Posts

Showing posts from June 21, 2020

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 1 हजार 953 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 1 हजार 03

        अलिबाग,जि.रायगड, दि.26 (जिमाका) : -   स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 953 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 170 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-506, पनवेल ग्रामीण-206, उरण-47, खालापूर-26, कर्जत-45, पेण-41, अलिबाग-55, मुरुड-5, माणगाव-13, तळा-1,   रोहा-32, श्रीवर्धन-8, महाड-10, पोलादपूर-8 अशी एकूण 1 हजार 03 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1126, पनवेल ग्रामीण-303, उरण-187, खालापूर-13, कर्जत-40, पेण-44, अलिबाग-43, मुरुड-17, माणगाव-57, तळा-12, रोहा-25, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-29, महाड-26, पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 953 आहे.                      आज दिवसभरातही पनवेल मनपा-36, पनवेल ग्रामीण-11, उरण-1, पेण-12, अलिबाग-1 माणगाव-1, महाड-4   असे   एकूण   66 नागरीक करोना विरोध

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.             शनिवार दि.27 मे, 2020 सकाळी 9.45 वा. सुनिती शासकीय निवासस्थान येथून मोटारीने भाऊचा धक्काकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. भाऊचा धक्का येथे आगमन व खा.सुप्रियाताई सुळे व खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्यासमवेत रो-रो-जेट्टीने मांडवा, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. मांडवा येथे आगमन व खा.सुप्रियाताई सुळे, खा.सुनिल तटकरे, खा.अमोल कोल्हे यांच्या समवेत मोटारीने नांदगाव, ता.मुरुड कडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. नांदगाव, ता.मुरुड येथे आगमन व श्री छत्रपती शिवाजी नुतन विद्यालय येथे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शाळेची पाहणी व मदत वाटप कार्यक्रम. सकाळी 12.30 वा. नांदगाव येथून मुरुडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. अंजूमन-ए-इस्लाम हायस्कूल, मुरुड येथे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शाळेची पाहणी व मदत वाटप कार्यक्रम. दुपारी 2.00 मुरुड येथून प्रकृती रिसॉ

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत उपाययोजना आणि निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपासंबंधी आढावा बैठक

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-   राज्यमंत्री उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड जिल्हा कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत उपाययोजना आणि निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपासंबंधीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे शनिवार दि.27 जून, 2020 रोजी दुपारी 4.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., पनवेल महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पेण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,   सहाय्यक आयुक्त मस्त्य व्यवसाय, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, अलिबाग, महाड, पनवेल, कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण यांना उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सूचित केले आहे. 00000

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-   लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या 146 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.   यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील, सहाय्यक आयुकत्, समाज कल्याण श्री.रविकिरण पाटील, तहसिलदार सतिश कदम, विशाल दौंडकर, नायब तहसिलदार श्री.वैशंपायन यांची उपस्थिती होती. 000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2.14 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.14 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 485.12 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 00.00 मि.मि., पेण-00.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-00.00 मि.मि., उरण-00.00 मि.मि., कर्जत-10.60 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-2.20 मि.मि., सुधागड-00.00 मि.मि., तळा-00.00 मि.मि., महाड-3.00 मि.मि., पोलादपूर-5.00, म्हसळा-00.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-1.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 34.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 2.14 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 15.48 टक्के इतकी आहे. 00000

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 1 हजार 736 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 758

वृत्त क्रमांक :- 783                                                       दिनांक :- 23 जून 2020         अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका) : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 736 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 84 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-393, पनवेल ग्रामीण-141, उरण-34, खालापूर-7 कर्जत-40, पेण-36, अलिबाग-43, मुरुड-1, माणगाव-12,   रोहा-23, महाड-20, पोलादपूर-8 अशी एकूण 758 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-979, पनवेल ग्रामीण-279, उरण-177, खालापूर-13, कर्जत-34, पेण-28, अलिबाग-40, मुरुड-17, माणगाव-55, तळा-12, रोहा-25, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-29, महाड-17 पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 736 आहे.                      आज दिवसभरातही पनवेल मनपा-56, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, ख

