न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यांसाठी प्रशिक्षण केंद्राचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन



अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग व जिल्हा नियोजन समिती रायगड-अलिबाग यांच्या सहकार्याने आणि मॅट्रीक्स कॅड ॲकॅडमी खारघर यांच्यामार्फत जिल्हा कारागृह अलिबाग येथे न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी याच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. 
              यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, कारागृह अधिक्षक जिल्हा कारागृह अलिबाग ए.टी.पाटील, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग एस.जी.पवार आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यांनी येथून बाहेर गेल्यानंतर आपल्या कुटूंबांसाठी काहीतरी करण्यासाठी आपल्याकडे कोणतातरी स्क्रील असला पाहिजे यासाठी हे इलेक्ट्रेशन प्रशिक्षण महत्वाचे आहे. याकरिता शासनाचा हा उपक्रम आपल्यासाठी असून यात मनलावून सहभागी होऊन काम करावे.  जेणेकरुन आपल्याला येथून बाहेर गेल्यावर आपल्या कुटूंबासाठी काहीतरी करता येईल ते पहावे.   आपल्या वैयक्तिक जीवनासाठी या इलेक्ट्रेशन प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे हे ओळखून बंद्यांनी नियमित प्रशिक्षण घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.  कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी जिल्हा कारागृहाची पाहणी करुन येथे असलेल्या सोयी-सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाला जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी, न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यी व मॅट्रीक्स कॅड ॲकॅडमी खारघर प्रतिनिधी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक