Posts

Showing posts from July 7, 2024

पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड(जिमाका)दि.12:- राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत हे मंगळवार, दि.16 जुलै 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहेत. सोमवार, दि.15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वा.खेड येथून मोटारीने अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण.  रात्रौ 9.00 वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. मंगळवार, दि.16 जुलै 2024 रोजी सकाळी 11.00 वा. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 1.00 वा. रायगड जिल्हा डोंगरी विभाग विकास समिती बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.  दुपारी 2.00 वा. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना रायगड जिल्हा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : आरसीएफ हॉल कुरुळ, अलिबाग. सायंकाळी 4.00 वा. राखीव. अलिबाग, सायंकाळी 6.00 वा. अलिबाग येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. ०००००००

जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी--जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड(जिमाका)दि.12:-  राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि  बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.  मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना ऐतिहासिक योजना आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’योजनेची आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी सा.प्र.रविंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण निर्मला कुचिक,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे,जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम कोशेट्टी,अलिबाग नगर परिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते     जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी या योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना यावेळी दिल्या. तसेच ग्रामपंचायत तसे

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड योजना महिला बचतगटांच्या माध्यमातून बांबू रोपे नर्सरी तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  रायगड (जिमाका)दि.11:-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त     शेतकऱ्यांनी बांबू लागवड    योजनेचा लाभ घेऊन शेती पूरक व्यवसायातून आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करावी, असे    आवाहन  जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांच्या माध्यमातून 1 कोटी बांबू रोपांची नर्सरी तयार करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हरित महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बांबू तसेच इतर वृक्ष मिशन मोडवर लागवड करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ.भरत बास्टेवाड, उपजिल्हाधिकारी रोहयो भारत वाघमारे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, निर्मला कुचिक, जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 1 कोटी बांबू रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महिला बचतगटांची मदत घेण्यात येणार आहे. महिला बचतगट

स्टॉप डायरिया अभियान व स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा व सुका निळा मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावी---मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

Image
           रायगड(जिमाका)दि.11:-  पावसाळयामध्ये  दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक जलजन्य आजार होतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जुंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येईल. यासाठी गावस्तरांवर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.  यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिले.  जिल्हास्तरीय कार्यशाळेस  प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाखले, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी (आरोग्य) वंदनकुमार पाटील, प्रकल्प व्यवस्थापक आर्थिक (जजीमि) संगीता पाटील  आदी मान्यवर उपस्थित होते.  मान्सून हंगामामध्ये जिल्हयांतील ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखून जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात उपलबध करून देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनसुार जिल्हयांत स्टॉप डायरिया अभियान राबविले जात आहे. या अभियानामध्ये गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य केंद्र  येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात य

जुनी रद्दी विक्रीसाठी इच्छुक पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात

  रायगड(जिमाका)दि.11:-  प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या कार्यालयातील जुने कालबाह्य झालेले अभिलेखे निर्लेखित काढण्याच्या दृष्टीने रद्दी म्हणून विक्रीस काढण्यात येणार आहेत. यासाठी पात्र खरेदीदारांकडून दि.10 जुलै  ते दि.22 जुलै 2024 (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळता) या कालावधीमध्ये निविदा मागविण्यात येत असून पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल सचिन विधाते यांनी केले आहे. मागविण्यात आलेल्या निविदा दि. 23 जुलै 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनेवल, केंद्रीय सुविधा भवन, दुसरा मजला लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली, पनवेल येथे उघडण्यात येतील.  निविदेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- शॉप अॅक्ट लायसन्स (अधिकृत व नोंदणीकृत खरेदीदार असल्याचे प्रमाणपत्र), टिन नंबर व जी.एस.टी. भरल्याबाबत रिटर्न, पॅनकार्ड, निविदाधारक हा सरकारमान्य प्रमाणपत्र धारक, अधिकृत रद्दीचा विक्रेता पाहिजे, पेपर मिलचे प्रमाणपत्र (व्यवसाय प्रमाणपत्र), अनामत रक्कम रूपये 10 हजार या राष्ट्रीय बँकेचा डी.डी. (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल RTO PANV

निर्लेखित साहित्याच्या विक्रीसाठी इच्छुक जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात

  रायगड(जिमाका)दि.10:-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड या संस्थेतील वापरुन निर्लेखित झालेल्या साहीत्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निर्लेखित झालेले हत्यारे, उपकरणे व लाकडी फर्निचर इत्यादी साहित्याचा समावेश असून इच्छुक जी.एस.टी. नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड एन.एस.पुरकर यांनी केले आहे. या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी. नोंदणीधारक खरेदी दारांकडून सिलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधित विभागामध्ये दि. 11 जुलै  ते दि.20 जुलै 2024 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायं.5.00 वाजेपर्यंत पहावयास मिळतील. याच कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/- (अक्षरी रुपये तीनशे मात्र) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल. या नमुन्यातीलं पूर्ण माहिती अचूकपणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5 हजार अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल सदर

ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत जिल्हा रुग्णालयास आवश्यक साहित्याची उपलब्धता

Image
    रायगड,दि.10(जिमाका) :- जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण आपल्या शारीरिक समस्यांवर उपचार घेण्यासाठी दुर्गम डोंगराळ भागातून येत असतात. सर्व सामान्यासमवेत गरीब गरजू रुग्ण येत असून त्यांची तापसणी व उपचार जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मोफत होतात. याकरिता ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत आवश्यक साहित्याची उपलब्धता करून देण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयातर्फे ओ.एन.जी.सी. प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, ओ.एन.जी.सी.चे जीजीएम प्लांट मॅनेजर  डी. के. त्रिवेदी, सिजीएम सपोर्ट मॅनेजर  एस.के. चांद, जी.एम. हेड एचआर  श्रीम. भावना आठवले, मॅनेजर एचआर  गौरव पतंगे, इन्चार्ज सीएसआर  अंकुर देसाई, सी एस आर को-ओर्डीनेटर अभिषेक पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी-घुगे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चेतना पाटील, जिल्हा लेखा व्यवस्थापक संतोष पाटील, कार्यालयीन अधीक्षक  राजेश किणी, अधिपरिचारिका श्रीम. गायत्री म्हात्रे, सहा.अधिपरिचारिका श्रीम. अनिता भोपी, इन्चार्ज सिस्टर सुविधा दवटे,

अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यानी काळजी घ्यावी--उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे

    रायगड,दि.10(जिमाका):-  सद्यस्थितीत भात पिकाची लागवड सर्वत्र सुरु आहे. जुलै महिन्यात बऱ्याच वेळा पावसाची तीव्रता वाढते, त्यामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होते अशावेळी रोपवाटिकेतील रोपांना अथवा लागवड केलेल्या भात पिकांच्या रोपांना हानी पोहचू शकते,त्यामुळे नुकसान संभवते. अतिपर्जन्यवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे. रोपवाटिकेतील क्षेत्रात तसेच भात खाचरामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. अति पावसात भात/ नाचणी रोपांची लागवड टाळावी किंवा पुढे ढकलावी. शेतालगतचे प-हे/नाले/मोऱ्या जास्तीत जास्त मोकळ्या करुन पाण्याचे वहन त्वरित कसे होईल, याची काळजी घ्यावी. रोपवाटिका गादी वाफ्यावर केली असेल तर त्यांच्यामधील चारी खोल करून पाणी निचरा होईन असे पहावे, रोपे जर राबावर सपाट वाफ्यात केली असल्यास चारी काढून शेतातील पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पुनर्लागवड केलेल्या भात आणि नाचणी खाचरातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. भात रोपे दोन दिवसांपर्यंत पाण्यात सापडल्यास पाण्याचा ओघ कमी

वरंध घाट 31 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

    रायगड(जिमाका)दि.10:-  रायगड जिल्हा हद्दीतील  भोर-महाड- वरंध घाट हा रस्ता प्रमुख राज्य मार्ग क्र.15 नवीन अधिसूचित पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. 965, डीडी किमी 60/000 (राजेवाडी) ते किमी 82/00 (वाघजाई मंदिराजवळ) या ठिकाणी दि.19 जून 2024 रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला असून त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतूकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी किमी 60/000 (राजेवाडी) ते किमी 81/600 (रायगड जिल्हा हद्द) वरंध घाट दरम्यानची सुमारे 21.600 कि.मी. लांबी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडल्याने जिवीत व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाची परिस्थितीनुसार या भागातील डोंगररांगामधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड, डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंध घाटातून प्रवास करणाऱ्या तसेच मालाची ने-आण करणाऱ्या व्यक्

नवीन ई-पॉस मशीन्स मुळे धान्य वितरणात येणार अधिक सुलभता आणि पारदर्शकता

  रायगड,दि.09(जिमाका):-  महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व 1 हजार 442 रास्त भाव धान्य दुकानांत नवीन ई-पॉस मशीन्स या Iris Scanner सह    उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  नवीन ई-पॉसमशीन्स या आकाराने मोठ्या असून वापरण्यास अत्यंत सुलभ आहेत. तसेच नवीन ई-पॉस मशीन्समुळे लाभार्थ्यांच्या अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरणाची (Thumb Authentication) गती देखील वाढणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्यात सन 2017 मध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ई-पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरूस्त होणे तसेच मशीनवर अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इ.समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे आत

भातशेती, भाजीपाला लागवड व पशुधनाबाबत शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन

    रायगड,दि.09(जिमाका):-   दि .07 जुलै 2024  रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक ऱ्यां नी भातशेती ,  भाजीपाला लागवड व पशुधनाबाबत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामार्फत  पुढील प्रमाणे काळजी घेण्याबाबतचे आवाहन  करण्यात आले  आहे.             भात आणि नागली-  पुर्नलागवड केलेल्या भात आणि नाचणी खाचरातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. सखल भागात पावसाचा अंदाज घेवून भात ,  नाचणी पुर्नलागवडीची कामे पुढे ढकलावी. मजगी आणि वरकस भागामध्ये भात आणि नागली पिकांची पुर्नलागवड पावसाची तिव्रता कमी असताना करावी.          भाजीपाला आणि नवीन लागवड-  भाजीपाला आणि नवीन लागवड केलेल्या फळझाडांमध्ये पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था करावी .         पशुधन-  पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधण्याची व त्यांना हिरवा चारा आणि स्वच्छ ,  मुबलक पाणी देण्याची व्यवस्था करावी.  कुक्कुटपालनाच्या ठिकाणी हवामान ऊबदार राहण्यासाठी विजेचे बल्ब लावण्याची व्यवस्था करावी. 0000000

काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या मुलांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचे आवाहन

Image
रायगड,दि.09(जिमाका):-  बालकांना काळजी व संरक्षणासाठी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने बालग्राम महाराष्ट्र, संचलित पंचदिप संकुल, से-12, प्लॉट नं-06, खांदा कॉलनी, सीकेटी कॉलेज समोर, पनवेल, जि.रायगड येथे काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले असून त्या मुलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) कु.गौरी जानू पवार, वय 08 वर्षे व कु.मधुरा जानू पवार वय 10  वर्षे 9 महिने, (दोन सख्ख्या बहिणी), 2) कु. शाबीर शेख, वय 09 वर्षे 10 महिने व कु.अब्दुल शेख वय 06 वर्षे 9 महिने, (दोन सख्खे भाऊ), 3) कु.प्रतिक धर्मा पाळमेळ, वय 9 वर्षे 10 महिने, 4) कु.सचिन मनोज गायकवाड वय 15 वर्षे 7 महिने  या सहा बालकांचे पालक व नातेवाईकांनी हे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत नामे संस्था बालग्राम महाराष्ट्र, संचलित पंचदिप संकुल, से-12, प्लॉट नं-06, खांदा कॉलनी, सीकेटी कॉलेज समोर, पनवेल, जि.रायगड 410206, मो.क्र.9823702297 वर संपर्क साधावा, अन्यथा बालकांची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून बाल कल्याण समिती, रायगड यांच्या मार्फत बालकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विन

जात वैधता प्रमाणपत्र देणेसाठी विशेष मोहिम

             रायगड ,  दि.  0 ८ (जिमाका):- अनु. जाती ,  विमुक्त जाती ,  भटक्या जमाती ,  इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थी ,  शासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचारी ,  इ. अर्जदारांनी दि. ३० जून २०२४ पूर्वी समितीस दाखल केलेल्या अर्जांच्या बाबतीत ज्या अर्जदारांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही ,  अशा अर्जदारांसाठी त्रुटीपूर्तता शिबिर शुक्रवार ,  दि. १२ जुलै रोजी स. ११.०० वा. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय ,   १४०२ अ ,  प्लॉट नं. ९ ,  स.नं. ७६/२ब ,  सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल मागे ,  चेंढरे ,  अलिबाग-४०२२०१. येथे आयोजित करण्यात आले आहे.               शैक्षणिक प्रयोजनार्थ सादर जात वैधता प्रमाणपत्र प्रस्तावांचे अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया नजीकच्या कालावधीत सुरु होत आहे. याकामी जात वैधता प्रमाणपत्र देणेबाबत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.उपरोक्त अर्जदारांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन विशाल नाईक , उपायुक्त तथा सदस्य , जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ,  रायगड  यांनी केले

