रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी गटांचे आरक्षण जाहिर

दिनांक :- 24/10/2016                                                                                                         वृ.क्र.686
रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक
निवडणूकीसाठी गटांचे आरक्षण जाहिर  

     
अलिबाग (जिमाका) दि.24, रायगड जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली असून जिल्हा परिषदेच्या 61 गटानुसार विविध प्रवर्गाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी हे आरक्षण सोडत जाहिर केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तहसिलदार अजय पाटणे, तसेच जि.प.सदस्य, व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी एकूण गटांची संख्या 61 आहे. त्याचे आरक्षण पुढील प्रमाणे 8 अनुसूचित जमातीसाठी राखीव, 3 अनुसूचित जातीसाठी राखीव तसेच 16 नामप्रसाठी राखीव व 34 खुला प्रवर्गसाठी राखीव असे 61 गट आहेत.  यातील 31 गट महिलासाठी राखवी असे आरक्षीत आहेत.
प्रवर्गनिहाय आरक्षण
अनुसूचित जमातीसाठी राखीव 1.) पनवेल मधील 16- गुळसुंदे 2.) कर्जत मधील 19-नेरळ 3.) कर्जत मधील 20-उमरोली 4.) अलिबाग मधील 34-शहापूर (महिलांसाठी राखीव) 5.) अलिबाग मधील 39-चौल (महिलांसाठी राखीव) 6.) पेण मधील 30-कारव (महिलांसाठी राखीव) 7.) माणगांव मधील 48-निजामपूर (महिलांसाठी राखीव), 8.) रोहा मधील 43-आंबेवाडी
अनुसूचित जातीसाठी राखीव 1.) पनवेल मधील 4-पाली देवद, 2.) पनवेल मधील 9-कामोठे गट-1, (महिलांसाठी राखीव),  3.) पनवेल मधील 10-कामोठे गट-2(महिलांसाठी राखीव),
नागरीकांचा मागास प्रवर्ग राखीव 1.)पनवेल मधील 3-विचुंबे, 2.) पनवेल मधील 7-खारघर गट-1,(महिलांसाठी राखीव) 3.) पनवेल मधील 8-खारघर गट-2,(महिलांसाठी राखीव) 4.) पनवेल मधील 11-कळंबोली  गट-1,(महिलांसाठी राखीव)  5.) पनवेल मधील 12- कळंबोली गट-2,(महिलांसाठी राखीव) 6.) कर्जत मधील 17-शेलु, 7.) पेण मधील 27-जिते, 8.) उरण मधील 31-नवघर, 9.) अलिबाग मधील 38-नागांव, 10.) मुरुड मधील 40-उसरोली,(महिलांसाठी राखीव) 11.) रोहा मधील 45-खारगांव, 12.) तळा मधील 47-मांदाड, 13.) माणगांव मधील 50-मोर्बा, 14.) महाड मधील 56-बिरवाडी,(महिलांसाठी राखीव) 15.) महाड मधील 57-नाते,(महिलांसाठी राखीव) 16.) पोलादपूर मधील 60-देवळे (महिलांसाठी राखीव)
खुला प्रवर्ग 1.) पनवेल मधील 1-पाले खुर्द, 2.) पनवेल मधील 2-नेरे,(महिलांसाठी राखीव) 3.) पनवेल मधील 5-रोडपाली, 4.) पनवेल मधील 6-तळोजा पाचनंद 5.) पनवेल मधील 13-गव्हाण, 6.) पनवेल मधील 14-वडघर, 7.) पनवेल मधील 15-केळवणे, 8.) कर्जत मधील 18-पाथरज,(महिलांसाठी राखीव) 9.) कर्जत मधील 21-सावळे 10.) खालापूर मधील 22-चौक,(महिलांसाठी राखीव) 11.) खालापूर मधील 23-वासंबे,(महिलांसाठी राखीव) 12.) खालापूर मधील 24-साजगांव, (महिलांसाठी राखीव) 13.) सुधागड मधील 25-जांभुळपाडा, 14.) सुधागड मधील 26-पाली, 15.) पेण मधील 28-दादर, 16.) पेण मधील 29-वडखळ, 17.) उरण मधील 32-चांणजे, 18.) उरण मधील 33-चिरनेर,(महिलांसाठी राखीव) 19.) अलिबाग मधील 35-कुर्डुस, 20.) अलिबाग मधील 36-मापगांव, (महिलांसाठी राखीव)  21.) अलिबाग मधील 37-थळ, 22.) रोहा मधील 41-राजपुरी, (महिलांसाठी राखीव)   23.) रोहा मधील 42-नागोठणे, (महिलांसाठी राखीव) 24.) रोहा मधील 44-वरसे, (महिलांसाठी राखीव)  25.) रोहा मधील 46-महागांव. (महिलांसाठी राखीव)  26.) माणगांव मधील 49-तळाशेत, (महिलांसाठी राखीव)  27.) माणगांव मधील 51-गोरेगांव, (महिलांसाठी राखीव) , 28.)  म्हसळा मधील 52-प्राभरे, 29.) म्हसळा मधील 53-वरवटणे, 30.) श्रीवर्धन मधील 54-बोर्लीपंचतन, (महिलांसाठी राखीव)  31.) श्रीवर्धन मधील 55-बागमांडला (महिलांसाठी राखीव)  32.) महाड 58-खरवली  (महिलांसाठी राखीव)  33.) महाड मधील 59-विन्हेरे (महिलांसाठी राखीव) 34.) पोलादपूर मधील 61-लोहारे
सदरील  आरक्षण हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार काढण्यात आले आहे. 28 तारखेस या आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द केले जाईल तद्नंतर काही आक्षेप, हरकती असल्यास त्याची सूनावणी विभागीय आयुक्तांकडे  होईल. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण सोडती नंतर दिली.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक