Posts

Showing posts from January 12, 2020

कुटूंब नियोजन कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा प्रदात्यांचा गौरव समारंभ संपन्न

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका)- जिल्हा शल्य चिकित्सक रायगड-अलिबाग यांच्या तर्फे व इनजेंडर हेल्थ या संस्थेमार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या कुटूंब नियोजन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट संस्था व सेवा प्रदात यांचा गौरव समांरभ कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या उपस्थितीत हॉटेल साई इन रेवस रोड, चोंढी येथे संपन्न झाला.               यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, डॉ.अनिल फुटाणे, डॉ.सुचिता गवळी, डॉ.श्रीम.सिंग, जिल्हा माता   व बालसंगोपन अधिकारी डॉ.चंद्रकांत जगताप, शल्य चिकित्सक माणगाव डॉ.कामेरकर, स्त्रीरोग तज्ज्ञ माणगाव डॉ.सिध्दी कामेरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अडतमोल, जिल्हा विस्तार माध्यम विस्तार अधिकारी जि.प.राजेंद्र भिसे, इनजेंडर हेल्थ या संस्थेचे डॉ.सागर खांडेकर, नम्रता दोषी, कांक्षा सिंग, श्याम गायकवाड आदि उपस्थितीत होते.             आरोग्य संस्था व सेवा प्रदाते यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी प्रवृत्त व गुणवत्तापूर्ण कुटूंब नियोजन कार्यक्रम आणि साधने प्रत्येक जोडप्यापर्यंत समुदायामध्ये त्यांच्या निवडीन

न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यांसाठी प्रशिक्षण केंद्राचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग व जिल्हा नियोजन समिती रायगड-अलिबाग यांच्या सहकार्याने आणि मॅट्रीक्स कॅड ॲकॅडमी खारघर यांच्यामार्फत जिल्हा कारागृह अलिबाग येथे न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी याच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.                 यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, कारागृह अधिक्षक जिल्हा कारागृह अलिबाग ए.टी.पाटील, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग एस.जी.पवार आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यांनी येथून बाहेर गेल्यानंतर आपल्या कुटूंबांसाठी काहीतरी करण्यासाठी आपल्याकडे कोणतातरी स्क्रील असला पाहिजे यासाठी हे इलेक्ट्रेशन प्रशिक्षण महत्वाचे आहे. याकरिता शासनाचा हा उपक्रम आपल्यासाठी असून यात मनलावून सहभागी होऊन काम करावे.   जेणेकरुन आपल्याला येथून बाहेर गेल्यावर आपल्या कुटूंबासाठी काही

31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह वाहन धारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे -जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण   रायगड व रायगड जिल्हा पोलीसदल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहास दि.11 जानेवारी पासून प्रारंभ झाला असून वाहन चालविताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन धारकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.   पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात आयोजित 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 कार्यक्रमात ते बोलत होते.               यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण श्रीमती उर्मिला पवार,सहायय्क पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा रायगड शहाजी शिरोळे आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, वाहन चालवितांना   होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रत्येकाने वाहन चालविताना योग्य ती काळजी घेतली व नियमांचे पालन केले तर नक्कीच अपघाताचे प्रमाण