Posts

Showing posts from September 10, 2023

जिल्हा परिषदेमार्फत पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत सहभागी होण्याचे डॉ.भरत बास्टेवाड यांचे आवाहन

    रायगड(जिमाका),दि.15:- गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेश उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गणेश मंडळे, व्यक्ती, संस्था, बचत गट तसेच ग्रामपंचायती यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. यासाठी  https://tinyurl.com/ ganeshraigad2023  या गुगल लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे. या गुगल लिंक वर गणेशोत्सव कालावधीत राबविलेल्या उपक्रमाचे फोटो व व्हिडीओ अपलोड करावयाचे आहेत. फोटो व व्हिडीओ स्पष्ट असावेत सहभागी मंडळानी निर्माल्य व्यवस्थापन पाणी व स्वच्छता विषयी जनजागृतीसाठी स्लोगन, प्लास्टिक बंदीची जिंगल्स, बॅनर्स, पोष्टर द्वारे जनजागृती करणे श्रमदानातून परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, प्लास्टिक संकलन कृत्रिम तलावात गणेशा म

दि.17 ऑक्टोबर ते दि.30 नोव्हेंबर 2023 या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेंतर्गत करता येणार आगाऊ मतदार नोंदणी

  रायगड(जिमाका),दि.15:-  आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र आता 1 जानेवारी , 1 एप्रिल,1 जुलै, आणि 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना दि. 17 ऑक्टोबर 2023 ते दि.30 नोव्हेंबर 2023  या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.      निवडणूका न्याय्य व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारयाद्यांचे शुद्धीकरण व अद्यावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाईल.तसेच या कालावधीत दावे व हरकती देखील स्विकारण्यात येणार असून दि.26 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत व. दि.5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.         मतदारांनी आपले नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, मतदान ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इत्यादी तपशी

भारतीय पोस्ट विभागाने ढाई आखर वार्षिक पत्र लेखन स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवल्या

    अलिबाग (जिमाका),दि.13:-   भारतीय पोस्ट  विभागाने    ढाई आखर वार्षिक पत्र लेखन प्रतियोगिता २०२३-२४ अंतर्गत - “ नये भारत केलीये डिजिटल इंडिया ” ( Digital India for New India)  या   विषयावर पत्र लेखन स्पर्धैची घोषणा केली असून    त्याची प्रवेशिकेची पत्रे चीफ पोस्टमास्टर जनरल ,   महाराष्ट्र सर्कल यांनी    31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मागवले आहेत. स्पर्धेसाठी देश   पातळी बक्षीस रक्कम पहिला क्रमांक 50 हजार दूसरा क्रमांक ,   25 हजार रुपये ,  तिसरा क्रमांक 10 हजार रुपये तसेच राज्य   पातळी पहिला क्रमांक बक्षीस रक्कम   25 हजार रुपये ,  दूसरा क्रमांक   10 हजार रुपये व तिसरा क्रमांक   5 हजार रुपये ,   स्पर्धेसाठी मराठी हिंदी/ इंग्लिश किंवा प्रादेशिक भाषेमध्ये अ) आंतरदेशीय पत्र श्रेणी (500 शब्द) (ब) लिफाफा श्रेणी     ( 1000 शब्द) नुसार 18 वर्षापर्यंत    व    18वर्षापुढील सर्व नागरीक या दोन स्वतंत्र वयोगटात भाग घेता येईल.                या पत्रावर खालील वयाचे प्रमाणपत्र    लिहिणे बंधनकारक आहे.  यामध्ये  “  मी प्रमाणित करतो की मी    दिनांक 01/01/ 2023 या   तारखेला 18 वर्षाखाली / वर   आहे ”  अशी नोंद कर

मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश सुरु

  रायगड(जिमाका) 13 :-   सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण यांच्या अंतर्गत मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे   शासकीय वसतीगृहात सन 2023-24 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हुशार ,होतकरु, मागासवर्गीय,अर्थिकदृष्ट्या मागास, गरीब, विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार असून वसतीगृहातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत 20सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत आहे. विहित नमुन्यातील अर्ज वसतिगृहात खालील पत्त्यावर विनामूल्य् उपलब्ध आहेत. 1.मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अलिबाग, गणेशमंदिर शेजारी,विजय नगर,वरसोली-अलिबाग.2.मागासवर्गी य व अर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह अलिबाग,दिव्या अपार्टमेंट,आर.सी.एफ.गेट समोर वेश्वी-अलिबाग,3. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह महाड तालुका पोलीस स्टेशनजवळ, नवेनगर, महाड जि.रायगड,4. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह तळा,तालुका क्रीडासंकुलाजवळ, बोरघर-हवेली,ता.तळा.5. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, चंद्रकांत कॉम्प्लेक्स, चांभारखिंड,रिलायन्स् पेट्रोल पंपाशेजारी, महाड,6. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह पनवेल सेक

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन

      रायगड(जिमाका) 13 :-   महिला बचत गटांना रोजगाराचे साधन खुले व्हावे, यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेत अलिबाग शहरातील कुंठे बाग येथे गणेशोत्सव अनुषंगाने बचतगटांसाठी विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी आज महोत्सवाचे उद्घाटन केले. महोत्सवातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या माध्यमातून महिला बचत गट स्थापन करण्यात येतात. बचत गटातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी साह्य करण्यात येते. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी विविध ठिकाणी महोत्सव भरविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गणेशोत्सव निमित्त विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात सप्तशृंगी महिला स्वयंसहायता समूह, यशदा महिला स्वयंसहायता समूह, नवोदय महिला स्वयंसहायता समूह, तेजोमय महिला स्वयंसहायता समूह, देविका महिला स्वयंसहायता समूहाने स्टॉल लावले आहेत. स्टॉलवर गणपती

जिल्हास्तरीय आयुष्यमान भव अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या हस्ते शुभारंभ

                  रायगड(जिमाका) 13 :-   रायगड जिल्हा टीबी मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूयात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले. जिल्हास्तरीय आयुष्यमान भव अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात डॉ.बास्टेवाड यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विठ्ठल इनामदार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमती जोशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे हे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात क्षयरुग्णांना दत्तक घेण्यात नागरिक आणि संस्था सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात  क्षयरुग्णांना  औषधे व सीएसआर मधून प्रोटिन्स युक्त आहार देता येईल. या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न करण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोग मुक्त कार्यक्रम राबविण्यासाठी 75 गावे निवडण्यात आले आहेत असे डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले.               याप्रसंगी जिल्ह्यातील टीबी निर्मूलनासाठी प्रयत्न करणारे व क्षयरोग मुक्तीसाठी क्षय रुग्णांना दत्तक घे

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार-- डॉ.भरत बास्टेवाड

    रायगड(जिमाका) 13 :-  महात्मा गांधी  जयंतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने दि.15 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबविले जाणार, असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कचरामुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून, यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या स्वच्छता मोहिमेत ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले यासह इतर सार्वजनिक ठिकाणी मोहिम राबविली जाणार आहे. स्वच्छतेसाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्रित करून त्यांच्याकडून स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पर्यावरण विशेषतः टेकड्या स्वच्छ करण्यासाठी राज्यभरात दि.17 सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिमेसह इतर उपक्रमांचेही आयोजन करण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले

मेगा लेदर क्लस्टर प्रकल्प प्रस्तावावर जलदगतीने कार्यवाही करण्याचे मंत्री कु.तटकरे यांच्या सूचना

  रायगड(जिमाका) 13 :-  रायगड जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर क्लस्टर उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागाची आढावा बैठक महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आली. सर्व विभागानी एकमेकांच्या समन्वयाने प्रकल्पाच्या संबंधित सर्व प्रस्ताव जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.   पादत्राणे व त्याच्याशी निगडित वस्तूंचे विविध उत्पादन युनिट्स तसेच, संशोधन केंद्र या अंतर्गत हा प्रकल्प होत आहे. 151 एकरावर 325 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हे पार्क साकारले जाणार आहे. लेदर उद्योगात काम करणाऱ्या उद्योजकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रकल्पाची विस्तृत आखणी करण्यात यावी. यासाठी महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या लेदर उद्योगाच्या प्रतिनिधींची बैठक महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ आणि लीडकॉम अधिकारी यांनी संयुक्तपणे आयोजित करावी. याबरोबरच इतर राज्यांमध्ये लेदर उद्योगासाठी अवलंबल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कार्यक्रम, उपक्रम यांची माहिती घ्यावी, अभ्यास करावा. त्या आधारे सर्वसमावेशक कार्य प्रणाली निश्चित करून कार्यवाही करावी अशा सूचना मंत्री

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार शुद्धीपत्रक निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देवून मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील

    रायगड(जिमाका) 13 :-  सन 2023 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून याबाबतचा दि.4 जुलै रोजीच्या शासन निर्णयाबाबतचे शुध्दीपत्रक दि.30 ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहे. त्यानुसार निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळांकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील च्या ऐवजी निवड समिती दि.19 सप्टेंबर ते दि.28 सप्टेंबर 2023 या कालावधीत प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील असा बदल करण्यात आल्याबाबचे शुध्दीपत्रकात म्हटले आहे.     गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, पु. ल. देशपांडेमहाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या  mahotsav.plda@gmail.com  या इमेलवर दि.15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.   धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी आधारावर लेखापाल पदासाठी अर्ज मागवले

    रायगड,(जिमाका)दि.11:-   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी आधारावर लेखापाल पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  सदर पदासाठी शैक्षणिक, इतर पात्रता व आवश्यक अनुभव पुढील प्रमाणे असून सर्व भत्ते मिळून  25 हजार  रुपये प्रति माह एकत्रित वेतन वर लेखापाल पद हे 11 महिने करीता भरावयाचे आहे.   उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य पदवीधर असावा, संगणकाचे ज्ञान :- टॅली, एम.एस.सी.आय.टी.,  टंकलेखन गती उमेदवाराचा-टंकलेखनाचा वेग 30 श.प्र.मी. पेक्षा कमी नसावा. (मराठी व इंग्रजी),. कामाचा अनुभव कोणत्याही संस्थेत लेखापाल म्हणून तीन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सदरचे पद ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाचे असून फक्त 11 महिने या कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहे. उमेदवाराचा या पदावर नोकरी कायम करणेबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. या अर्जाचा विहीत नमुना दिलेला असून त्या पध्दतीचा अर्ज अर्जदाराने दि.16 सप्टेंबर 2023 रोजी सायं. 5 वा. पर्यंत प्रत्यक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड या कार्य

जलजीवन मिशन योजनेंतर्गत 28 गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठीच्या प्रस्तावास मंजुरी

  रायगड,(जिमाका)दि.11:-   जलजीवन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी अलिबाग वनविभागाकडे जिल्हा परिषद रायगड यांच्याकडून प्राप्त झालेल्या 26 गावातील व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त झालेल्या 2 गावातील अशा एकूण 28 गावांकरीता पिण्याच्या पाण्यासाठी अलिबाग वनविभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. जलजीवन मिशन हा केंद्रशासनाचा महत्वाकांशी कार्यक्रम असून या योजनेंतर्गत गावांना नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याची आहे. या योजनेंतर्गत वनजमीनीतून पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगीकरिता, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्ताव प्रकल्प यंत्रणेकडून परिपूर्ण दस्तऐवज प्राप्त न झाल्याने प्रलंबित होते. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड व उपवनसंरक्षक, अलिबाग  राहुल पाटील यांनी दि.25 ऑगस्ट 2023 रोजी कार्यशाळेचे आयोजन करुन गटविकास अधिकारी व वन परिक्षेत्र अधिकारी यांना मार्गदर्शन करुन परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यामार्फत उप वनसंरक्षक अलिबाग यांच्या कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्

भाडे तत्वावरील गस्ती नौकेसाठी 20 सप्टेंबरपूर्वी निविदा सादर करा

  रायगड,दि.11(जिमाका) :  महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी गस्ती नौका भाडेतत्वावर घेण्याबाबत मुख्य कार्यालयीन स्तरावर ई- निविदा प्रक्रिया सुरु आहे.  गस्तीकामी नौका उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या नौका मालकांनी 20 सप्टेंबर पूर्वी निविदा 2 लिफाफा (2 बिड) पद्धतीने आवश्यक त्या कागदपत्रासह या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) संजय पाटील यांनी केले आहे.  सदरील नौका गस्तीकामी उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित नौकामालक यांच्यामार्फत खालील अटी-शर्तींची पुर्तता होणे आवश्यक आहे. कृपया याची नोंद घ्यावी. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेश, 2021 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भाडयाने घ्यावयाच्या गस्ती नौकांच्या अटी शर्ती व तांत्रिक तपशील खालीलप्रमाणे: यांत्रिक स्वरुपाची नौका असावी.  नौका Merchant Shipping Act, 1958 अंतर्गत नोंदणीकृत असलेली व सागरी कायद्याच्याअटी शर्तीची पुर्तता केलेली असावी.यांत्रिक नौकेची इंजिन क्षमता राज्याच्या जलधी क्षेत्

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा

  रायगड(जिमाका)दि.11:- राज्याचे    सार्वजनिक बांधकाम    मंत्री    (सार्वजनिक उपक्रम वगळून)    रविंद्र चव्हाण हे    मंगळवार    दि.12 सप्टेंबर 2023 रोजी    रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- मंगळवार, दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8.00 वा. तुर्भे, नवी मुंबई येथून पनवेलकडे प्रयाण. सकाळी 08.50 वा. पनवेल शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 09.00 पनवेल येथे आगमन व मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीस सुरुवात. सकाळी 9.00  ते 11.00 वा. पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या कामाची पाहणी. सकाळी 11.00  ते 11.30 वा. इंदापूर ते वडपाले पॅकेज-1 ची पाहणी.  सकाळी  11.30  ते दुपारी 12.15वा. वडपाले ते भोगाव खुर्द पॅकेज-2 ची पाहणी.  दुपारी 12.15 ते 12.45 वा.भोगाव खुर्द ते कशेडी पॅकेज-3 ची पाहणी. 0000

जिल्ह्यात गणेश उत्सव शांततेत होण्याची परंपरा पाळली जाईल -- जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

Image
अलिबाग (जिमाका) दि. 11:-गणेशोत्सव साठी जिल्ह्यात शासकीय विभागांच्या वतीने विविध उपाय योजना केल्या गेल्या आहेत. सर्वांच्या सहकार्याने गणेश उत्सव आनंदात व शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त करतानाच अनंत चतुर्दशीच्या दिवशी ईद- ए- मिलाद व गणेश विसर्जन एकच दिवशी येत असून यावर्षी देखील जिल्ह्यात कोणताही गुन्हा नोंद न होता उत्सव शांततेत होण्याची परंपरा पाळली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी सांगितले जिल्हा शांतता समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली याप्रसंगी खासदार सुनिल तटकरे यांनी ऑनलाईन व्हिसी द्वारे सहभागी होऊन मार्गदर्शन केले. तसेच आमदार रविंद्र पाटील,  आमदार महेंद्र दळवी,  आमदार अनिकेत तटकरे ,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा शांतता समितीचे सदस्य लोक प्रतिनिधी , शासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.        बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होत अस

रायगड येथे 25 सप्टेंबर ला डाक अदालत

  रायगड जिमाका दि.11-  डाक विभागाच्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक तिमाहीमध्ये डाक अदालतीचे आयोजन केले जाते. दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.  इछूक ग्राहकानी रायगड डाक विभागातील आपली तक्रार 2 प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग  सुनील थळकर, यांच्याकडे दि.22 सप्टेंबर 2023 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी.             दि. 29 सप्टेंबर रोजी दु. ठीक 3.00 वाजता पोस्ट मास्टर जनरल नवी मुंबई रिजन, पनवेल पोस्ट ऑफिस बिल्डिंग, पनवेल यांचे कार्यालयाद्वारे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. इछूक ग्राहकांनी जिल्हापातळीवर निराकरण न झालेली आपली तक्रार 2 प्रतीत पोस्ट मास्टर जनरल नवी मुंबई रिजन, पनवेल पोस्ट ऑफिस बिल्डिंग, पनवेल 410206 यांचेकडे दि. 18 सप्टेंबर पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी.             दि. 27 सप्टेंबर रोजी, दुपारी 3 वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, जीपीओ, मुंबई 400001 यांचे कार्यालयाद्वारे डाक अदालत आयोजित करणेत आली आहे. इछूक ग्राहकांनी रिजनपातळीवर निराकरण न झालेली आपली