ट्रॉलिंग मासेमारी नौकेचे रुपांतर करण्यासाठी अर्थसहाय्य मस्त्यव्यवसाय विभागाची नाविन्यपूर्ण योजना



अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका)- केंद्र शासनामार्फत मत्स्यव्यवसायाचा विकास व त्यास चालना मिळण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विषयक विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच केंद्र पुरस्कृत निलक्रांती कार्यक्रमांतर्गत मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेखाली सागरी मत्स्यव्यवसायाचा विकासाच्या दृष्टीकोनातुन पुढील नावीन्यपुर्ण योजना राबविण्यात येणार आहेत.
योजनेचे नाव:- मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेअंतर्गत ट्रॉलिंग मासेमारी नौकेचे       रुपांतर करणे
        ट्रॉलिंग पद्धतीची  मासेमारी नौका खोल समुद्रातील स्त्रोतात ठराविक पद्धतीने मासेमारीसाठी रुपांतरीत करणे
 Integrated Development and management of Fisheries- Conversion of Trawlers into Resource Specific Deep-sea Fishing Vessels
अर्थसहाय्याचे स्वरुप:-
1.या योजनेसाठी केंद्र शासनाकडुन 100 टक्के अर्थसहाय्य रु.15.00 लाखाच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
2.नौका तपासणी प्रगती अहवालानुसार अर्थसहाय्य तीन हफ्त्यात देण्यात येईल.
योजना अंमलबजावणीची पद्धत:-
1.संपुर्ण योजनेची NFDB मार्फत कार्यवाही करण्यात येईल.
2.योजनेसाठी तांत्रिक सहाय्य CIFT/FSI यांचे मार्फत करण्यात येईल.
3.नौका तपासणीसाठी NFDB/FSI व शासन प्रतिनीधी पहाणी करतील
योजनेसाठी प्रमुख अटी व शर्ती:-
1.पारंपारीक/क्रियाशील मच्छिमार लाभासाठी पात्र राहतील
2. इच्छुक लाभार्थ्यांकडे नोंदणीकृत Bottom Trawler असणे आवश्यक आहे.
3. नौकेची रिअलक्राफ्ट प्रणालीमधील नौका नोंदणी प्रमाणपत्र,मासेमारी परवाना, बायोमेट्रीक कार्ड व इतर  
   कागदपत्र असणे आवश्यक आहे.
4.एका लाभार्थ्यासाठी एका नौकेसाठी व संस्थेच्या तीन नौकांसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
5. नौका मासेमारीसाठी सक्षम व नौकेवर नौकानयन/दळणवळण साधने असणे आवश्यक आहे.
6. लाभार्थ्यांने बॉटम ट्रॉलर/टयुना लाँग लाईनर बांधणीसाठी/ नौका लाँग लाईन टयुना मासेमारीसाठी रुपांतरीत  
   करण्यासाठी यापुर्वी कोणत्याही  योजनेतून (DADF/NFDB/MPEDA/NABARD/NCDC) कर्ज/अर्थसहाय्य   घेतलेले नसावे.
कार्यालयाचा पत्ता:-3 रा मजला, श्री सिध्दी अर्पांटमेंट, डॉ.पुष्पलता शिंदे हॉस्पीटलच्या समोर, अलिबाग   
                   पेण रोड,अलिबाग. पिन.402201, दुरध्वनी क्रमांक:- 02141-224221
      सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक:- श्री. अभयसिंह शिंदे इनामदार                                                                    (7719870885)
परवाना अधिकारी यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक:-
1.श्रीमती.स्मि.दि.कांबळे (परवाना अधिकारी अलिबाग-8369085049),2.श्री. सु.ग.गावडे(परवाना अधिकारी मुरुड व श्रीवर्धन-7798723136),3.श्री.स्व.दाभणे(परवाना अधिकारी उरण 9619415502)
       तरी सर्व ट्रॉलर धारक मच्छिमारांना या योजनेचा अधिक माहीती घेण्यासाठी व नाव नोंदणीसाठी परवाना अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन अभयसिंह शिंदे इनामदार  सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक