Posts

Showing posts from October 28, 2018

केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण राज्यमंत्री ना.अनुप्रिया पटेल यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, दि.3 (जिमाका)- केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण राज्यमंत्री ना.श्रीमती अनुप्रिया पटेल या रविवार दि. 4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.    त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-             रविवार दि. 4 रोजी सकाळी साडे नऊ वा. संस्कार एचओसी एम्प्लॉईज सह.गृहनिर्माण संस्था, स्वामी नित्यानंद मार्ग पनवेल येथे आगमन.   सकाळी साडेनऊ   ते सव्वादहा राखीव.   सकाळी 10.25 मि.नी. ज्येष्ठ नागरिक सभागृह, पनवेल महानगरपालिकेजवळ येथे आगमन व नागरिक सत्कार समारंभास उपस्थिती.   सकाळी साडेअकरा वा.मुंबईकडे प्रयाण. 00000

राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा समारोपः पुणे विभागाचे वर्चस्वः उत्तम खेळाडू सर्व क्षेत्रात यशस्वी होतो- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.3 (जिमाका)- स्पर्धेतील यश अपयश खेळाडू खिलाडू वृत्तीने स्विकारतो. त्यामुळे त्याला जीवनात येणारे यश अपयश हाताळण्याची सवय होते, म्हणून खेळाडू हा निश्चितपणे जीवनातील सर्वच क्षेत्रात यशस्वी होतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि.2) राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस व समारोप समारंभ प्रसंगी केले.  या स्पर्धेत पुणे विभागाने 14 वर्षाखालील मुली व 19 वर्षाखालील मुले संघाने प्रथम क्रमांक तर 19 वर्षाखालील मुलींच्या गटात तृतिय क्रमांक संपादन करुन वर्चस्व राखले. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे आयोजित या समारंभप्रसंगी शिवछत्रपती राज्य क्रीडा पूरस्कार विजेत्या डॉ. नंदिनी बोंगाडे, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे महासचिव सुरेश बोंगाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, रायगड जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेचे सौगत दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तर स्पर्धेत राज्याच्या विविध आठ विभागामधून 576 खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक सहभागी झाले होते. या स्पर्धेतील सर्व सहा गटातील प्रथम, व्दितीय व तृतिय क्रमांक संपाद

जुलै ते सप्टेंबर 2018 च्या चलनाची तिसरी प्रत व प्रिंट घेऊन जाण्याचे आवाहन

अलिबाग, जि. रायगड, दि.2 (जिमाका)- जुलै ते   सप्टेंबर 2018 या कालावधीतील चलनाची तिसरी प्रत व प्रिंट घेऊन जाण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाने दि.24 ऑक्टोबर 2018 रोजी ईमेलद्वारे संदेश पाठविलेला होता.   तरी सुध्दा जुलै ते   सप्टेंबर 2018 या कालावधीतील चलनाची तिसरी प्रत व प्रिंट घेऊन गेलेले नाहीत.    ज्या कार्यालयांनी चलनाच्या तिसरी प्रत व प्रिंट नेलेल्या नाहीत त्यांनी तात्काळ कोषागार कार्यालयातील श्री.गिरासे व.लि. व श्री.राऊत ले.लि. संकलन शाखा यांच्याशी संपर्क साधून चलनाची तिसरी प्रत व प्रिंट घेऊन जाव्यात असे आवाहन अपर कोषागार अधिकारी अलिबाग यांनी कळविले आहे. 00000

वाहन व पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव 13 नोव्हेंबर रोजी

अलिबाग, जि. रायगड, दि.2 (जिमाका)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण तसेच जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, बसस्थानक येथे अनेक वर्षांपासून वाहने  कर व दंड न भरल्यामुळे आणि इतर कारणासाठी  अटकावून ठेवलेली आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये नोंदणी प्राधिकाऱ्यांना  असलेल्या अधिकारात नोटीस जाहिर करण्यात येत आहे.  वाहन मालकांना, ताबेदाराना, वित्तदात्यांना जाहिररित्या कर व दंड भरुन वाहने सोडवून नेण्यासाठी अवगत केले आहे.  त्याचप्रमाणे वेळोवेळी मोटार वाहन मालकांना, ताबेदाराना, वित्तदात्यांना आवाहन करुनही मोटार वाहन मालक कर दंड भरण्यासाठी हजर झाले नाहीत.  परिणामी वाहने खराब होत आहेत. त्यामुळे शासनाचाही महसूल वसूल होत नाही.  वायुवेग पथकांनी वेळोवेळी अटकावून वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर पोचदेय डाकेने नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.  मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असताना देखील सदर वाहनांच्या मालकांनी या कार्यालयास तसे कळविलेले नाही.  वाहन मालकांना, ताबेदाराना, वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्य

हवामानावर आधारित फळपिक विमा योजनाः काजूसाठी 30 नोव्हेंबर तर आंब्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत

अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- रायगड जिल्ह्यात आंबिया बहार सन 2018-19 मध्ये फळपिकासाठी विमा योजना  प्रधानमंत्री फसल बिमा योजने अंतर्गत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना या नावाने कार्यान्वीत आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचा अंतिम कालावधी मुदत काजू फळ पिकासाठी 30 नोव्हेंबर व आंबा या फळपिकासाठी 31 डिसेंबर 2018 अखेरपर्यत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  पांडुरंग भा. शेळके यांनी केले आहे. 1.     योजनेची उद्दीष्टे :- 1.कमी/जास्त पाऊस,पाऊसाचा खंड,वेगाचा वारा. 2.पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. 2.       योजनेची वैशिष्टये :-     1.कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.    2.शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर          यापैकी जी कमी असेल ती रक्कम असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. 3.       योजना कार्यान्वयीन यंत्रणा :- ॲग्

राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धाः दर्जेदार क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करा- डॉ. नंदिनी बोंगाडे

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)-   प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे तशी क्रीडा क्षेत्रातही आहे. खेळाडूंनी स्पर्धेचे दडपण न घेता त्यांचा मुळ खेळ खेळून दर्जेदार कौशल्याचे प्रदर्शन सातत्यपुर्ण प्रयत्न व कठोर परिश्रम घेऊन करावे, असे मार्गदर्शन हॅण्डबॉल खेळातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या डॉ. नंदिनी बोंगांडे यांनी आज येथे केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतिने जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन सौ. बोंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी रायगड जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संघटक सूर्यकांत ठाकूर, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे महासचिव सुरेश बोंगाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, रायगड जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेचे सौगत दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते.   त्यापुढे म्हणाल्या की या स्पर्धेमधून राज्याचा संघ निवडण्यात येणार असून स्पर्धेत चमकदार कामगीरी करणाऱ्या खेळाडूंची पारदर्शकपणे निवड करण्यात येई

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवारी

अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक येत्या सोमवार दि.5 रोजी दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.  असे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

स्वाधार व उज्वला योजनाः प्रस्ताव सादर करण्यास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत

अलिबाग, जि. रायगड, दि. 1 (जिमाका)- महाराष्ट्र शासनाने संकटग्रस्त पिडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी   केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना आणि अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी उज्वला योजना राज्यात कार्यन्वीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बालविकास क्षेत्रात कार्य करण्याऱ्या ज्या संस्थांनी सदर योजनेस मान्यता मिळणेबाबत प्रस्ताव सादर केले आहेत अशा संस्थांनी त्रुटीची पुर्तता करुन त्रुटी पुर्ततेचा अहवाल व ज्या संस्थांना नव्याने प्रस्ताव सादर करावयाचे आहेत , अशा संस्थांनी सुद्धा विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 30 नोव्हेंबर 2018 अखेर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास सादर करावेत. स्वाधार योजनेकरीता अटी व शर्ती : 1.       संस्था संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी. 2.       संस्थेत महिला व बालविकास क्षेत्रातील किमान 5 वर्ष कामाचा अनुभव असावा. 3.       संस्थेचे सनदी लेखापाल यांनी केलेल्या लेखापरिक्षणाच्या अहवालाच्या मा