स्थलांतरीत मजूरांनी त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी --जिल्हाधिकारी निधी चौधरी

अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका):-   जिल्हयातील स्थलांतरीत मजूर त्यांच्या   राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी   https://migrant.mahabocw.in/migrant/form   या संकेतस्थळावर नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निधी   चौधरी यांनी केले आहे.               स्थलांतरीत मजूरांच्या अडचणीबाबत याचिका क्र.6/2020 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या   कामगार विभागाने स्थलांतरीत मजूरांच्या नोंदणी करिता   https://migrant.mahabocw.in/migrant/form   हे संकेतस्थळ तयार केले आहे. तरी रायगड जिल्हयातील स्थलांतरीत मजूर जे त्यांच्या   राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी या   संकेतस्थळावर नोंदणी करावी. जिल्हयात खालील कार्यालयांमध्ये स्थलांतरीत मजूरांच्या बाबतीत मदत कक्ष (Help Desk) तयार करण्यात आले असून   या   मदत कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत-   तहसील कार्यालय, पनवेल: 022 - 27452399,   कामगार उपायुक्त कार्यालय पनवेल : 022- 27452835, पोलीस उपायुक्त परिमंडल (2) कार्यालय ,पनवेल   : 022 - 27490476 जिल्हयातील जे स्थला

जिल्हयातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरिता रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन

       अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका):-   कोविड 19 मुळे जिल्ह्यातून कुशल,अकुशल कामगारांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे खाजगी आस्थापनांमध्ये कुशल/अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि. 29 व   30 जून 2020   या दोन दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासा़ठी खाजगी आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेल्या कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टल वर दि. 27 जून 2020 पर्यंत नोटीफाइड करावीत. ज्या आस्थापनांनी यापूर्वी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी   https://rojgar.mahaswayam.gov.in   या वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करावी व आपल्याकडील रिक्त पदे या विभागाच्या वेबपोर्टलवर दि. 27 जून पर्यंत नोटीफाइड करावीत. नवीन नोंदणी करताना वेबपोर्टलवरील   Employment-Employer (List a Job)-Register या ऑप्शन्सचा वापर करून आपल्या आस्थापनेची नोंदणी करावी. नवीन नोंदणी करताना आपले व्यवसाय सुरु करण्याब

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याची सूवर्णसंधी

अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील सर्व कुशल, अकुशल बेरोजगार उमेदवारांसाठी आणि करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यात इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातील स्थलांतरित झालेल्या कुशल,अकुशल बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि. 29 व 30 जून 2020 रोजी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर आपली आधार लिंक नाव नोंदणी करावी.   तसेच यापूर्वी या वेब पोर्टलवर नाव नोंदणी केली असेल त्यांनी आपली नाव नोंदणी आधार लिंक अद्ययावत करावी, जेणेकरून जिल्ह्यातील आस्थापनांकडून प्राप्त झालेल्या नोकरीच्या संधींसाठी आपल्याला ऑनलाइन मुलाखतीद्वारे नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते,   जिल्ह्यातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी आपला बायोडाटा, शैक्षणिक व तांत्रिक पात्रता, अनुभव www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर आधार लिंकसह अद्ययावत करावे. ज्यामुळे त्यांना जिल्ह्यातील विविध खाजगी आस्थापनांवरील रिक्त असले

गोंधळपाडा येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

वृत्त क्रमांक :- 779                                                         दिनांक :- 23 जून 2020 अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह गोंधळपाडा, अलिबाग येथे कार्यरत आहे.   या वसतिगृहामध्ये इयत्ता आठवी पासून गरीब, हुशार होतकरू मागासवर्गीय अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती पाच टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.   या वसतिगृहात विद्यार्थ्यांकरीता मोफत निवास व्यवस्था असून नाश्ता, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ, दूध तसेच भोजनामध्ये डाळ-भात, चपाती,भाजी/उसळ, लोणचे, पापड इत्यादीसह आठवड्यातून दोन वेळा मांसाहार देण्यात येतो.   अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील पुरविले जाते.   दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा