Posts

Showing posts from September 22, 2024

माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा,विर माता व वीर पिता यांच्या यथोचित सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

    रायगड (जिमाका)दि.27 :-  भारतीय सैन्यदलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्टाईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याच्या या  अभिमानास्पद कामगिरीबद्दल माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि.29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यानुषंगाने रविवार, दि.29 सप्टेंबर 2024 रोजी जंजिरा सैनिकी विश्रामगृह गोधळपाडा, अलिबाग येथे सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, विर माता व वीर पिता यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असून जिल्हयातील सर्व माजी सैनिक,विधवा, युध्दविधवा, वीरमाता, वीर पिता यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 00000

केंद्र शासन पुरस्कृत (ICPS) मिशन वात्सल्य योजनेच्या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

    रायगड(जिमाका)दि.25:- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह बालगृह कर्जत सनशाइन अपार्टमेंट, पहिला मजला, डी विंग, आदिवासी वसतीगृहाच्या शेजारी, जनता हायस्कूल मागे, पाटील आळी, शिवाजी नगर, दहिवली ता. कर्जत या ठिकाणी केंद्र शासन पुरस्कृत (ICPS) मिशन वात्सल्य या योजनेच्या मार्गदर्शक सुचना 2022 अन्वये 11 पदे 10 महिन्याच्या कंत्राटी तत्त्वावर भरावयाची आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे. भरावयाच्या पदांची माहिती पुढीलप्रमाणे :- भांडार रक्षक तथा लेखापाल , पद संख्या-1,मासिक मानधन एका पदास- रु.18 हजार 536, शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी (बी. कॉम असल्यास प्राधान्य),Ms-cit किंवा तत्सम अर्हता, मराठी टायपिंग 30, व इंग्रजी टायपिंग 40 असणे आवश्यक आहे,वय मर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास. निम