“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 1 हजार 736 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 758


वृत्त क्रमांक :- 783                                                    दिनांक :- 23 जून 2020



        अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका) : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 736 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 84 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-393, पनवेल ग्रामीण-141, उरण-34, खालापूर-7 कर्जत-40, पेण-36, अलिबाग-43, मुरुड-1, माणगाव-12,  रोहा-23, महाड-20, पोलादपूर-8 अशी एकूण 758 झाली आहे.

            कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-979, पनवेल ग्रामीण-279, उरण-177, खालापूर-13, कर्जत-34, पेण-28, अलिबाग-40, मुरुड-17, माणगाव-55, तळा-12, रोहा-25, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-29, महाड-17 पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 736 आहे.        
            आज दिवसभरातही पनवेल मनपा-56, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, पेण-4, माणगाव-1, रोहा-1,महाड-2  असे  एकूण  75 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
         आतापर्यंत पनवेल मनपा-63, पनवेल ग्रामीण-13, उरण-2, खालापूर-2 कर्जत-6, पेण-1, अलिबाग-6, मुरुड-2, माणगाव-1, तळा-2,  श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-6 पोलादपूर-1 असे एकूण 110 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
       आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-53, पनवेल (ग्रा)-9, उरण-1, खालापूर-2, कर्जत-2, पेण-1, अलिबाग-3, रोहा-13 अशा प्रकारे एकूण 84 ने वाढ झाली आहे.
        आजच्या दिवसात 9 व्यक्तींची (पनवेल मनपा-5, पनवेल ग्रामीण-1, खालापूर-1, पेण-1, महाड-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
        आतापर्यंत जिल्ह्यातून 7 हजार 014 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून  तपासणी अंती त्यापैकी 4 हजार 342 नागरिकांचे रिपोर्ट  ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 68 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती ‘+’ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 2 हजार 604 आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड