Posts

Showing posts from September 30, 2018

वादळातील नुकसानीचे पंचानामे तातडीने करा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचे पेण येथील बैठकीत निर्देश

Image
अलिबाग जि.रायगड,दि.6(जिमाका) - जिल्ह्यात नुकतेच वादळामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन   नुकसआनग्रस्तशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश आज पेण येथे राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी दिले. ना. चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना पेण येथे नगरपरिषद सभागृहात   आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार धैर्यशील पाटील,   प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड,   तहसिलदार अजय पाटणे,   उपनगराध्यक्ष जयवंत गुरव,   पेण न.पा. मुख्याधिकारी अर्चना दवे, नगरसेवक शोमेर पेणकर आदी तसेच तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   यावेळी वादळी पावसात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने महसूल, कृषि, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग आदी विभागांचा आढावा पालकमंत्री चव्हाण यांनी घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनतेला सोयी सुविधा वेळत पुरविण्यात याव्या, असेही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. 00000

कळंबोली येथे बुधवारी रोजगार मेळावा

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.6- कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व सक्षम स्कील ॲकेडमी खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि केएलई संस्थेचे सायन्स व कॉमर्स कॉलेज यांच्या सहकार्याने   बुधवार दि.10 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळात केएलई संस्थेचे सायन्य व कॉमर्स कॉलेज सेक्टर क्र.1 कळंबोली ता.पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. सदर कंपन्याना दहावी पास-नापास, बारावी पास, आयटीआय फिटर, पदविकाधारक, डी.फार्म., बी.फार्म., कोणत्याही शाखेचा पदवीधर, एमबीए, एमसीए, बीटेक, वाहन चालक अशा उमेदवारांची आवश्यकता आहे. सदर मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देवून   नोंदणी   व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराडील नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन

‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे पालकमंत्री ना.चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन

Image
अलिबाग जि.रायगड,दि.6(जिमाका) - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’ या मासिकाचा माहे ऑक्टोबरचा ‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ या महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे आज पेण येथे राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ना. चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना पेण येथे गोपाळकृष्ण सभागृहात आयोजित कार्यक्रमात हे अनावरण करण्यात आले. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आ. प्रविण दरेकर, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. लोकराज्यच्या माहे ऑक्टोबरच्या विशेषांकात   महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त परिवर्तन ह्या सूत्राने महाराष्ट्रात होत असलेल्या   परिवर्तनाची स्पंदने टिपण्यात आलेली आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध

ट्रॉलिंग मासेमारी नौकेचे रुपांतर करण्यासाठी अर्थसहाय्य मस्त्यव्यवसाय विभागाची नाविन्यपूर्ण योजना

अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका) - केंद्र शासनामार्फत मत्स्यव्यवसायाचा विकास व त्यास चालना मिळण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विषयक विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच केंद्र पुरस्कृत निलक्रांती कार्यक्रमांतर्गत मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेखाली सागरी मत्स्यव्यवसायाचा विकासाच्या दृष्टीकोनातुन पुढील नावीन्यपुर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. योजनेचे नाव:- मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेअंतर्गत ट्रॉलिंग मासेमारी नौकेचे        रुपांतर करणे         ट्रॉलिंग पद्धतीची   मासेमारी नौका खोल समुद्रातील स्त्रोतात ठराविक पद्धतीने मासेमारीसाठी रुपांतरीत करणे   Integrated Development and management of Fisheries- Conversion of Trawlers into Resource Specific Deep-sea Fishing Vessels अर्थसहाय्याचे स्वरुप:- 1.या योजनेसाठी केंद्र शासनाकडुन 100 टक्के अर्थसहाय्य रु.15.00 लाखाच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. 2.नौका तपासणी प्रगती अहवालानुसार अर्थसहाय्य तीन हफ्त्यात देण्यात येईल. योजना अंमलबजावणीची पद्धत:- 1.संपुर्ण योजनेची NFDB मार्फत

मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समिती बैठक तालुकास्तरावर मेळावे आयोजित करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका) - मुद्रा बॅंक योजना ही स्वयंरोजगाराला चालना देणारी योजना आहे. त्यामुळे अधिकाधिक होतकरु तरुणांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर मुद्रा योजना मेळाव्यांचे आयोजन करा, या मेळाव्यांत कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेले उमेदवार, ग्रामीण विकास प्रशिक्षक केंद्रातून प्रशिक्षित उमेदवार,    तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्याने या योजनेची माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी    आज येथे दिले. जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,    सहाय्यक संचालक कौशल्य विकास, रोजगार स्वयंरोजगार व उद्योजकता विकास एस.जी.पवार, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आनंद निंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे बी.आर.पाटील, अशासकीय सदस्य कल्पना राऊत, मिलिंद पाटील, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रा बॅंक योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बॅंका व लाभार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक असल्याबाबत मत मांडण्यात आले. 

