Posts

Showing posts from July 16, 2017

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 78 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.22, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 78.11 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1929.74  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 68.00 मि.मि., पेण-122.10 मि.मि., मुरुड-33.00 मि.मि., पनवेल-85.00 मि.मि., उरण-90.00 मि.मि., कर्जत-87.00 मि.मि., खालापूर-90.00 मि.मि., माणगांव-69.00 मि.मि., रोहा-47.00 मि.मि., सुधागड-54.00 मि.मि., तळा-64.00 मि.मि., महाड-71.00 मि.मि., पोलादपूर-32.00, म्हसळा-72.60 मि.मि., श्रीवर्धन-61.00 मि.मि., माथेरान-204.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 1249.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 78.11  मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाशी टक्केवारी   61.40 % इतकी आहे. 0000

होमगार्ड नवीन सदस्य नोंदणी कार्यक्रम रद्द

    अलिबाग दि.21,(जिमाका):- पोलीस मुख्यालय रायगड-अलिबाग येथे दिनांक 24 व 25 जुलै 2017 रोजी नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तथापी सतत होणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे कवायत मैदानात पाणी साचल्याने मैदानी चाचण्या व प्रशासकीय कामकाज करणे शक्य नसल्यामुळे व उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी दि.24 व 25 जुलै 2017 रोजीचा नोंदणी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे संजयकुमार पाटील,जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 74 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.21,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 74.43 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1851.63मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 42.00 मि.मि., पेण-70.40 मि.मि., मुरुड-69.00 मि.मि., पनवेल-68.00 मि.मि., उरण-35.00 मि.मि., कर्जत-109.00 मि.मि., खालापूर-92.00 मि.मि., माणगांव-94.00 मि.मि., रोहा-52.00 मि.मि., सुधागड-54.33 मि.मि., तळा-72.00 मि.मि., महाड-76.00 मि.मि., पोलादपूर-82.00, म्हसळा-85.20 मि.मि., श्रीवर्धन-63.00 मि.मि., माथेरान-127.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 1190.93 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 74.43 मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  58. 92 % इतकी आहे. 0000    

केंद्रीयमंत्री अनंत गीते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग दि.20 (जिमाका),  केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते हे रायगड जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे़. शनिवार दि. 22 जुलै 2017 रोजी सकाळी 9.00 वा. मुंबई येथून प्रयाण.  11.00 वा. पाली जि.रायगड येथे आगमन.  दुपारी 2.00 वा. पाली येथून मुंबईकडे प्रयाण. 000000                                            

भात लावणी 70 टक्के पुर्ण

अलिबाग दि.20,(जिमाका):-   जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन झाले   आहे. त्यामुळे भात लावणीला वेग आला असून आज अखेर भात लागवडी खालील एकूण क्षेत्रापैकी 70 टक्के क्षेत्रावर भात लावणी पुर्ण झाली आहे.             जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून  पावसाचे दिलासादायक पुनरागमन झाले आहे. गेल्या 24 तासात सरासरी 73.06 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1777.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.             गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसाने  जिल्ह्यात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.    या संदर्भात कृषि विभागाकडुन प्राप्त आकडेवारीनुसार,   जिल्ह्यात एकूण 1 लाख 41 हजार 483 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे.   जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने   भात पिकाची   लागवड सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजे   1 लाख 23 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर नियोजित आहे. त्यापैकी आज अखेर भात पिकाची 86 हजार 258 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. एकूण लागवडीच्या 70 टक्के लावणी पुर्ण झाली आहे. सर्वाधिक भात लावणी रोहा तालुक्यात  90 टक्के पुर्ण झाली असून मुरुड,

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 73 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.20,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 73.06 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1777.20मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 74.00 मि.मि., पेण-110.00 मि.मि., मुरुड-97.00 मि.मि., पनवेल-22.00 मि.मि., उरण-33.00 मि.मि., कर्जत-34.80 मि.मि., खालापूर-67.00 मि.मि., माणगांव-94.00 मि.मि., रोहा-138.00 मि.मि., सुधागड-88.33 मि.मि., तळा-95.00 मि.मि., महाड-80.00 मि.मि., पोलादपूर-58.00, म्हसळा-80.80 मि.मि., श्रीवर्धन-50.00 मि.मि., माथेरान-47.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 1168.93 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 73.06 मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  56. 55 % इतकी आहे. 0000   

अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग दि.19,(जिमाका):- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडुन आज प्राप्त पुर्वसुचनेनुसार येत्या 48 तासांमध्ये रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी  (7 ते 12 सेमी) आणि काही ठिकाणी  त्यापेक्षा अधिक (12 ते 24 सेमी) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  तसेच या कालावधीत समुद्रही खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व विभागांनी आवश्यक उपाययोजना  कराव्या. अतिवृष्टीला सामोरे जाण्यासाठी  बचाव पथके, साहित्य, रुग्ण्वाहिका आदी सुविधा सज्ज ठेवाव्यात.नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावेत.सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी  प्रवाहाच्या मार्गातील अडथळे  दुर करावेत. कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात  0241-222118/222097/222322 कळवावी, असे आवाहन आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग  आपत्तीकालीन कार्य कक्षातर्फे करण्यात आले आहे. ०००००

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी 'प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती' ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

अलिबाग दि.19,(जिमाका):- अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी प्रधानमंत्र्यांनी घोषित केलेल्या पंधरा कलमी योजना राज्यातील मुस्लिम,शिख, ख्रिश्चन बौद्ध,शीख,पारशी व जैन या अल्प संख्यांक समाजातील इयत्ता पहिली ते दहावी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सन 2017-18 या वर्षासाठी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने 31ऑगस्ट पर्यंत नवीन विद्यार्थ्यांचे व 31 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती नुतनीकरण अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.   या योजनेसाठीच्या पात्रता व अटी याप्रमाणे आहेत- इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व शासकीय , निमशासकीय, खाजगी अनुदानीत. कायम विनाअनुदानीत मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्प संख्यांक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. इ. पहिलीच्या वि द्या र्थ्यांसाठी गुणांची अट लागू राहणार नाही .,पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्

स्वयं प्रकल्पः कुक्कुट पालन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग दि.19,(जिमाका):- आदिवासी विभाग, महिला बालकल्याण पशुसंवर्धन व ग्रामविकास विभाग हे संयुक्तपणे जिल्ह्यात सन 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षात ग्रामीण परसातील कुक्कुट पालन आदिवासी उपयोजना क्षेत्र यांचेमार्फत राबविणार आहेत.   या स्वयं प्रकल्पासाठी  कर्जत तालुक्यामध्ये 2 ठिकाणी मदर युनिट स्थापन करण्यात येणार आहेत.   या योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड व  मदर युनिट धारक निवड होणार आहे. त्यासाठी गठित जिल्हा समन्वय समिती चे सदस्य सचिव, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड हे आहेत. हा प्रकल्प  राबविण्याच्या कार्यपद्धतीसाठी  प्रकल्पाचे सनियंत्रण जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण  यांचेकडे सोपविण्यात आले आहे.    या योजनेचा मुख्य उद्देश आदिवासी क्षेत्रातील मुलांच्या आहारात अंड्याचा पुरवठा करुन कुपोषण दूर करणे व स्वयंरोजगार निर्मिती  करणे हा आहे. या स्वयंम प्रकल्प योजनेत शासनाने सन 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षामध्ये प्रत्येकी रु.साठ हजार पक्षी संगोपन करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.  दोन मदर युनिटद्वारे 834 कुटूंब

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 110 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.19,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 110.33 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली असून  दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1704.14मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 110.00 मि.मि., पेण-82.20 मि.मि., मुरुड-134.00 मि.मि., पनवेल-82.40 मि.मि., उरण-70.00 मि.मि., कर्जत-117.20 मि.मि., खालापूर-105.00 मि.मि., माणगांव-120.00 मि.मि., रोहा-93.00 मि.मि., सुधागड-96.33 मि.मि., तळा-90.00 मि.मि., महाड-121.00 मि.मि., पोलादपूर-176.00, म्हसळा-123.20 मि.मि., श्रीवर्धन-142.00 मि.मि., माथेरान-103.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 1765.33 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 110.33 मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  54. 23 % इतकी आहे. 0000    

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 139 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.18,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 139.76 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली असून  दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1593.81 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 215.00 मि.मि., पेण-160.40 मि.मि., मुरुड-142.00 मि.मि., पनवेल-145.00 मि.मि., उरण-148.00 मि.मि., कर्जत-126.40 मि.मि., खालापूर-64.00 मि.मि., माणगांव-137.00 मि.मि., रोहा-163.00 मि.मि., सुधागड-139.33 मि.मि., तळा-148.00 मि.मि., महाड-127.00 मि.मि., पोलादपूर-115.00, म्हसळा-145.80 मि.मि., श्रीवर्धन-112.00 मि.मि., माथेरान-148.20 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 2236.13 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 139.76 मि. मि  इतकी असून एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  50. 72 % इतकी आहे. 0000                                                                  

कार्यक्षमता व पारदर्शकतेसाठी वाहतुक पोलिसांचे आता ई- चलन

Image
अलिबाग, दि.17 (जिमाका)   - वाहतूक विभागात अधिक पारदर्शकता व कार्यक्षमता दिसून येण्याकरीता रायगड जिल्ह्यात ई-चलान प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. याप्रणालीचा अधिक वापर करुन पोलिस विभाग स्वत:ला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी केले. मुंबई, पुणे,  नाशिक  येथे   ई- चलनाद्वारे   तडजोड    स्वीकारण्याची    कार्यवाही    सुरु    झालेली    आहे.    शासनाच्या    कॅशलेस   व   पेपरलेस धोरणानुसार    रायगड   जिल्हा   वाहतूक   शाखेच्या   व तीने   ई-चलनाद्वारे तडजोड     स्वीकारण्याच्या    कार्यवाही   चा   शुभारंभ    आज करण्यात आला.   याप्रसंगी    अलिबाग  नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अतिरीक्त पोलस अधिक्षक   संजयकुमार   पाटील,   पोलीस उपाधिक्षक गृहविभाग   राजेंद्र   दंडाळे,   डी. बी.   निघोट,    नगर सेविका सुरक्षा शहा पोलिस निरीक्षक   सुरेश   वराडे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील    ग्रामीण भागात    ही    सेवा   सुरु    करण्याचा    मान    रायगडने सर्वप्रथम    पटकाविल्याचे    जिल्हा   पोलिस   अधिक्षक   अनिल   पा रसकरयांनी  

पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा प्रशासनाची सतर्कतेसाठी सज्जता

अलिबाग दि.17 (जिमाका), प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडील आज प्राप्त  सूचनेनुसार पुढील 48 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 से.मी ते 12 से.मी) तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक (12 से.मी ते 24 से.मी) ही पूर्वसूचना दिली आहे. तसेच समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार आहे.  वरील सुचना लक्षात घेता अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या प्रमाणात उपाय योजना करण्याच्या व पुर परिस्थितीस समोरे जाण्यासाठी बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका इ. सुविधा ,नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्तीची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/222322 या क्रमांकावर द्यावी,अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 84.92 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.17,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 84.92 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली असून  दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1454.05 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 67.00 मि.मि., पेण-125.30 मि.मि., मुरुड-72.00 मि.मि., पनवेल-49.80 मि.मि., उरण-47.00 मि.मि., कर्जत-42.60 मि.मि., खालापूर-70.00 मि.मि., माणगांव-111.00 मि.मि., रोहा-69.00 मि.मि., सुधागड-79.00 मि.मि., तळा-101.00 मि.मि., महाड-129.00 मि.मि., पोलादपूर-95.00, म्हसळा-130.06 मि.मि., श्रीवर्धन-90.00 मि.मि., माथेरान-81.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 1358.76 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 84.92 मि. मि  इतकी असून एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  46.27 % इतकी आहे. 0000     

कृषि विभागाचा उपक्रम पीक कापणी प्रयोग व मोबाईल ॲपचे प्रशिक्षण

अलिबाग दि.16 (जिमाका)-  जिल्ह्यात खरीप हंगामात भात व नागली पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते. या पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी घेण्यात येणारा पीक कापणी प्रयोग व त्यासाठी वापरावयाच्या मोबाईल ॲपचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. रायगड जिल्ह्यात भात व नागली पिकांचे अनुक्रमे 1,23,000 व 10,500 हे क्षेत्रावर लागवड केली जाते. दरवर्षी खरीप हंगामात कृषि विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रमुख पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज व आढावा काढण्याचे प्रयोग (पीक कापणी प्रयोग), त्या करीता वापरात येणाऱ्या मोबाईल ॲप तसेच पंतप्रधान पीक विमा योजना सन 2017-18 करीता राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विमा हप्ता व विमा अर्ज स्विकारण्यासाठी अधिमान्यता दिलेल्या आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर या तीन मुद्यांबाबत प्रशिक्षण नुकतेच (दि.11 व 12 रोजी) राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे पार पडले. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पी.डी.शिगेदार उपस्थित होते.  या प्रशिक्षणात कृषि, महसूल विभागाचे तसेच जिल्हा परिषदेचे क्षेत्रिय व पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झा

पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन;31 तारखेपर्यंत मुदत

अलिबाग दि.16 (जिमाका)- पंतप्रधान पीक विमा योजना रायगड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत असुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड यांनी केले आहे. योजनेची सविस्तर माहितीः- पंतप्रधान पीक विमा योजनेची उद्दिष्टे नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक र्स्थेर्य अबाधित राखणे. योजनेची वैशिष्ट्ये कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळांसाठी सुध्दा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे. विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकांच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता दर हा खरीप हंगाम-2 टक्के व रब्बी हंगाम 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजना कार्यान्वयीन यंत्रणा पंतप्रधान पीक विमा योजना रायगड जिल्ह्यात भारतीय कृषि विमा कंपनी