Posts

Showing posts from July 6, 2025

नवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

  प   रायगड(जिमाका)   दि.11:-   जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,  रायगड - अलिबाग  व  पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सयांच्या संयुक्त विद्यमाने दि . 1 5  जुलै , 2025   रोजी सकाळी  10.00  ते दुपारी 0 2.00  या वेळेत आपल्या डॉ.के.एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस, प्लॉट न. 10, सेक्टर 16 न्यू पनवेल  इस्ट ता.पनवेल  येथे   पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा   व   मुख्यमंत्री   युवाकार्य   प्रशिक्षण   योजना (Internship) उमेदवार   निवड   मेळावा  आ योजित   करण्यात आला असून जिल्ह्यातील  जास्तीत   जास्त   बेरोजगार   उमेदवारांनी   या   रोजगार   मेळाव्याचा  लाभ  घ्यावा ,  असे   आवाहन   जिल्हा   कौशल्य   विकास,   रोजगार व उद्योजकता   मागदर्शन   केंद्र ा च्या   सहायक   आयुक्त   श्रीम.अ.मु.पवार   यांनी   केले   आहे. जिल्ह्यातील   नामांकीत ...

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) दि.10 ते 14 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

    रायगड(जिमाका)दि.11:-   पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावर आलेले दगड, गोटे व माती काढण्याच्या कामाकरिता 04 दिवस लागणार असल्याने दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 रोजीपर्यंत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड व तहसिलदार पोलादपूर यांनी केलेल्या विनंतीनुसार  दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 या कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्याबबात जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे. त्यानुसार नागरिकांनी सदर कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून  पोलादपूर-माणगाव ताम्हाणी मार्गे पुणे-सातारा व पोलादपूर-चिपळूण-पाटण-सातारा-को ल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. ०००००००००

विकसित महाराष्ट्र 2047 साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

    रायगड (जिमाका)दि.10:- विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध 16 क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत -भारत @ 2047 करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2029 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन जाहिर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी   https://wa.link/o93s9m  यावर आपले मत नोंदवावे.

सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी

    रायगड (जिमाका) दि.09 :- यापूर्वी प्रसिध्द केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमीत करुन पाच वर्षांच्या कालावधीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी  सन 2025-2030 साठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार तालुका निहाय सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी केली आहे. अलिबाग तालुका-   ग्रामपंचायत संख्या 62,   अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 0,महिला 1,   अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 6,   नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा-खुला 17, महिला 16. मुरुड तालुका-   ग्रामपंचायत संख्या 24,   अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 0,महिला 1,   अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 3,महिला 2,   नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 3, महिला 4, सर्वसाधारण जागा-खुला 6, महिला 5. पेण तालुका-   ग्रामपंचायत संख्या 64,   अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 0,...

मुरुड तालुक्यातील सरपंच पदे आरक्षण सोडत दि.15 जुलै रोजी

    रायगड(जिमाका),दि.9 :-   मुरुड तालुक्यातील, मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूकनियम 164 नियम 2 अ (1) ते (6) प्रमाणे सन 2025-2030 चे निवडणूकीकरता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. मुरुड तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीची सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारणकरीता राखून ठेवण्यात आलेले आहेत. त्या ग्रामपंचायतीपैकी सोडत सरपंचपदे आरक्षित करण्यासाठी दि.15 जुलै 2025 रोजीसकाळी 11.00 वा. पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती, मुरुड येथे सभा आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी, उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार मुरुड आदेश डफळ यांनी केले आहे. ००००००

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

    रायगड(जिमाका),दि.9   : -   राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती मांग-मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील दारिद्रय रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.300000/-पर्यंत) बेरोजगांराकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या  50 टक्के   अनुदान योजना, बिजभांडवल योजना तसेच थेट कर्ज योजने च्या लाभाकरिता  जिल्ह्यातील   इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा चे जिल्हा व्यवस्थापक रविंद्र धनुर यांनी केले आहे. जिल्ह्यातील मातंग व समाज व तत्सम  12   पोट जातीतील लोकांना आर्थिक लाभ देण्यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महामंडळाने निश्चित केलेल्या जिल्हानिहाय भौतिक व आर्थिक उ‌द्दिष्टाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.   अनुदान योजना , प्रकल्प मर्यादा 0.50 लाख, उद्दिष्ट 40, भौतिक उद्दिष्ट 40.   बीज भांडवल योजना   प्रकल्प मर्यादा 7.00 ल...

अलिबाग तालुक्यातील सरपंच पदे आरक्षण सोडत दि.15 जुलै रोजी

    रायगड(जिमाका),दि.9:  मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 164 नियम 2 अ (1) ते (6) प्रमाणे अलिबाग तालुक्यातील सन-2025-2030 च्या निवडणूकीकरता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. अलिबाग तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीची सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण करीता राखून ठेवण्यात आलेले आहेत. त्या ग्रामपंचायती पैकी सोडत सरपंच पदे आरक्षित करण्यासाठी दि. 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 वा. नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, ता.अलिबाग येथे सभा आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी, उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार अलिबाग विक्रम पाटील यांनी केले आहे. ००००००