रायगड जिल्ह्यासाठी नवीन मतदान यंत्रे दाखल

अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका) - भारत निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्ह्यासाठी   नवीन मतदान यंत्रे ( कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट) दाखल झाळे आहेत. लवकरच व्हीव्हीपॅट (VVPATs) मशिन्सही दाखल होणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.   भारत निवडणूक आयोगामार्फत रायगड जिल्ह्यात 3326 कंट्रोल युनिट (C.U.), 5721 बॅलेट युनिट (B.U.) प्राप्त झाले आहेत. या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी   जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारपासून (दि.4) सुरु झाली. यावेळी राजकीय पक्षांचे   प्रतिनिधीही उपस्थित होते.   या प्रथमस्तरीय तपासणीबाबत जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही अवगत करण्यात आल्याचे   उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी कळविले आहे. 00000

मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समिती बैठक तालुकास्तरावर मेळावे आयोजित करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका) - मुद्रा बॅंक योजना ही स्वयंरोजगाराला चालना देणारी योजना आहे. त्यामुळे अधिकाधिक होतकरु तरुणांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर मुद्रा योजना मेळाव्यांचे आयोजन करा, या मेळाव्यांत कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेले उमेदवार, ग्रामीण विकास प्रशिक्षक केंद्रातून प्रशिक्षित उमेदवार,  तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्याने या योजनेची माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  आज येथे दिले. जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,  सहाय्यक संचालक कौशल्य विकास, रोजगार स्वयंरोजगार व उद्योजकता विकास एस.जी.पवार, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आनंद निंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे बी.आर.पाटील, अशासकीय सदस्य कल्पना राऊत, मिलिंद पाटील, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रा बॅंक योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बॅंका व लाभार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक असल्याबाबत मत मांडण्यात आले.  बॅंका

मुरुड येथील जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ दुरुस्ती करा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचे निर्देश

Image
अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका) - मुरुड शहराला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र सध्या नादुरुस्त असल्याने नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकत नाही. तातडीने शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण केंद्र तात्काळ दुरुस्त करुन मुरुडवासीयांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, तसेच तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिले. मुरुड तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह मुरुड येथे गुरुवारी (दि.4) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरुड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती स्नेहा पाटील, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीमती शारदा पोवार, सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागचे कार्यकारी अभियंता आर.एस.मोरे, मुरुडचे तहसिलदार उमेश पाटील,  जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले, नगर परिषदेचे मुख्याधिक

पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावरील वाहतुक शनिवारी (दि.6) बंद

अलिबाग जि.रायगड, दि.5 (जिमाका) - पोलादपूर तालुक्यात पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, जि.रत्नागिरी यांची बस कोसळून झालेल्या अपघातप्रकरणी   सद्यस्थितीत दरीत असलेली अपघातग्रस्त बस वर काढण्यासाठी शनिवार दि.6 रोजी सकाळी 8 ते दुपारी तीन या कालावधीत पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलादपूर पोलीस ठाणै फेटल मोटर अपघात रजि.नं.52/2018 हा अपघात पोलादपूर महाबळेश्वर रोडवर   मौजे दाभोळ गावचे हद्दीत घडला असून 28 जुलै 2018 रोजी दाखल करण्यात आला आहे. या अपघातामध्ये डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, जि.रत्नागिरी यांची बस आंबेनळी घाटातील दरीमध्ये सुमारे 700 ते 800 फूटखाली कोसळून अपघात झाला होता. या अपघातामध्ये एकूण 30 प्रवासी मयत झाले आहेत.   बस खोल दरीमध्ये असून सदर अपघाताचे निश्चित कारण समजण्याकरिता अपघातग्रस्त बसची प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत तपासणी होणे आवश्यक आहे.   त्याअनुषंगाने 6 ऑक्टोबर रोजी दरीमध

