Posts

Showing posts from March 3, 2024

पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन

रायगड,दि.06(जिमाका):-उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत यांच्या अध्यक्षेतेखाली व जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि.07 मार्च 2024 रोजी सकाळी 10:00 ते सायं. 6:00 या वेळेत विरुपक्ष मंगल कार्यालय, 121/बी, रत्नाकर खरे मार्ग, पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी दिली आहे. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यत पोहच

सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी निधी देण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

रायगड,दि.05(जिमाका) :- महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. महाड औद्योगिक क्षेत्र येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ.भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश बानापुरे,एमआयडीसी चे अभियंता उदय देशमुख यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाड औद्योगिक क्षेत्रातील नांगलवाडी फाटा ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत चार पदरी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. (कामाची किंमत-9201.07 लक्ष)शिव मंदिर ते ग.द.आंबेकर हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करणे. (कामाची किंमत-234.85 लक्ष) नांगलवाडी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गालगत सिमेंट काँक्रिट रस्ता व बाजूच्या गटारीचे बांधकाम करणे, (कामाची किंमत-560.44 लक्ष) तसेच रावढळ गावाजवळ नागेश्वरी नदीवर कोल्हापु

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे व परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी 10 कोटींचा निधी देणार --मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड,दि.05(जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे. तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळयांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, म्हणून ऐतिहासिक स्थळांचा, गावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 354 व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराचा सुशोभिकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, (ऑनलाईन), उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधि

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात जिल्ह्यातील शाळा अग्रेसर

रायगड,दि.05(जिमाका):- “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानांतर्गत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून या अभियानात जिल्ह्यातील शाळा अग्रेसर असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम.पुनिता गुरव यांनी दिली आहे. रायगड जिल्हयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान खूप मोठया प्रमाणावर यशस्वी झाले असून जिल्हयातील 3 हजार 535 शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणी सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम जिल्हयातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, व जिल्हा पातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले आहे. आयुक्त, शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दि.03 मार्च 2024 च्या पत्रानुसार मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली

खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याकरीता दि.31 मार्च पर्यंत मुदतवाढ

रायगड,दि.05(जिमाका):- पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करीता दि.29 फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत धान खरेदी अल्प धान प्रमाणात झाले असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याने खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याकरीता दि.31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्जेराव सोनवणे यांनी आवाहन केले आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते. हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना लाभ मिळावा, या हेतूने राज्यात खरेदी केंद्र सुरु केली आहेत. 0000000

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण २०,४४१ निकाली १४,३२,८३,०१० रुपयाची तडजोड रक्कम वसूल

रायगड जिमाका दि. 3- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या दि. ०३ मार्च २०२४ रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण २०,४४९ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री. अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्हयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्‌ह्यातील ६८.८८२ वादपूर्व प्रकरणे व १२,३५२ प्रलंबित अशी एकूण ८१,२३४ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी १८.८३१ वादपूर्व प्रकरणे व १६१० प्रलंबित प्रकरणे अशी एकूण २०,४४९ प्रकरणे सामंजस्यान

जिल्हा सैनिक कार्यालयातील गट ‘क’ ची पदे भरण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याकरिता दि.24 मार्च पर्यंत मुदतवाढ

रायगड,दि.04(जिमाका):- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कार्यालयातील गट ‘क’ ची पदे भरण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याकरिता दि.12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दि.3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 18.00 वाजपर्यंत हा कालावधी देण्यात आला होता. लोकहितार्थ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याच्या कालावधीस दि.4 मार्च ते दि.24 मार्च 2024 संध्याकाळी 18.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गोविंदराव साळुंखे यांनी केले आहे. ०००००

जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्तीवेतन धारकांसाठी पेन्शन अदालतीचे आयोजन

रायगड दि.01(जिमाका):-जिल्हयातील निवृत्तीवेतन प्रकरणे व भविष्य् निर्वाह निधी संबंधित समस्या व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महालेखापाल मुंबई यांच्या आदेशान्वये कोषागार कार्यालयाच्या स्तरावर कार्यशाळा/पेन्शन अदालतीचे आयोजन दि.5 मार्च,2024 रोजी दोन सत्रात नियोजन भवन, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रायगड अलिबाग येथे करण्यात आले आहे. प्रथम सत्रात सकाळी 10.30 आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजीत केलेली आहे. व दुपारी 3.00 वाजता निवृत्तीवेतनधारकांसाठी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आलेली आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वत: किंवा कार्यालयातील संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेस उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड- अलिबाग यांनी केले आहे. 000

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हयाचे उदिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रायगड दि.01(जिमाका):- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 या अर्थिक वर्षातील प्रकरणे 15 दिवसांच्या आत मंजूर करावीत. तसेच जिल्हयाचे निर्धारीत उदिष्ट पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस श्री.जी.एस.हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड- अलिबाग, श्री. मुकेश कुमार,झोनलऑफिसर, बँक ऑफ इंडिया, रायगड, श्री. राघेन्द्र कुमार, झोनल ऑफिसर, स्टेट बँक ऑफ इंडिया, रायगड, श्री. विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, अलिबाग, श्री. प्रदीप जायभाये, जिल्हा समन्वयक, सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया, अलिबाग,श्री. सुभाष म्हात्रे, आरडीसी बँक, अलिबाग, श्री. मृणाक राणा, बँक ऑफ महाराष्ट्र, सौ.संगीता देसाई, बॅक ऑफ महाराष्ट्र तसेच इतर बँकाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात रायगड जिल्हयाकरिता शासना कडून 965 प्रकल्पाचे उद्दीष्ट प्राप्त झालेले असून या वर्षी एकूण 1500 प्रकरणे बॅकेकडे मंजूरी करीता पाठविण्यात आलेली आहेत. बॅकेकडे पाठविण

03 मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिम

रायगड दि.1(जिमाका):- जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात रविवार दि.03 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या माहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस देण्यात येणार आहे. 0 ते 05 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस पाजून लसीकरण मोहिम कार्यक्रमात सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. (प्रभारी) सत्यजीत बडे यांनी केले आहे. रायगड जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1 लाख 73 हजार 854 त्याकरीता ग्रामीण भागात 2 हजार 109 बुथ व शहरी भागात 143 बुथ असे एकूण 2 हजार 252 बुथवर पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रेल्वेस्थानक व ग्रामीण भागात 137 ट्रान्झीट टीम व शहरी भागात 330 अश्या एकुण 467 ट्रान्झीट टीमद्वारे सुध्दा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात 142 मोबईल टीम व शहरी भागात 12 अश्या एकुण 154 मोबईल टीमद्वारे सुध्दा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाकरीता 5 ह