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा

            रायगड , ( जिमाका) दि . 8:-   राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वार्डावण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल ,  हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.         कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात ,  ज्वारी ,  बाजरी ,  मका ,  नाचणी (रागी) ,  तूर ,  मूग ,  उडीद ,  सोयाबीन ,  भुईमुग ,  सुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.          पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै दूसेच भात ,  ज्वारी ,  बाजरी ,  मका ,  नाचणी (रागी) ,  तूर ,  सोयाबीन ,  भुईमुग व सुर्य

उडान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती

       रायगड , ( जिमाका) दि . 8:-  10  वी आणि  12  वी उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान-  GSP India ( https://www.gspindia.org/ udaan-scholarship ) SKF India, Sandvik Coromant  आणि  Atlas Copco  यांच्या सहयोगाने महाराष्ट्रातील दिव्यांग युवकांसाठी  “ उडान शिष्यवृत्ती योजना ”   दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती.        ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान  GSP India  ही संस्था मागील  42  वर्षांपासून ग्रामीण भागातील दिव्यांग युवकांसाठी काम करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमात महाराष्ट्रातील निवडक दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतरच्या शिक्षणासाठी सहाय्य केले जाते.         उडान शिष्यवृत्तीचे पात्रता निकष ,  तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या अपंगत्वाचे प्रमाण  40  टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.  तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तुम्ही  11  व

विविध कृषि पुरस्कार सन २०२३ साठी अर्ज करण्याचे आवाहन

         रायगड जिमाका दि. 8-   महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या ,  कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती/संस्था/गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार ,  वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार ,  जिजामाता कृषिभूषण पुरस्कार ,  सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार ,  उद्यानपंडीत पुरस्कार ,  वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार ,  वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार ,  युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत सन २०२३ या वर्षांमध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती / गट/ संस्था यांचे उपरोक्त प्रमाणे विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी / गट / संस्था / व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्

गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना जाहीर

         रायगड ,( जिमाका) दि.८:- महाराष्ट्र शासन कृषि ,  पशुसंवर्धन ,  दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग ,  शासन निर्णयनुसार ,  राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधासाठी प्रतिलिटर रक्कम रु. ५/- अनुदान ,  गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले आहे. तसेच दूध भुकटी भारताबाहेर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना रु. ३०/- प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान अनुज्ञेय करण्यांत येत आहे. सदर योजना दि.१ जुलं २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीपर्यंत लागू राहील. तरी रायगड जिल्हयातील सहकारी संस्थमार्फत/ खाजगी संस्थेमार्फत ,  सहकारी दूध संघास खाजगी दूध प्रकल्पास दूध पुरवठा करत असल्यास ,  सदरच्या सहकारी दूध संघास / खाजगी दूध प्रकल्पास या योजनेमध्य सहभागी होण्यासाठी त्यांचा अर्ज मा. आयुक्त ,  दुग्धव्यवसाय विकास ,  महाराष्ट्र राज्य यांना  ddemaharashtra@gmail.com   या ई मेल आयडीवर सादर करावा. अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.         सहकार / मल्टीस्टेट दूध संघासाठी संघाचे लेटरपॅडवर अर्ज ,  या अर्जासोबत सहकारी दूध संघाचे नांदणी प्रमाणपत्र , FSSI 

जिल्ह्यातील बेरोजगार महिला व युवांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

          रायगड , ( जिमाका) दि . 8:-   रायगड जिल्ह्यातील सर्व बेरोजागार महिला व युवकांना आवाहन  करण्यात येते की ,  जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,  रायगड-अलिबाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,  पनवेल आणि काळसेकर टेक्निकल कॅम्पस ,  पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील महिला व युवां करिता शुक्रवार  दि.  12  जुलै  2024  रोजी सकाळी   10.00  ते  04.00  वाजेपर्यंत काळसेकर टेक्निकल कॅम्पस ,  प्लॉट  2 63,  सेक्टर- 16,  खांदागाव ,  ठाणे नाका जवळ ,  पनवेल येथे विशेष महिला व युवां करिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे.             जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. / एच.एस.सी  ,  आय.टी.आय. ,  डिप्लोमा इंजिनियर ,  पदवी इंजिनियर ,  व इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. तसेच दिनांक  10  व  11  जुलै या दोन दिवसामध्ये उमेदवारांसाठी सॉफ्ट स्किल ,  सी.व्ही. बनवणे ,  मुलाखतीस सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले

आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होईल आदिती तटकरे यांच्या हस्ते डायलिसिस आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन

     रायगड , दि.६:-- उपजिल्हा  रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करीत असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार असून  रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.  आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होत आहेत, असे प्रतिपादन यावेळी अदिती तटकरे यांनी केले.           माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले.  यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपसंचालक डॉ .अशोक नांदापूरकर, जिल्हा चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.       यावेळी  तटकरे पुढे म्हणाल्या की,डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटर या सेवांमुळे रुग्णांच्या पैशांची बचत होणार आहे. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात अनेक अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.  लवकरच माणगांव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने  प्रयत्न करण्यात येणार आहे.       यावेळी  राजीव साबळे,  प्रमोद घोसाळकर, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, नीलिमा घोसाळकर,  विपुल उभारे,  क्रिश्ना डायग्नोस्टीक्स का

'मुख्यमंत्री-माझी बहीण लाडकी योजने'चा राज्यात अडीच कोटीहुन अधिक महिलांना लाभ मिळणार ---महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे माणगाव येथे मध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी नोंदणी शिबिराचा शुभारंभ

   रायगड, दि.६:--'मुख्यमंत्री-माझी बहिण लाडकी योजने'चा राज्यात अडीच कोटीहुन अधिक तर रायगड जिल्ह्यातील दहा लाखाहुन  अधिक महिलांना या योजनेचा मिळणार आहे. शेवटच्या घटकातील माता-भगिनीं पर्यंत पोहचविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद  केली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.    रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नोंदणी शिबिराचा  शुभारंभ  मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला.  यावेळी व्यासपीठावर  जिल्‍हाधिकारी किसन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड , माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका माया पकोले, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे, माणगाव नगरपंचायतीचे मुख्यधिकारी सांतोष माळी, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी दिलीपकुमार उपाध्ये ,महसूल, जिल्हा परिषद व महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.     मंत्री कु. तटकरे म्हणाल्या , राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने नोंदणी करणाऱ्या महिलांसाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने नोंदणी

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे* *--महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश* *रायगड जिल्ह्यातील तक्रारींची घेतली दखल

 रायगड, दि. 5 : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’  योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, पर्यवेक्षिका, वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे काम करुन घ्यावे, अशा सूचना  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात आज मंत्रालयात मंत्री कु.तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पवार उपस्थित होते. तर दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महिलापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अंगणवाडी केंद्रात या योजनेचे परिपूर्ण, माहितीचे फलक लावावेत, जेणेकरुन सर्व महिलांना योजनेसंदर्भातील पात्र-अपात्रतेचे निकष समजतील, अशा पद्धतीने नियोजन करुन घ्यावे. तसेच ऑफलाईन फार्म भरुन घेताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेवू नयेत, याबाबतच्या

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करणेचे आवाहन

रायगड, दि .5:--महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करणेकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/ दुर्बलतेनुसार चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरीता  तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना र.रु.3000/- त्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील. सदर योजनेबाबत अधिक माहिती व योजनेचे अर्ज प्राप्त करणेसाठी रायगड जिल्हातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि. रायगड ४०२२०१ या कार्यालयाशी संपर्क साधावा, अ

खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन योजनेअंतर्गत अर्ज मागविले *प्रशिक्षण, ५० टक्के अनुदान, तांत्रिक सहाय्य

   रायगड, दि .5:--महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्चीत झालेली आहे. अनुदाना करीता पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेची  मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करण्यात येते. महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांचा शासन निर्णय क्र. केव्हीबी २०१७/प्र.क्र. १६/उद्योग ६, दि. १८ जुन २०१९ अन्वये वैयक्तिक मधपाळ अथवा केंद्रचालक संस्थासाठी योजनेतील प्रमुख घटक,अटी  शर्ती  आणि पात्रता पुढील प्रमाणे आहेत.  अशा व्यक्तिच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही  व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था पात्रता संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्यावर