Posts

Showing posts from July 26, 2020

लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कार्यान्वित तर मुगवली येथील प्रस्तावित कोविड केअर सेंटर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली भेट

Image
अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील 102 बेडच्या कार्यान्वित असलेल्या तर मुगवली येथील 44 बेडच्या प्रस्तावित कोविड केअर सेंटरला (रविवार,दि.26 जुलै रोजी) भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष करोना बाधित रूग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस करुन प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांबद्दल माहिती जाणून घेतली. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याशी संवाद साधताना येथील रुग्णांनी या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, जेवण, स्वच्छता तसेच वैद्यकीय सेवा उत्तम असल्याचे सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री कु.तटकरे यांनी येथील दाखल रुग्ण व निरीक्षणाखालील रुग्ण यांची माहितीही जाणून घेतली. या कोविड केअर सेंटरमध्ये दिल्या जात असलेल्या सेवांबद्दल तेथील रुग्णांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया ऐकून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर मुगवली येथील 44 बेडच्या प्रस्तावित कोविड केअर सेंटरलाही त्यांनी भेट दिली. तसेच त्या ठिकाणीही रुग्णांना सर्व प्रकारच्या उत्तम वैद्यकीय स

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी.,    अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 4.00 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-1.90 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.30 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-42.90 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.00 मी. इतकी आहे. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 32 मि.मि.पावसाची नोंद

             अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 32.80 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1447.98 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 39.00 मि.मि., पेण-4.00 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-30.80 मि.मि., उरण-129.00 मि.मि., कर्जत-8.40 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-16.00 मि.मि., रोहा-23.00 मि.मि., सुधागड-5.00 मि.मि., तळा-29.00 मि.मि., महाड-9.00 मि.मि., पोलादपूर-13.00, म्हसळा-71.00मि.मि., श्रीवर्धन-91.00 मि.मि., माथेरान-15.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 524.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 32.80 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 45.02 टक्के इतकी आहे. 00000