जिल्ह्यातील बेरोजगार महिला व युवांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

       रायगड, (जिमाका) दि .8:-  रायगड जिल्ह्यातील सर्व बेरोजागार महिला व युवकांना आवाहन  करण्यात येते कीजिल्हा कौशल्य विकासरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्ररायगड-अलिबाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्थापनवेल आणि काळसेकर टेक्निकल कॅम्पसपनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील महिला व युवां करिता शुक्रवार  दि. 12 जुलै 2024 रोजी सकाळी  10.00 ते 04.00 वाजेपर्यंत काळसेकर टेक्निकल कॅम्पसप्लॉट 2 63, सेक्टर-16, खांदागावठाणे नाका जवळपनवेल येथे विशेष महिला व युवां करिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

            जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. / एच.एस.सी आय.टी.आय.डिप्लोमा इंजिनियरपदवी इंजिनियरव इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. तसेच दिनांक 10 व 11 जुलै या दोन दिवसामध्ये उमेदवारांसाठी सॉफ्ट स्किलसी.व्ही. बनवणेमुलाखतीस सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे व फिटर,वेल्डर,मेकॅनिकल,प्लंबर इ. तांत्रिक कोर्स चे रिफ्रेशमेंट प्रशिक्षण ITI पनवेल येथे देण्यात येणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment - Job Seeker (Find A Job) – Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शन मधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे.

          रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री. महेश भा.वखरेलिपिक-टंकलेखक 9421613757 वर  संपर्क करावा. या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्रसहायक आयुक्तरायगड-अलिबाग श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड