पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन

रायगड,दि.06(जिमाका):-उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत यांच्या अध्यक्षेतेखाली व जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि.07 मार्च 2024 रोजी सकाळी 10:00 ते सायं. 6:00 या वेळेत विरुपक्ष मंगल कार्यालय, 121/बी, रत्नाकर खरे मार्ग, पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी दिली आहे. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 यांनी सुचविलेल्या सुधारणाचे अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहे. त्याच धर्तीवर निर्यात व विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक