Posts

Showing posts from October 23, 2016

अलिबाग जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

Image
दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                 वृत्त क्र. 696 अलिबाग जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा अलिबाग, दि.28:- आयुष कार्यक्रमांतर्गत  आज अलिबाग येथील  जिल्हा सामान्य रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली.             या कार्यक्रमांस, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.अजित गवळी, अतिरिक्त जिल्हा शल्य् चिकित्सक  डॉ.ननावरे,, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, जिल्हा आयुष अधिकारी,डॉ.चेतना पाटील तसेच  आयुर्वेद व आहारतज्ञ डॉ. भक्ती पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी मधुमेह जनजागृती अभियानासाठी आयुष विभाग रायगडद्वारे मुद्रीत केलेल्या माहिती पत्रकाचे अनावरण जिल्हा शल्य चिकित्सकांच्या  हस्ते करण्यात आले.             भगवान धन्वंतरी हे आरोग्य शास्त्राचे आराध्य दैवत मानले जाते. संपूर्ण देशात आरोग्य संवर्धनासाठी धन्वंतरी जयंती साजरी करण्यात येते. या दिवसाचे निमित्त साधून आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.

आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रे सुरु

Image
दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                      वृत्त क्र. 695                                          आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी                                                 ग्राम बाल विकास केंद्रे सुरु             अलिबाग दि. 28:-  आदिवासी बालकांचे कुपोषण कमी करुन बाल मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून  नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला आहे . याअंतर्गत जिल्हयात नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत ग्राम बाल विकास केंद्र (व्हीसीडीसी) अलिबागमध्ये 19 तर कर्जतमध्ये 5 अशी एकूण 24 केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.               सहा वर्षाखाली  सॅम मॅम बालकाचे प्रमाण कमी करुन कुपोषणामुळे होणारे बाल मृत्यू कमी करण्यासाठी गाव पातळीवर 30 दिवसांच्या कालावधीत बैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निरिक्षणाखाली आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना मार्फत आहार व आरोग्यसेवा देऊन प्रशिक्षणाव्दारे मातांचे बालसंगोपनासाठी सक्षमीकरण करणे हे ग्राम बाल विकास केंद्राचे मुख्य उद्ष्टि आहे.             अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पर्यवेक्षिकेने

एडस् विषयी प्रभावी जनजागृती करावी - अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

Image
दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                       वृत्त क्र. 694                                                 एडस् विषयी प्रभावी                                                   जनजागृती करावी                                                         -   अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर             अलिबाग दि. 28:- एच.आय.व्ही.एडस् विषयी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रभावी जनजागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी सांगितले.             जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांच्या अध्यक्षतेखाली डीएपीसीसी कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रोजू पाटोदकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.             जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे एआरटी केंद्रामध्ये औषधोपचार घेण्यास

कशेळे व पाथरज येथील भात खरेदी सुरु होणार

दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                      वृत्त क्र. 693                                              कशेळे व पाथरज येथील                                             भात खरेदी सुरु होणार         अलिबाग दि. 28:-  आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम 2016-17 मध्ये आदिवासी उपाय योजना क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ या अभिकर्ता संस्थेमार्फत रायगड जिल्हयातील कर्जत तालुक्यातील कशेळे व पाथरज येथील भात खरेदी केंद्रावर भात खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. खरीप पणन हंगाम  कालावधीत 24 ऑक्टोबर 2016 ते 31 मार्च 2017, रब्बी पणन हंगामाकरिता  1 मे  ते  30 जून 2017 असा आहे.             भात खरेदीच्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उतारा आणणे आवश्यक आहे. सदरहू उताऱ्यातील  धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या  7/12 उताऱ्यानुसार पीकाखालील क्षेत्र, या वर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी) पीकाचे सरासरी उत्पादन या  बाबी विचारात घेऊन धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. सदर धानाची खरेदी ही ऑनल

पन्नास कोटी वृक्ष लागवडीसाठी सर्व विभागांचे योग्य नियोजन आवश्यक --अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

Image
दिनांक:-27/10/2016                                                   वृ.वि.क्र. 691 पन्नास कोटी वृक्ष लागवडीसाठी सर्व विभागांचे योग्य नियोजन  आवश्यक                                        --अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर अलिबाग दि.27:- येत्या 3 वर्षात म्हणजे 2019 पर्यंत संपूर्ण राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीची महायोजना शासनाने आखली असून ही यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.             यावेळी वन विभाग अलिबागच्या उप वन संरक्षक श्रीमती   बॅनर्जी, रोहा विभागाचे उप वन संरक्षक  विजय सुर्यवंशी,उपविभागीय अधिकारी माणगांव विश्वनाथ वेटकोळी, सामाजिक वनीकरण उपसंचालक विद्याधर जुकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर,  तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.             बैठकीत पुढे मार्गदर्शन करतांना अपर जिल्हाधिकारी म्हणाले की, 2017 ते 2019 या तीन वर्षात जिल्हयाला 1 कोटीचे उद्दिष्ट असून त्यापैकी जवळपास दहा लाखाचे उद्दिष्ट 2

प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यास कटिबध्द होऊ या

लेख क्रमांक :- 55                                                                              दिनांक 26/10/2016 प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यास कटिबध्द होऊ या                     दीपावली हा आनंदाचा,उत्साहाचा,अंधाराला दूर सारुन प्रकाशाकडे नेणारा प्रकाशाचा सण आहे. लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच हा सण देशभर मोठया उत्साहाने साजरा करतात. आपण सर्वजणही हा सण साजरा करण्यासाठी सज्ज झालो आहोत. हा सण साजरा करताना वायू, ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा करण्याचे गरजेचे आहे.             दीपावली म्हटलं की रोषणाई करुन आपले घर, अंगण, परिसर रोषनाईने उजळून टाकले जाते. या सणा निमित्त घरी गोड -धोड फराळाचे पदार्थ करणे, नविन वस्तू खरेदी करणे, नातेवाईकांना, मित्रमंडळीची आठवण ठेवणे आणि त्यांच्या सहवासात आनंदाचा हा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर फटाके फोडून मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करण्यात येतो. अलिकडे तर विविध प्रकारचे रोषणाई देणारे तसेच मोठमोठे आवाजाचे फटाके फोडले  जातात. फटक्यांच्या लांबच लांब माळा लावल्या जातात. वास्तविक मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ होते. त्

रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी गटांचे आरक्षण जाहिर

Image
दिनांक :- 24/10/2016                                                                                                         वृ.क्र.686 रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी गटांचे आरक्षण जाहिर         अलिबाग (जिमाका) दि.24, रायगड जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली असून जिल्हा परिषदेच्या 61 गटानुसार विविध प्रवर्गाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी हे आरक्षण सोडत जाहिर केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तहसिलदार अजय पाटणे, तसेच जि.प.सदस्य, व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी एकूण गटांची संख्या 61 आहे. त्याचे आरक्षण पुढील प्रमाणे 8 अनुसूचित जमातीसाठी राखीव, 3 अनुसूचित जातीसाठी राखीव तसेच 16 नामप्रसाठी राखीव व 34 खुला प्रवर्गसाठी राखीव असे 61 गट आहेत.  यातील 31 गट महिलासाठी राखवी असे आरक्षीत आहेत. प्रवर्गनिहाय आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव 1.) पनवेल मधील 16- गुळसुंदे 2.) कर्जत मधील 19-नेरळ