खाजगी कोचींग क्लासेसकरिता बंदी आदेश जारी



अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) :करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक  उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे.  त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी कोचिंग क्लासेस चालू असल्याचे निदर्शनास आलेले आहे.  सदर खाजगी कोचींग क्लासेसमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा होऊन त्याद्वारे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   यास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग  प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 मधील 10 नुसार प्राप्त अधिकारान्वये रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात येत आहे. 
उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती व संबंधित पोलीस निरीक्षक यांनी आपआपल्या कार्यक्षेत्राकरिता कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.  आदेशानुसार कार्यवाही न करणाऱ्या व्यक्ती,नागरिक वा उपरोक्त आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती,नागरिक यांचे विरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे मा.जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक