माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उभारण्यासाठी शासकीय जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश पारित

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे जिल्ह्याच्या विकासकामांमधील आणखी एक यश


अलिबाग, दि.22 (जिमाका):- जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सुसज्ज असणे महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारच्या आत्याधुनिक आरोग्य सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे कायम आग्रही असतात.

रायगड आरोग्य सुविधा संपन्न होण्यासाठी माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उभारण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.

त्यासाठी माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट बांधकामासाठी शासकीय जमीन मिळण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शासनाला विनंती केली होती. या विनंतीच्या अनुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या बाबीचा नियमितपणे पाठपुरावा केला. याबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार माणगाव उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ पडताळणी करुन माणगाव तालुक्यातील मौजे खांदाड ट्रॉमा केअर युनिट बांधकामासाठी शासकीय जागा प्रस्तावित केली.

मौजे खांदाड, ता.माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट बांधकामासाठी येथील गट नंबर 684 क्षेत्र 0.34.00 हेक्टर आर जमीन शासनाकडे पुर्नग्रहण करण्यात येवून सदरचे क्षेत्र ट्रामा केअर युनिटकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे शासकीय जागा हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी सर्व दृष्टीने अनुकूल अशा या ठिकाणी ट्रॉमा केअर उभारण्यासाठी मिळालेल्या शासकीय जागेमुळे पालकमंत्री कु.तटकरे यांच्या संकल्पनेतील आरोग्य संपन्न-रायगड ही संकल्पना पूर्णत्वास नेणारे एक यशस्वी पाऊल पडल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक