिरा किल्ला, मुरुड ते पद्मदुर्ग (कासा किल्ला),राजपुरी ते जंजिरा किल्ला, मालवण ते सिंधुदुर्ग किल्ला, पद्मगड ते सिंधुदुर्ग किल्ला या पर्यटन स्थळा दरम्यान होत असलेली पर्यटक जलवाहतूक  31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात यावी. तसेच जलप्रवासी वाहतूक ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेऊन सदर ठिकाणची जलप्रवासी वाहतूक सुरळीतपणे  सुरु ठेवण्यात यावी असे डॉ.रामास्वामी एन.मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई  यांनी कळविले आहे. 000000