Posts

Showing posts from October 29, 2017

डिजीटल सेवापुस्तक अनुकरणीय उपक्रम- जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी

Image
            अलिबाग, जि. रायगड, दि.3 (जिमाका)-  खालापुर तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकाची माहिती डिजीटल  स्वरुपात तयार करण्याचा हा उपक्रम अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले. महाराजस्व अभियान-2017 अंतर्गत कर्जत तालुक्याचे प्रातांधिकारी दत्ता भडकवाड यांनी खालापूर तालुका तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवापुस्तकाची माहिती डिजीटल स्वरुपात तयार केली असून या सीडीचे वितरण जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात करण्यात आले. त्यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.             यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, सर्व उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसिदार  उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना  संगणकीय सादरीकरणाद्वारे या उपक्रमाबाबतची माहिती उपस्थितांना दाखविण्यात आली. 0000

कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहिर

  अलिबाग दि.3-   दिनांक   29 . 10 . 2017   पासून सुरु   झालेल्या कोकण   प रिक्षेत्रीय क्रिडा स्पर् धेचा आज 5 वा. दिवस असून स्पर्धा आता अजूनच रंगतदार होवू लागली आहे. या स्पर्धेमध्ये कोकण परीक्षेत्रामधील ठाणे ग्रामीण ,   रायगड ,   रत्नागिरी ,   सिंधुदुर्ग , पालघर व पोलीस आयुक्तालय ,   नवी मुंबई या घटकातील संघाचे खेळाडू मध्ये चुरस निर्माण झाली आहे .    अॅथलॅटीक्स मध्ये नेहुली क्रिडा संकुल येथे खेळाडू मोठ्या उत्साहात आपापल्या संघाना गुण मिळवून देत आहेत .   तसेच पोलीस मुख्यालय येथे हॉकी ,   फुटबॉल ,   कबड्डी आणि हॅन्डबॉलच्या साखळी सामन्यांमध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन खेळाडू करीत आहेत .   रायगड   पोलीस अधीक्षक अनिल पारसकर   हे दररोज होणाऱ्या स्पर्धेतील स्पर्धकांना उ पस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन   देतात.           आज दिनांक 03.11.2017 रोजी झालेल्या क्रिडा स्पर्धेअंती सरासरी सर्वसाधारणपणे नवी मुंबई संघ आघाडीवर असून स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे            अॅथलॅटिक्स 3,000 मीटर धावणे पुरुष अ.क्र. खेळाडूचे नाव जिल्
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामो द्यो ग मंडळातर्फे हातकागद निर्मिती प्रशिक्षण अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड अलिबाग तर्फे, संचालक,हातकागद संस्था, पुणे येथे 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देण्याच्यादृष्टीने ग्रामोद्योग उभारणी करीता हातकागद निर्मितीचे विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  इयत्ता आठवी, एस.एस.सी, एच.एस.सी.पर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या किंवा प्रशिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या व 18 ते 45 वर्षे वयोगटांतील   इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी शैक्षणिक व अन्य दाखल्यांसह व्यवस्थापक, हातकागद संस्था,पुणे, किंवा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र,ठिकरुळ नाका, मु.पो.ता.अलिबाग, जि.रायगड यांच्याशी संपर्क साधावा,असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रायगड अलिबाग यांनी कळविले आहे. ०००००
विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे जिल्हा दौरा अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.03:-   महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती ना.माणिकराव ठाकरे हे शनिवार दि.4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शनिवार दि.4 रोजी दुपारी बारा वाजता विश्रामगृह महाड येथे आगमन व राखीव. दुपारी साडेबारा वाजता महाड नगरपरिषद विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:नगरपरिषद, महाड. दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, महाड येथे राखीव.दुपारी दोन वाजता जनआक्रोश मेळाव्यास उपस्थिती.सायंकाळी पाच वाजता महाड येथून हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण. ०००००
लॅंटवियाचे पंतप्रधान मारिस कुसिनस्किस यांचा दौरा अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.03:-   लॅंटविया या देशाचे पंतप्रधान श्री. मारिस कुसिनस्किस हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांना जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे- शनिवार दि.4 रोजी मुंबईहून गेट वे ऑफ इंडिया मार्गे बोटीने जेएनपीटी बंदर कडे प्रयाण. दुपारी एक वाजता जेएनपीटी बंदर येथे भेट.दुपारी साडेतीन वाजता गेट वे ऑफ इंडिया मार्गे बोटीने राजभवनकडे प्रयाण . ०००००
Image
विधानपरिषद विशेषाधिकार समिती बैठक लोकप्रतिनिधी ,अधिकाऱ्यांमधील सुसंवादासाठी नियमपालन आवश्यक- डॉ.नीलमताई गोऱ्हे अलिबाग, जि. रायगड, दि.3(जिमाका)- लोकांचे प्रश्न निर्भयपणे मांडता यावेत, यासाठी विधीमंडळाच्या सदस्यांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत.  लोकहिताची कामे ही सुरळीतपणे व्हावीत यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद आवश्यक आहे. या सुसंवादासाठी  शासन नियमांचे पालन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्ष  डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज येथे केले. विधानपरिषद विशेषाधिकार समितीची बैठक व अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण आज अलिबाग येथे जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोऱ्हे या होत्या. यावेळी आ. रामराव वडकुते, आ. अमरनाथ राजुरकर, आ. ॲड. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,  विधीमंडळाचे उपसचिव एन.जी. काळे, अवर सचिव उमेश शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचि

हवामान आधारीत फळपिक विमा योजना

Image
रायगड जिल्ह्यात आंबिया बहार सन 2017-18 मध्ये फलपिक विमा योजना हवामान आधारित फळपिक विमा योजना या नावाने कार्यान्वित आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी काजू फळपिका करीता 30 नोव्हेंबर व आंबा या फळपिकाकरीता 31 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. या योजनेबाबत शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी माहिती देत आहोत. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले आहे. योजनेची उदिष्ट्ये-   कमी-जास्त पाऊस, पावसाचा खंड, वेगाचा वारा., पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. योजनेची वैशिष्ट्ये- कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा विमा संरक्षित रक्कमेच्या   पाच टक्के किंवा वास्त्वदर्शी दर यापेकी जी कमी रक्कम असेल ती रक्कम असा मर्यादित दर   ठेवण्यात आला आहे. योजना कार्यान्वयन यंत्रणा- पंतप्रधान पिक विमा योजना रायगड जिल्ह्यात एच.डि.एफ.सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे. विमा कंपन