कर्ण बधीर बालकांना मोफत डिजीटल श्रवण यंत्र नविन पनवेल येथे शनिवारी शिबिर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- रायगड जिल्ह्यातील वय वर्ष 1 ते 18 वयोगटातील कर्णबधीर बालकांना मोफत डिजीटल श्रवणयंत्र देण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क् विकास मंच आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरीका यांच्या संयुक्त् विद्यमाने व रायगड जिल्हा परिषदेच्या सहकार्याने शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत रोटरी कर्णबधीर मुलांची शाळा नवीन पनवेल प्लॉट नं.18,सेक्टर-19, अग्निशामक दलामागे नविन पनवेल येथे कर्णबधीर बालकांसाठी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रायगड जिल्ह्यातील कर्णबधीर   बालकांच्या पालकांनी तसेच कर्णबधीर विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी सदर शिबीरास कर्णबधीर बालकांना शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी वरील ठिकाणी वेळेवर उपस्थित ठेवावे.असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद रायगड यांनी केले आहे. 00000

ग्राहक संस्थांना अनुदान; नोंदणीकृत संस्थांकडून प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- महाराष्ट्र ग्राहक संरक्षण व मार्गदर्शन निधी नियम 1992 मधील परिच्छेद 7 नुसार राज्य शासनाकडून सहाय्यक अनुदान वितरीत करण्यासाठी महाराष्ट्रात ग्राहक चळवळ व ग्राहक जनजागृती क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात काम करणाऱ्या, परंतु ग्राहक चळवळ,ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व संवर्धनाचे कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच ग्राहक जनजागृती क्षेत्रात काम करणाऱ्या ग्राहक संस्थांव्यतिरिक्त् इतर क्षेत्रात काम करणाऱ्या परंतु ग्राहक चळवळीचेही कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना शासनाकडून अनुदान वितरीत करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून सोबत अर्जाचा नमुनाही महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध् करुन देण्यात आला आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुकांनी विहीत नमुन्यातील त्यांचा प्रस्ताव 30 दिवसाच्या आत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेपूर्वी किंवा तत्पूर्वी प्राप्त् होतील या बेताने सादर करावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त् झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार   नाही याची नोंद

अलिबाग पं.स.ची मासिक सभा मंगळवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 - अलिबाग पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि.9 रोजी सकाळि 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अलिबाग पंचायत समिती सभागृहात होणार आहे. सभेस संबंधितांनी उपस्थित रहावे, असे सभापती सौ.प्रिया नथुराम पेढवी, व गटविकास अधिकारी यांनी कळविले आहे. 000000    

कर्जत येथे 9,10 व 11 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे कर्जत येथे   दि. 9 , 10 व 11 रोजी   मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.   हे शिबिर रॉयल गार्डन मंगल कार्यालय, कर्जत येथे सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत   होणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात मुंबई, नवी मुंबई, एम.जी.एम हॉस्पिटल कामोठे,   डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरुळ,   येरळा मेडीकल ट्रस्त खारघर, लक्ष्मी आय चॅरीटेबल   ट्रस्ट पनवेल, एम्पथी फाऊंडेशन चेंबुर,   तसेच नेरुळ, पनवेल परिसरातील तज्ज्ञ डॉक्टर्स,   उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी करतील. रुग्णांना मोफत तपासणी सोबत औषधोपचार,   प्रयोगशाळा चाचण्या,इ.सी.जी आदी   मोफत उपलब्ध   केल्या जातील. यावेळी भिषक तज्ज्ञ, जनरल सर्जन, हृदय रोग तज्ज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ,   बालरोग तज्ज्ञ,   विकलांग तपासणी, दंतरोग तज्ज्ञ,   आयुर्वेद तज्ज्ञ, कान, नाक ,घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ आदी तपासणीसाठी उपस्थित राहणार आहेत. तरी गरजू रुग्णांनी य मोफत शिबिराचा लाभ घ्यावा. गावपातळीवर आशा स्वयंसेविका, अंगणव

पनवेल येथे सैन्य भरती मेळाव्यास सुरुवात : पालकमंत्री ना. चव्हाण यांची भल्या पहाटे भेट व पाहणी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 - कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल येथे   आयोजित सैन्य भरती मेळाव्यास आज पहाटे अडीच वाजेपासून सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी मुंबई शहर भागातील तब्बल अडीच हजारांहून अधिक युवकांनी मेळाव्यास उपस्थिती दिली. आज पहिल्याच दिवशी राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी भल्या पहाटे चार वा. भरती स्थळी जाऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह सदर भरती प्रक्रिया राबविणारे   सैन्य भरती केंद्र पुणे चे मेजर जनरल सतिष एन वासाडे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.4   ते   13   आक्टोंबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारासाठी हा मेळावा होणार आहे. लष्कराचा पुणे विभाग, महाराष्ट्राचे व्यावस्थापकीय मुख्यालय क्षेत्र आणि गोवा तसेच गुजरात उपविभाग

शासकीय विभागांना पारदर्शक खरेदीसाठी ‘जेम’ पोर्टल उपयुक्त निवासी उप जिल्हाधिकारी पाणबुडे यांचे अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत प्रतिपादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 - शासनाला लागणाऱ्या विविध वस्तू, सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने ‘जेम’ GeM (Government e-Marketplace) पोर्टल विकसित केले असून या द्वारे अधिकाधिक पारदर्शक   खरेदी व्यवहार करुन शासनासाठी उत्तम दर्जाच्या वस्तू आणि सेवा वाजवी दरात घेऊन आर्थिक बचतही होऊ शकते. त्यामुळे ‘जेम’ पोर्टल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर खरेदी व्यवहारांसाठी करावा,असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज येथे केले. ‘जेम ‘ पोर्टलद्वारे करावयाच्या खरेदीची तसेच ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाणबुडे बोलत होते. यावेळी   उद्योग विभागाच्या उपसंचालक श्रीमती विजू शिरसाठ, जेम पोर्टलचे नवी दिल्ली येथील अधिकारी सुरज शर्मा, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती एम.एन. देवराज तसेच सर्व विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, शासनाच्या सर्व विभाग,शासकीय उपक्रम,महामंडळे व त्या अंतर्गत सर्व कार्यालयाकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने मानवी हस्

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2 -   राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या   जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन व भावपूर्ण आदरांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस   जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.   यावेळी तहसिलदार के.डी.नाडेकर, नायब तहसिलदार श्री.वैशंपायन,देवेंद्र पाटील तसेच कर्मचारी वर्ग आदि उपस्थित होते. 00000

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.2 , राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे 4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. गुरुवार दि.4  रोजी पहाटे चार वा.कर्नाळा येथे आगमन व आर्मी रिक्रुमेंट रॅली शुभारंभ. स्थळ : कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमी.  पहाटे पाच वा. कर्नाळा येथून मुंबईकडे प्रयाण.  दुपारी दोन वा.गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने मांडवाकडे प्रयाण.   दु.तीन वा. मांडवा येथे आगमन व मोटारीने मुरुडकडे प्रयाण. सायं. पावणे पाच वा.शासकीय विश्रामगृह, मुरुड येथे आगमन व राखीव.   सायं. सव्वा पाच वाजता मुरुड तालुका शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक (तालुक्यातील सर्व विभागाचे विभागप्रमुख) स्थळ : शासकीय विश्रामगृह मुरुङ  सायं. साडे सहा वा. ग्रामपंचायत सावली येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.  रात्री आठ वा.मिठागर येथून साळावकडे प्रयाण.  रात्री साडे आठ वा. जेएसडब्ल्यू विश्रामगृह येथे आगमन व राखीव.  शुक्रवार दि.5 रोजी सकाळी आठ

जवाहर नवोदय विद्यालय निजामपूरच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 1 - जवाहर नवोदय विद्यालय वायनाड केरळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेमध्ये   जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर विद्यालयातील कु.शार्दुला प्रशांत राघमवा, (सतरा वर्षाखालील गट). कु.आयुष मल्हार कुलकर्णी व कु.श्रावणी वाठारे (चौदा वर्षा खालील गट) हे विद्यार्थी सहभागी झाले होते. संपूर्ण भारतातून बुध्दीबळ स्पर्धेसाठी 240 विद्यार्थी सहभागी झाले होते.   या स्पर्धेमध्ये कु.शार्दुला प्रशांत राघमवार हिने 7 पैकी 5.5 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला असून तिची राष्ट्रीय स्तरावरील एस.जी.एफ.आय. स्पर्धेसाठी निवड   झाली आहे.   ही स्पर्धा डिसेंबर महिन्यामध्ये गंगटोक-सिक्कीम येथे होणार आहे.   या विद्यार्थ्यांचे प्राचार्य पी.के.नारायणन तसेच उप प्राचार्य इंदिरा नायर तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्त्तर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले. 00000

रक्तदान दिनानिमित्त प्रभातफेरीतून जनजागृती

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 - स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त आज   जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमार्फत   प्रभात फेरीचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते या प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी   अति. जिल्हा शल्य चिकित्सक   अधिपरिचारिका जयश्री मोरे, अधि सेविका तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने, गणेश सुतार, रक्त पेढीचे डॉ. दीपक गोसावी, डॉ. निशा तेली, सुनिल बंदीछोडे, हेमकांत सोनार, विरेंद्र स्वामी, मनिषा नवाळे, चेतना वर्तक, पुनम पाटील, जयश्री दोरे. महेश धाडगे,   उमेश पाटील,   फरीद आकवारे   आदी उपस्थित होते.   यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. गवळी म्हणाले की,   रक्तदान चळवळ समाजात रुजविणे   अत्यंत आवश्यक आहे. लोकांनी रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   डॉ. फुटाणे यांनी मानवी रक्ताला पर्याय नसल्याने   रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान हेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.   शहरातील प्रमुख मार्गावरुन सकाळी ही फेरी निघून त्यात रक्तदानाचे महत्व   अधोरेखित करणारे संदेश व घोषणा प्रसारि

जिल्ह्यात 2 नोव्हेंबर रोजी दाखल होणार‘लोहयात्रा’ : जनसामान्यांपर्यंत आहाराबाबत माहिती पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 - भारतीय अन्न व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या वतीने जनसामान्यांमध्ये आहार व पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी देशभर लोहयात्रा या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात   2 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ही सायकल रॅली ‘लोह यात्रा’ दाखल होणार आहे. या रॅलीमार्फत   जिल्ह्यातील जनतेपर्यंत   आहार व पोषणाबाबत माहिती पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त   भारतीय अन्न व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या वतीने   योग्य आहार अर्थात ‘Eat Right India’ ही चळवळ राबविण्यात येणार आहे. मुख्यत्वे आहार व पोषणाविषयक जनसामान्यांमध्ये जनजागृती हे या चळवळीचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी ‘लोह यात्रा’ या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. ही यात्रा दि.16 ऑक्टोबर ते 26 जानेवारी 2019 या कालावधीत संपूर्ण देशात जाणार आहे.   या आयोजनात केंद्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय, स्वच्छ भारत मिशन, पोषण अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय व अन्य विभाग सहभागी होत आहे

लोकराज्य वाचक अभियान ‘लोकराज्य’ च्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवा- डॉ. गणेश मुळे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 - शासन जनतेसाठी नेमक काय करतं याची महत्त्वाची व विश्वासार्ह माहिती ‘लोकराज्य’ मासिकात दरमहा प्रसिद्ध होत असते. असे हे लोकराज्य मासिक वाचून आपण शासकीय योजनांची माहिती ही समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना   योजनांच्या लाभापर्यंत पोहोचवू शकता, असे आवाहन कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी शनिवारी (दि.29) येथे केले. येथील स्पर्धा विश्व ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांशी लोकराज्य वाचक अभियानाअंतर्गत डॉ. मुळे हे संवाद साधत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, ॲकेडमीच्या संचालिका तपस्वी गोंधळी, सुचेता साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ॲकेडमीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आपल्या संबोधनात डॉ. मुळे म्हणाले की,आपले शासन हे समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवित असते. अनेक निर्णय घेत असते. याबाबतची सर्व माहिती लोकराज्य मधून दरमहा प्रसिद्ध होत असते. लोकराज्य वाचनाने आपल्याला या सर्व योजनांची माहिती होत असते. समाजातील विविध घटकांना या योजनांची माहिती देऊन आपण त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