Posts

Showing posts from April 17, 2022

प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
अलिबाग, दि.22 (जिमाका):- पत्रकारांची पेन्शन, त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी आदी प्रश्न सोडविण्याचा शासनाच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. रायगड प्रेस क्लबच्या 16 वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा रायगड प्रेस क्लब व माणगाव प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित केला होता, या प्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ माध्यमकर्मी व प्रमुख मार्गदर्शक समीरण वाळवेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शक एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोकण विभाग मराठी पत्रकार परिषद सचिव विजय मोकल, मेघराज जाधव, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, माजी अध्यक्ष अनिल भोळे, अभय आपटे, मिलिंद अष्टीवकर आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी श्री.देशमुख यांच्या मागणीचा संदर्भ देत पत्रकार पेन्शन योजनेसाठी 35 कोटींची तरतूद केली आहे त्याचबरोबर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी स

आपत्तीच्या वेळी कायम सतर्क राहावे - तहसिलदार मिनल दळवी

  अलिबाग, दि.22 (जिमाका):- जीवनात महापूर, ढग फुटी, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती केव्हाही येऊ शकतात, यासाठी कायम सतर्क राहून आपल्या गावातील नागरिकांना मदत करण्यासाठी आपण स्वतः सक्षम असले पाहिजे, त्यासाठी आपल्याला माहिती हवी व याचा लाभ इतरांना द्यायला हवा, असे प्रतिपादन अलिबाग तहसिलदार मिनल दळवी यांनी आज येथे केले. अलिबाग तहसील कार्यालयाने जिल्हा नियोजन सभागृहात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नायब तहसिलदार अजित टोळकर, रायगड भूषण व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, अलिबाग तालुक्यातील 150 मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील उपस्थित होते. या कार्यशाळेत आपत्ती सुरक्षा मित्र, योगशिक्षक सुहास गानू यांनी योगाचे महत्व व प्रात्यक्षिक दाखविले. यानंतर जयपाल पाटील यांनी उपस्थितांना विजेच्या वस्तू, गॅस सिलेंडर, गिझर यांच्यामुळे होणाऱ्या दूर्घटना, सर्पदंश, विचू दंश व त्यावरील उपाययोजना याबाबतची माहिती दिली. रायगड वाहतूक पोलीस प्रशांत म्हात्रे यांनी महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन क्रमांक 112 तसेच रुग्णवाहिकेसाठी हेल्पलाईन क्रमांक

जिल्हा प्रशासन लागले मान्सून पूर्वतयारीला; जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

Image
मागील अनुभवांचा अभ्यास करून  “ झिरो लॉस ” चा संकल्प करावा   अलिबाग, दि.22 (जिमाका):- आजची ही आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा मान्सून पूर्व तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. मागील काही काळात घडलेल्या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करावा आणि मनुष्य व संपत्तीच्या “ झिरो लॉस ” चा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज येथे केले. मान्सून-2022 पूर्वतयारी आढावा बैठक व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, विविध शासकीय कार्यालयांचे कार्यालयप्रमुख, यशदाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे संचालक कर्नल सुपणेकर, कोस्ट गार्डच्या चांदनी चॅटर्जी, एनडी

माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उभारण्यासाठी शासकीय जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश पारित

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे  जिल्ह्याच्या विकासकामांमधील आणखी एक यश अलिबाग, दि.22 (जिमाका):- जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सुसज्ज असणे महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारच्या आत्याधुनिक आरोग्य सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे कायम आग्रही असतात. रायगड आरोग्य सुविधा संपन्न होण्यासाठी माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उभारण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यासाठी माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट बांधकामासाठी शासकीय जमीन मिळण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शासनाला विनंती केली होती. या विनंतीच्या अनुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या बाबीचा नियमितपणे पाठपुरावा केला. याबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार माणगाव उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ पडताळणी करुन माणगाव तालुक्यातील मौजे खांदाड ट्रॉमा केअर युनिट बांधकामासाठी शासकीय जागा प्रस्तावित केली. मौजे खांदाड, ता.माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट बांधकामासाठी येथील गट नंबर 684 क्षेत्र 0.34.00 हेक्टर आर जमीन शासनाकडे पुर्नग्रहण करण्यात येवून सदरचे क्षेत्र ट्रामा केअर युनिटकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीन

नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षा 30 एप्रिल रोजी

अलिबाग, दि.22 (जिमाका):- माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील नवोदय विद्यालयाची इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा   शनिवार, दि . 30   एप्रिल 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील एकूण   15   केंद्रांवर होणार आहे. त्यासाठीचे विद्यार्थी प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याची माहिती प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील   15   परीक्षा केंद्रांवर   2 हजार 576   विद्यार्थी यावेळी इयत्ता सहावी वर्ग पात्रता परीक्षेसाठी बसत आहेत. एकूण   80   जागांसाठी यातून विद्यार्थी निवडले जाणार असून परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांकासह परीक्षा ओळखपत्रे   www.navodaya.gov.in   या विद्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि विद्यार्थी जन्मतारीख हे ओळखपत्रांचे पासवर्ड असणार आहेत. या प्रवेश पत्रांच्या दोन प्रती विद्यार्थ्यांनी काढाव्यात. एक प्रत परीक्षा केंद्रावर जमा करून घेतली जाणार आहे तर दुसरी प्रत विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. दोन्ही प्रतींवर विद्यार्थी पाचवी इयत्ता ज्या शाळेत सध्या शिकत आहे ,   त्या शाळेच्या मुख्या

मुरुड तालुक्यातील नांदगाव-दांडा येथे पर्यटन उद्योजकीय कार्यशाळा संपन्न

Image
अलिबाग,दि.22 (जिमाका):- नांदगाव बीच परिसरात कार्यरत असलेले हॉटेल व्यवसायिक, होम स्टे, कृषी पर्यटन धारक आणि रिसॉर्ट व्यवसायिक यांच्यासाठी पर्यटनावर आधारित कार्यशाळा नांदगाव बीच संस्था आणि पर्यटन संचालनालय (DoT)कोकण विभाग नवी मुंबई   यांनी संयुक्त विद्यमाने   कंदील रिसॉर्ट, मौजे.नांदगाव-दांडा येथे दि.21 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. या पर्यटन कार्यशाळेत जवळपास 38 हॉटेल व्यवसायिक, होम स्टे धारक, रिसॉर्ट व्यवसायिक आणि कृषी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी श्री.हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग नवी मुंबई, निसर्ग पर्यटनचे संचालक श्री.संजय नाईक, बिजनेस कोच व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.संतोष कामेरकर, नांदगाव बीच संस्थेचे अध्यक्ष श्री.महेश मापगवकर, नांदगाव बीच संस्थेचे उपाध्यक्ष श्री.स्वप्नील चव्हाण, सचिव श्री.तुषार दिवेकर आणि अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे श्री.निमेश परब, इंडोलॉजी प्रशिक्षक श्रीमती संगीता कळसकर आणि निसर्ग पर्यटनच्या संचालिका सौ.श्वेता नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत पर्यटन कोकण विभाग, नवी मुंबईचे उपसंचा

आम्ही आपल्या सोबत आहोत..खूप अभ्यास करा..रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा..! - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांशी पालकमंत्र्यांनी साधला दिलखुलास संवाद अलिबाग,दि.21 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पहिली तुकडी पाहताना होत असलेला आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. तब्बल एका दशकानंतर रायगडकरांची स्वप्नपूर्ती होताना खूप समाधान मिळत आहे. मुलांनो आम्ही आपल्या सोबत आहोत..खूप अभ्यास करा..रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. येथील अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आरसीएफ कॉलनी, कुरुळ येथे अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे, अपर   जिल्हाधिकारी श्री.अमोल   यादव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने, सह अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, कार्यकारी अभियंता श्री.जगदीश सुखदेवे, उपविभाग

सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शासन प्रयत्नशील - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
  पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते  सर्वरोग निदान आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन संपन्न   अलिबाग,दि.21 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. म्हणूनच केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या माध्यमातून भव्य आरोग्य मेळावा, मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अलिबाग येथे सर्व रोग निदान आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित "सर्वरोग निदान आरोग्य मेळावा" चे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग-रायगड येथे संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.   यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर   जिल्हाधिकारी श्री.अमोल   यादव, अधिष्

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत (VSTF) वडगाव येथे जनजागृती कार्यशाळा संपन्न

Image
अलिबाग,दि.20 (जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व ग्रामपंचायत वडगाव यांच्या माध्यमातून वडगाव येथे कोरोना मुक्त गाव… लोकजागर आरोग्याचा… हर घर दस्तक… या विषयांवरील जनजागृती कार्यशाळा   घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची ओळख व आरोग्याचे महत्व तसेच जागर आरोग्याचा उपक्रमाचे आयोजन याबद्दल सविस्तर माहिती देऊन गृह भेटीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जाणीव जागृती होण्यासाठी त्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. आरोग्य सेविका श्रीमती लांगे यांनी कीटकजन्य आजार व जलजन्य आजार याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सर्वांना स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता आवाहन केले. आरोग्य सेविका श्रीमती चव्हाण यांनी इतर आजार व करोना लसीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच करोनाच्या संभाव्य 4थ्या लाटेविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी सरपंच शिवाजी गावडे, ग्रामसेविका श्रीमती लवटे, आरोग्यसेविका श्रीमती चव्हाण, श्रीमती लांगे, माणगाव तालुका समन्वयक दत्तात्रय गायकवाड व ग्रामस्थांची उपस्थिती होती. 00000

कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे रुजू

Image
वर्षभरात महावितरणच्या एकूण महसूलात 50 टक्क्यांपर्यंत योगदान वाढविण्याचा संकल्प   अलिबाग,दि.20 (जिमाका):- महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी श्री.चंद्रकांत डांगे (भा.प्र.से) नुकतेच रुजू झाले आहेत. ते 2010 च्या केडरचे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. महावितरणच्या एकूण महसूलात कोकण प्रादेशिक विभागाचे सध्या असलेले 43 ते 45 टक्के योगदान येत्या वर्षभरात 50 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.   श्री.डांगे यांनी आयआयटी खरगपूर येथून औद्योगिक अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून 1994 मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. नागपूरचे अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव महानगरपालिका आयुक्त, मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात सहसचिव, ठाण्याच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक आदी पदांवर त्यांनी आपल्या लोकाभिमुख कामाचा ठसा उमटविला असून प्रशासकीय सेवेतील 28 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्

वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान उपलब्ध; इच्छुक पशुपालक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

अलिबाग,दि.20 (जिमाका):- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता प्रति हेक्टर रुपये तीस हजार प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या योजनेंर्तगत रायगड जिल्ह्याकरिता 15 हेक्टर क्षेत्राकरिता 4.5 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी पशुपालकांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. प्रति हेक्टर 7.5 किलो शेवगा (पी के एम 1) बियाण्यांची किंमत रु.6 हजार 750 व अनुदान रु.23 हजार 250 हे दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. याचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड खताची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, रायगड-अलिबाग / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद/ पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा

पेण उपजिल्हा रुग्णालय येथे आयुष्यमान आरोग्य मेळावा संपन्न

अलिबाग,दि.19 (जिमाका):-  महात्मा ज्योति राव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य  योजनांतर्गत  महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेण उपजिल्हा रुग्णालय येथे दि.18 एप्रिल 2022 रोजी आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबिराकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी वंदन कुमार पाटील, तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे आदी उपस्थित होते. या आरोग्य शिबिराचा उच्च रक्तदाब व मधुमेह: 152, नेत्ररोग: 192, स्त्रियांचे आजार: 69, रक्त लघवी तपासणी: 139, फिजिशियन: 370, लहान मुलांचे: 17, दंत चिकित्सा: 10, नाक-कान-घसा: 35, अस्थिरोग: 25 अशा एकूण 692 रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजीव तांभाळे, गटविकास अधिकारी श्री.मांगु गढरी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अपर्णा खेडेकर यांनी केले. या आरोग्य शिबिरात फिजिशियन डॉ.श्री

"किसान भागीदारी प्राथमिकता हमारी" मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील पंचायत राज दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC)उपलब्ध करण्याचे नियोजन

             अलिबाग,दि.19 (जिमाका) :- केंद्र शासनाने दि.06 फेब्रुवारी 2020 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्याना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची मोहीम देशात सुरू केली आहे. ही मोहीम भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून देशात राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दि.24 एप्रिल 2022 रोजी   पंचायत राज दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पी.एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत    नियोजन   करण्यात येणार आहे.                यानुषंगाने केंद्र शासनाने दि.24 एप्रिल 2022 ते दि.01 मे 2022 या कालावधीत "किसान भागीदारी प्राथमिकता हमारी" नावाची मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले आहेत.               राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालानुसार राज्यात पी.एम.किसान नोंदणीकृत एकूण 114.93 लाख लाभार्थ्यांपैकी 89.36 लाख लाभ

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यात आरोग्य मेळाव्यांचे आयोजन

आरोग्य मेळाव्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन अलिबाग,दि.18 (जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात दि.18 ते 22 एप्रिल 2022 प्रत्येक आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य मेळाव्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आरोग्य मेळाव्याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर पंचायत समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. यामध्ये गटविकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी, तालुका समाजकल्याण अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य आहेत. या मेळाव्याचा शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या आरोग्य मेळाव्यांमध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा तज्ञ, दंतशल्यचिकित्सक, भिषक अशा विविध वैद्यकीय तज्ञांमा